बाप रे.! अखेर अकोल्यात कोरोनाने बळी गेलाच! त्या 36 वर्षीय तरुणाचा मृत्यू, ब्राम्हणवाडा येथे दोघे तर संगमनेरच्या कुरणमध्ये एक
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील कृषीउत्पन्न बाजार समिती या परिसरात राहणार्या एका 36 वर्षीय व्यक्तीला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. काल मंगळवार दि. 30 रोेजी कोरोनाशी लढा देत असताना या तरुणाचा मृत्यू झाल्याचा धक्कादायक रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. आता या व्यक्तीच्या सानिध्यात आलेल्या सहा जणांचे अहवाल निगेटीव्ह आले असून केवळ चार अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे, अकोलेकरांसाठी ही एक धोक्याची घंटा झाली आहे. गेल्या 24 तासापासून हा व्यक्ती मयत झाला की ठिक आहे. याबाबत संभ्रम निर्माण झाला होता. आज जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ. मुरंबिकर यांनी दै. रोखठोक सार्वभौमशी बोलताना तो मयत असल्याची माहिती दिली आहे.
या व्यतीरिक्त अकोले तालुक्यातील ब्राम्हणवाडा येथे 26 वर्षीय युवकाला तर 17 वर्षीय युवतीला कोरोनाची बाधा झाली आहे. ही दोघे मुंबईहून आले होते. तसेच संगमनेर तालुक्यात कुरण येथे 35 वर्षीय युवक कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, शहराच्या मध्यवर्ती भागात एका भांड्यांच्या व फर्निचरच्या दुकानातील एक व्याक्तीला कोरोनाची लागण झाली आहे. हा व्यक्ती काही माल आणण्यासाठी नाशिक व उल्हासनगर येथे जाऊन आल्यानंतर त्यास दोन दिवसांपुर्वी त्रास होऊ लागला होता. त्यामुळे तो शहरातील एका पेट्रोलपंपाच्या जवळ असणार्या एका रुग्णालयात उपचार घेत होता. दरम्यान त्यास श्वास घेण्यासाठी त्रास होऊ लागल्याने त्याला डॉक्टरांनी स्वॅब घेण्यासाठी जिल्हा रूग्णालयात पाठविले होते. तर दोन दिवसांपुर्वी त्याचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. डॉक्टरांंसह 30 व्यक्तींना क्वारंटाईन करण्यात आले आहे.सध्या अकोले तालुका हा आजुबाजूच्या शहरांच्या तुलनेत फार म्हणजे फार सेफ आहे. येथे आजवर 35 हजार संशयितांना होमक्वारंटाईन करण्यात आले होते. तर आज त्यातील फक्त 3 हजार 500 लोक होमक्वारंटाईन आहेत. जे लोक 25 लोक कोरोना बाधित झाले होतेे. त्यापैकी 22 लोक ठणठणीत होऊन घरी गेले आहेत. सध्या हायरिस्क म्हणून केवळ 27 रुग्णांचा सामावेश असून समशेरपूर, कोतुळ आणि आज कृषीउत्पन्न बाजार समिती अशा तीनच ठिकाणे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आलेले आहेत. कृषीउत्पन्न बाजार समिती या परिसरातील 147 घरे व त्यामध्ये राहणारे 679 लोक प्रशासनाने होमक्वारंटाईन केले आहेत.
दरम्यान गेल्या काही तासांपासून हा तरुण मयत असल्याच्या बातम्या सोशल मीडियावर फिरत होत्या. याबाबत महसूल अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांना देखील याबाबत माहिती नव्हती. तर काही डॉक्टांशी संपर्क साधला असता त्यांनी हा व्यक्ती अत्यावस्थेत असल्याचे सांगितले. मात्र, या गोष्टीची शहनिशा केली असता डॉ. मुरंबीकर यांनी सांगितले की, जेव्हा रुग्ण जिल्हा रूग्णालयात पाठविला जातो. तेव्हा त्या अर्जावर ज्याचा मोबाईल क्रमांक दिलेला असतो त्यांना ही माहिती तत्काळ पोहचविली जाते. त्या व्यक्तीने त्याच्या नातेवाईकांना माहिती देणे अपेक्षित असते. आ रुग्ण काल मयत झाला असून त्याची माहिती संबंधित नंबरवर देण्यात आली होती.या घटनेमुळे आता गेली कित्तेक दिवस अकोले तालुका कोरोनामुक्त होता. मात्र, एकाच दिवशी मोठा धक्का देत थेट एक मृत्युचा रिपोर्ट समोर आला आहे. त्यामुळे, नागरिकांमध्ये मोठी घबराहट निर्माण झाली आहे. मात्र, नागरिकांनी घाबरुन न जाता स्वत:ची काळजी घ्यावी, अफवांवर विश्वास ठेऊ नये, शासनाच्या नियमांचे पालन करावे, तसेच विनाकारण घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
--------------------------------------
जाहिरातीवर दोन रुपये खर्च केल्याशिवाय दहा रुपये मिळकत होऊच शकत नाही असे मोठमोठे उद्योजक सांगतात. त्यामुळे, आपल्या व्यवसायाची माहिती अगदी सामान्य व्यक्तींपर्यंत पोहचविण्याची जबाबदारी आम्ही घेतो. जर आपल्याला या 62 लाख वाचक असणार्या पोर्टलवर अल्प दरात जाहिरात द्यायची असेल तर संपर्क साधा. अकोले : 8888782010, 8208533006 संगमनेर : 8308139547
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 560 लेखांचे 62 लाख वाचक)
============
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 400 दिवसात 560 लेखांचे 62 लाख वाचक)