कोरोनाच्या तपासणीनंतर निमोणच्या व्यक्तीचा मृत्यू, पहिला रिपोर्ट निगेटीव्ह, मृत्युचे कारण गुलदस्त्यात!


सार्वभौम (संगमनेर) - 
                    संगमनेर तालुक्यातील निमोण परिसरात राहणार्‍या एका व्यक्तीस कोरोनाच्या तपासणीसाठी जिल्हा रूग्णालयात नेेले होते. मात्र, आज मंगळवार दि.19 रोजी मृत्यू झाल्याची धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे या रूग्णाचा पहिला रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. तरी देखील त्याचा मृत्यू झाल्यामुळे त्याचे मृत्युचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. त्यामुळे, आरोग्य विभागाने पुन्हा त्याचे स्वॅब तपासणीसाठी पुण्याला पाठविले असून त्यानंतर त्याचे कारण स्पष्ट होणार आहे.
                    याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमोण येथील व्यक्तीला काही त्रास होत असल्यामुळे तो संगमनेरच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल झाला होता. सध्या धांदरफळ प्रकरण घडल्यामुळे कोणी काही अंगावर घ्यायला तयार नाही. त्यामुळे त्याला काही सिमटन्स आढळून आल्यामुळे त्यास जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले होते. तेथे त्याच्यावर उपचार सुरू होतेे. त्याचा स्वॅब देखील घेण्यात आला होता, दरम्यान त्याचा रिपोर्ट देखील निगेटीव्ह आला होता. मात्र, आज सकाळी अचानक त्याला त्रास होऊ लागला आणि त्याने अखेरचे श्वास घेतले. त्यामुळे, कोरोना नाही, अन्य आजाराचे निदान नाही, योग्य उपचार नाही.
                  त्यामुळे हकनाक जीव जाऊ लागले आहेत की काय? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. कारण, अकोले तालुक्यातील नवलेवाडी परिसरात राहणार्‍या त्या गर्भवती महिलेचा जिल्हा रुग्णालयात मृत्यू का झाला. याचे कारण अद्याप कोणालाच माहित नाही. त्यामुळे, कोरोनाने कमी परंतु अज्ञात कारणाने मृत्यु होण्याचे प्रमाण वाढत आहे. ही गोष्ट खरोखर चिंतनाची असल्याचा सुर आता बाहेर पडू लागला आहे.
                      कारण, अनेकांनी उपचारासाठी नेले जाते आणि मृतदेह घरी येतो. ही किती मोठी धक्कादायक बातमी असते. त्यामुळे, या गोष्टीचा शोध घेणे आवश्यक आहे. तर ज्या संशयीतांना तेथे नेले जाते. त्याच्या प्रतिक्रीया पाहिल्या तर विश्वास बसत नाही. इतका हालगर्जिपणा समोर येत आहे. त्यामुळे, कोरोनाच्या व्यतीरिक्त जे बळी जात आहे. ते थांबविण्यासाठी काहीतरी उपायोजना केल्या पाहिजे. असे मत सामाजिक संघटनांनी व्यक्त केले आहे.
दरम्यान जिल्ह्यातील व संगमनेरचे काही रिपोर्ट निगेटीव्ह आले होते. मात्र, त्यातील चार रिपोर्ट पुन्हा पुण्याला पुर्णचेकींगसाठी पाठविण्यात आले होते. त्यामुळे, काही कारणे संदिग्ध आहेत. रिपोर्ट आल्यानंतर बरेचसे चित्र

क्लेर होणार आहे.
गर्दीची ठिकाणे टाळा
तोंडाला मास्क लावा
शक्यतो घरात बसा
सॅनिटायझरचा वापर करा
जनसंपर्क कमी करा
प्रशासनाच्या सुचान पाळा
देशासाठी सहकार्य करा
कोविड योद्ध्यांचा आदर करा

SUSHANT PAWSE