सासऱ्या नंतर त्या सासूू सुनाही कोरोना बाधित.! निमोणमध्ये एक मयत चार रुग्ण.!
सार्वभौम (संगमनेर) :-
संगमनेर तालुक्यातील निमोण येथे आणखी दोन महिला कोरोना बाधित असल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे, निमोण आणि संगमनेर प्रशासनाची आणखी डोकेदुखी वाढली आहे. त्यामुळे, संगमनेर तालुक्यातील काही नियम अधिक कडक होण्याची शक्यता आहे. या महिलाची तपासणी नाशिक रुग्णायलात करण्यात आली आहे. या माहितीला स्थानिक प्रशासनाने दुजोरा दिला आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमोण येथे एका व्यक्तीला कोरोना बाधा झाल्यामुळे तो मयत झाला होता. त्यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वडिलांना कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. त्यांच्या पाठोपाठ त्यांची वयोवृद्ध आई यांना देखील कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले होते. दरम्यान या दोघांच्या तपासण्या नाशिकच्या रुग्णालयात करण्यात आल्या होत्या. मात्र, त्यांची पत्नी त्यांचे स्वॅब घेण्यात आले होते. नंतर आज त्यांचे स्वॅब पॉझिटीव्ह आल्याचा अहवाल प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे, निमोणमध्ये आता एकूण एक मयत व तीन पॉझिटीव्ह व्यक्ती मिळून आले आहेत. अशी संख्या चारवर जाऊन पोहचली आहे. तर संबंधित गावात पोलिस व महसूल प्रशासनाने कडेकोट बदोबस्त ठेवला आहे. येथे हॉटस्पॉट क्षेत्र म्हणून जाहिर केले असून तेथे अद्याप गाव होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर या चौघांच्या व्यतिरिक्त गावात सद्या वास्तव्यास असणारा नवा रुग्ण अद्याप मिळून आलेला नाही. हे एक गुडविल आहे. ही संख्या जर अशीच वाढत राहिली तर २७ तारखेला शहरात बाजरपेठा सुर करणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, नागरिकांनीच ठरवायचे आहे. घरात बसायचे की बाहेर फिरायचे.