अकोले पोलीस व संगमनेर राज्य उत्पादन शुल्कची थेट गृहमंत्र्यांकडे तक्रार गुटखा, तंबाखू व म्हळादेवीचे दारु प्रकरण थेट मंत्रालयात - हेरंब कुलकर्णी यांचा पुढाकार


         
    सार्वभौम (अकोले) : 
                       कोरोनाच्या मुकाबल्यासाठी आपले सरकार दिवस-रात्र प्रयत्न करीत आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या काळात व्यसनांवर नियंत्रण आणणे महत्त्वाचे मानले आहे. परंतु अहमदनगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात अवैध दारू आणि गुटका सुरूच आहे. अवैध दारूची तक्रार केली म्हणून पतीने पत्नीवर चाकूने खुनी हल्ला केल्याची घटना तालुक्यात नुकतीच घडली. ती महिला आजही नगरला दवाखान्यात गंभीर स्थितीत आहे. अवैध दारूकडे दुर्लक्ष केल्यामुळे यातील गुन्हेगारांची मजल कुठपर्यंत जाते याचे हे एक उदाहरण आहे. पोलिसांचे दुर्लक्ष व सरंक्षण यातून हा प्रश्न जीवावर बेततो आहे. पोलिसांच्या व उत्पादनशुल्कच्या कर्तृत्वाची कल्पना यातून आपल्याला येईल. तर गावोगावी अवैध दारू सुरू असल्याच्या बातम्या  पोलीस व उत्पादन शुल्क त्याबाबत कठोर भूमिका घेत नाही. त्यामुळे आपण राज्यस्तरावरून लक्ष घालावे.
                              थुंकीमधून कोरोना पसरू शकतो, असे सरकार सांगत असताना तंबाखू व गुटका यावर नियंत्रण यायला हवे. परंतु अकोले तालुक्यात अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांमधून गुटका व तंबाखू गावोगावी पोहोचविली जात आहे. या वस्तुंची किराणा मालाच्या दुकानातून विक्री होते आहे. तंबाखुची पुडी चाळीस रुपये व गुटका अत्यंत महाग भावात विकला जात आहे. तालुक्यात तंबाखू पोहोचवणारा गुटका किंग सर्वांना माहित आहे. तो गुटका कुठे साठवतो याची ठिकाणेही सर्वांना माहीत आहे. पण पोलिसांना ती माहित नाही यावर विश्वास ठेवणे कठीण आहे.
                          लॉकडाऊनच्या काळात पोलीस बंदोबस्त असताना तंबाखू गुटखा तालुक्यात येतोच कसा? याचा अर्थ पोलीस व हे विक्रेते यात अर्थपूर्ण व्यवहार आहेत का? याची आपण उच्चस्तरीय चौकशी करावी. अन्न व भेसळ विभाग गुटख्याबाबत काहीच का करत नाही. पोलिसांना अधिकार असूनही ते त्या विभागाकडे बोट दाखवतात अशा स्थितीत गुटखा मात्र राजरोस सुरू आहे. पोलिसांना आपण तसे स्पष्ट आदेश द्यावेत. कारण, गुटखा बंदी कायदा केलेले आयुक्त यांनी पोलीस कारवाई करू शकतात असे स्पष्ट म्हटले आहे. तर अन्न भेसळ अधिका़र्‍यांना ही आपण जाब विचारावा. ज्या किराणा दुकानांमधून तंबाखू व गुटखा विकला जातो, अशा दुकानांचे विक्रीचे परवाने तातडीने रद्द करावेत व ज्या अत्यावश्यक सेवेच्या गाड्यांमधून तंबाखू गुटखा वाहिला जातो त्या गाड्यांचा देखील परवाना रद्द करण्यात यावा अशी मागणी त्यांनी केलेी आहे.  
गावोगावचे पोलीस पाटील, सरपंच यांना आपल्या गावात तंबाखू गुटखा विक्री न होण्याची जबाबदारी द्यावी व त्यांच्या तक्रारीनुसार दुकानांवर कारवाई करावी. असे झाले तर योग्य दिशेने काम होईल. असे कुलकर्णी यांनी पत्रात म्हटले आहे. अकोले तालुक्यातील तंबाखू-गुटखा व अवैध दारू याबाबत पोलिस विभागाचे अधिकारी व उत्पादनशुल्क यांना जबाबदार धरून आपण कारवाई करावी. तसेच अकोले तालुका व्यसनमुक्त होण्यास आपण मदत करावी अशी आंदोलकांची आपल्याकडे मागणी आहे. असे पत्रात म्हटले आहे.
दरम्यान म्हाळदेवीच्या दारुअड्डा प्रकरणी दैनिक रोखठोक सार्वभौमच्या माध्यमातून सुज्ञ नागरिक, समाजसेवकांना आवाहन करण्यात आले होते. संबंधित महिलेच्या पाठीशी उभे राहून अवैध धंद्यांवर आवाज उठविण्याबाबत वृत्तांकन केले होते. त्याला प्रतिसाद देत ज्येष्ठ समाजसेवक हेरंब कुलकर्णी यांनी थेट गृहमंत्र्यांना पत्रव्यवहार केला आहे. त्यामुळे, याप्ररणी सखोल चौकशी होणार यात शंकाच नाही. अशा व्यक्तींचे समाजाकडून आभार मानले जात आहे. 

सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 159  दिवसात 382  लेखांचे 29 लाख वाचक)