अकोल्याच्या लिंगदेवमध्ये 2 हजार 500 जण होमक्वारंटाईन! गाव केलं बंद! कंटेनमेंट झोन घोषित! त्या दोघांच्या अहवालाकडे तालुक्याचे लक्ष!
सार्वभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे मुंबईहून आयात झालेल्या शिक्षकाच्या शहानपणामुळे तालुक्यातील अधिकार्यांना पळता भुई थोडी झाली आहे. त्यामुळे तहसिलदार मुकेश कांबळे यांनी स्वत:चे अधिकार वापरुन तत्काळ लिंगदेव गावात कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे गावातील 2 हजार 500 गावकरी होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर या ठिकाणी सर्व सुविधा आता अकोले प्रशासन पुरविणार आहे. जो कोणी नियमांचे उल्लंघन करेल त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात येणार आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे. सद्या ११ जणांचे स्वॅब घेण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, कोरोनाच्या भितीपोटी अनेकांनी आपली कर्मभूमी सोडून मायभूमी गाठली आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात रोजगार कमी असल्यामुळे सर्वात मोठे स्थलांतर येथील आहे. मात्र, प्रशासनाने अद्याप नेत्रदिपक कामगिरी करुन कोरोनाला वेशिवर रोखले होते. तरी देखील कोणी कायदेशीर मार्गाने घरी आले तर कोणी छुप्या मार्गाना गावात आले. असेच एका शिक्षक महाशय लिंगदेव गावात येऊन धडकले. त्यांना आरोग्य विभाग आणि गावकरी यांनी शाळेतील खोलीत क्वारंटाईन केले. मात्र, त्यांना काही दिवसानंतर त्रास होऊ लागला. मग त्यांनी संगमनेर शहरातील एका मोठ्या राजकारण्याच्या रुग्णालयात उपचार घेतले.
![]() |
तुम्हाला जाहिरात द्यायची का ? फोन करा.! |
आता सद्या तरी हे गाव कंटेन्मेंट झोन म्हणून घोषित करण्यात आले असेल तरी या गावाला पुढारक्या करण्याची फार सवय आहे. कारण, येथे अंतर्गत राजकारण आणि गटतट फार आहे. इतकेच काय! गेल्या काही दिवसापुर्वी एका महाशयाने त्याचा वाढदिवस साजरा केला होता. त्यानंतर एका पुढाऱ्याने धान्य वाटप करण्यासाठी सगळ्या गावाला आवातनं घातलं होतं. वाटलं दोन रूपयांचे पण, सोशल डिस्टन्स सोडून सगळा गाव मंदिरापुढे जाम झाला होता. त्यांचा हा कारनामा सोशल माडियावर चांगलाच झळकला होता. मात्र, पोलीस प्रशासनाने ना त्याच्यावर कारवाई केली ना समज दिली. त्यामुळे आता कंटेन्मेंट झोन असताना पुढार्यांचे पाय घरात बसले म्हणजे बरे. नाहीतर हा प्रादुर्भाव अटोपता अटोपणार नाही.
![]() |
लिंगदेवचा सोशल डिस्टन्स अन लॉकडाऊन.! |
प्रेमाणे सांगून कोणी एकत नसेल तर
लिंगदेव गाव कंटेन्मेंट झोन घोषित केले आहे. जे लोक बाहेरून येतात त्यांनी प्रशासनाशी संपर्क केला पाहिजे. गुपचूप कोणी स्वत:ला लपवून ठेवत असेल तर त्याच्यावर गुन्हे दाखल केले जातील. जे नियम कंटेन्मेंट झोनमध्ये ठरवून दिले आहेत. त्याचे काटेकोरपणे पालन करावे. कारण, इतके दिवस आपण कोरोना रोखला आहे. आता तो आलाय तर पुन्हा त्याला परत लावण्यासाठी प्रशासन सज्ज आहे. फक्त प्रशासनाला जनतेची साथ हवी आहे. त्यामुळे नियमांचे उल्लंघन करु नका. प्रेमाणे सांगून कोणी एकत नसेल तर कायद्याची भाषा वापरून का होईना आपण या संकटावर मात करणार आहे.- मुकेश कांबळे (अकोले तहसिलदार)
कंटेनमेंट झोन म्हणजे काय?
ज्या घरामध्ये कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आला आहे, त्या घराला एपिसेंटर (किंवा मध्यवर्ती) मानून त्याच्या आसपासचा साधारणत: 500 मीटरचा परिसर ही सील केला जातो. यालाच कंटेनमेंट झोन म्हटलं जातं. कंटेन करणं म्हणजे एखाद्या गोष्टीला आवर किंवा आळा घालणं. दाटीवाटीच्या शहरी भागात अधिकार्यांनी हा परिसर निश्चित करावा, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयानं सांगितलं आहे. कोरोनाग्रस्त रुग्ण आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांची माहिती गोळा करणे. ते कोणत्या परिसरात फिरले याबाबत चौकशी करणं. कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आलेल्या परिसरातील आत आणि बाहेर येण्याचे रस्ते पूर्णत सील करणे. या सर्वांचा अभ्यास करून कंटेनमेंट झोन बनवण्यात येतो.
एक महत्वाची गोष्ट म्हणजे, येथे प्रशासन कोठे कमी पडले नाही. तर, गावकरी कमी पडले असेच म्हणता येईल. याची कारणे पुढे येतीलच.! पण सद्या याचा प्रादुर्भाव होणार नाही. त्यासाठी तहसिल आणि पोलीस निरिक्षक यांना हवे ते कठोर निर्णय घेतले पाहिजे. त्यासाठी गावात ५ ते ६ जणांची पोलीस टिम पाठविली पाहिजे. जितके दिवस कंटेनमेंट असणार आहे. तितके दिवस पोलिसांचा गावात कडक पाहरा असला पाहिजे. त्यासाठी पोलिसांच्या सेफ्टीची देखील काळजी घेतली पाहिजे. त्या कर्मचाऱ्यांना फ्रिडम दिला पाहिजे. नाहीतर काठी उगरली आणि आमदार खासदाराचा फोन आला असे बुळगेपणाचा बंदोबस्त निष्फळ ठरेल. परिस्थिती हाताबाहेर जाण्यापुर्वी नियम कडक करावेत तसेच स्थानिक ठराविक लोक आणि पोलिसांची काठी हाच योग्य पर्याय लिंगदेवच्या कोरोनाला आळा घालू शकतो.
आपल्याला खात्री आहे. आपले प्रशासन या कोरोनाला पुरुन उरेल. फक्त किमान गावात तरी कडक आणि कठोर भुमिकेची गरज मला आहे. यात सर्वात मोठे ब्रम्हास्र म्हणजे १८८ ची कारवाई या कोरोनाला तारुन जाऊ शकते. गावात का होईना.! रिकामा उचापतीखोर दिसला की त्याच्यावर तत्काळ कारवाई झालीच पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे त्या बीटेचे जे पोलीस आहेत. त्यांची नियुक्ती तेथे नसली तर चांगलेच ठरेल. कारण, ते गावपुढारी आणि टोळक्यांचे कसे हितसंबंध राखून आहेत. हे अनेकांना माहित आहे. त्यामुळे, अशा काही छोट्या गोष्टींकडे लक्ष दिले तर कोण कुठला कोरोना. आला तेथूनच तो पळून जाईल आणि करु, पाहू असे म्हटले तर मात्र अकोल्याचे मालेगाव होवो अगर ना होवो. पण, संगमनेर तर नक्कीच होईल. मग काय करायचे ते प्रशासन आणि गावकरीच ठरवतील.!!!
तालुक्यात कोरोनाचे आगमन झाले आहे. एका शिक्षकाने तालुक्याला कोरोनाचा धडा शिकविला आहे. मात्र, यात आरोग्य प्रशासन कसे दोषी आहे. संगमनेरचे रुग्णालय कसे दोषी आहे. याबाबत एक खास रिपोर्ट वाचा ऊद्याच्या क्रमश: भाग एक मध्ये!
================
प्रिय वाचक मित्रांनो.! तुमचे आभार कसे मानावे कळत नाही. कारण, तुम्ही बातमी वाचतात आणि पुढे शेअर करतात त्यामुळे रोखठोक सार्वभौम या पोर्टलचे ४२६ बातम्या व लेखांचे ४० लाख ४० हजार वाचक झाले आहे. ते ही अवघ्या ३०० दिवसात. त्यामुळे, इतकी लोकप्रियता ही माझी नसून सार्वभौमचे प्रतिनिधी आणि बातमी शेअर करणाऱ्यांची आहे. तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. कारण एका दिवसाला किमान १ लाख ५० हजार लोक आपल्या सार्वभौमवर भेट देतात.
सागर शिंदे
8888782010
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 426 लेखांचे 40 लाख वाचक)