संगनेरात आणखी तीन कोरोना बाधित, त्या निमोणच्या मृत्युचा रिपोर्टही पॉझिटीव्हच!
सार्वभौम (संगमनेर) संगमनेर शहरात आणखी चार रुग्ण कोरोना बाधित असल्याचे समोर आले आहे. तर जो निमोणचा मयत व्यक्ती होता. त्याचा अहवाल देखील पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरातील दोन आणि मयत एक, निमोण एक असे असे चार रुग्ण नव्याने वाढले आहेत. ते रहेमतनगर व निमोण येथील आहेत. त्यामुळे प्रशासनाची अधिक डोकेदुखी वाढली असून आता पुन्हा काही विभाग सील करावे लागणार आहे. तर, निमोण येथे देखील आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. हा आकडा वाढता असला तरी नागरिकांच्या पायाला बांधलेली भिंगरी काय कमी होताना दिसत नाही.
संगमनेर तालुक्याला लागलेला कोरोनाचा शनी कमी होता होईनासा झाला आहे. काही बरे होऊन घरी येता ना येतात तोच पुढील न्युज हाती येते. त्यामुळे प्रशासन कोठे कमी पडतय किंवा नागरिक कोठे कमी पडतय हे समजायला तयार नाही. जर प्रशासनाने कठोर पाऊले घेऊन संपुर्ण शहर बंद केले आहे. तर लागेच काही अत्यावश्यक सेवा चालु ठेवण्याची मागणी होऊ लागली आहे. मात्र, प्रकर्षाने शासकीय नियमांची अंमलबजावणी करण्यास कोणी तयार नाही. माझ्या एकट्याच्याने काय होतय असे म्हणत प्रत्येकजण चोरून लपून बाहेर जातोय आणि कोरोना घेऊन येतोय. त्यामुळे, कोणी जबाबदारीने वागयाला तयार नाही. प्रशासन तरी किती काळजी घेणार आहे. त्यामुळे खरोखर नागरिकांनी काळजी घेणे गरजेचे आहे. कारण, एका नाशिकच्या खाजगीत जो रुग्ण संशयीत होता, त्याची नाशिक प्रशासनाच्या यादीत पाझिटीव्ह म्हणून नोंद केली आहे. निमोण येथे जो व्यक्ती मयत झाला आहे.
त्याच्या अहवालाबाबत काही संदिग्धता होती. त्यामुळे जिल्हा आरोग्य विभागाने ते अहवाल पुन्हा पुण्याला पाठविले होते. त्यापैकी चार अहवालात आणखी दोन जणांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आहेत. तर मयत व्यक्तीचा अहवाल देखील पॉझिटीव्ह आला आहे. त्यामुळे संगमनेर तालुक्यातील कोरोनाची संख्या 21 वर गेली आहे. यातील बहुतांशी बरे होऊन घरी आले की त्यांच्या पाठोपाठ आनंद येतो आणि लगेच दु:खीची बातमी येत. हे सत्र कायम सुरू आहे. त्यामुळे, संगमनेरात कभी खुशी कभी गम असे वातावरण निर्माण झाले आहे.