तीन दिवसांच्या मृत्युंशी झुंजीनंतर पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोर्हाडे यांनी घेतला अखेरचा श्वास!
सर्वाभौम (अकोले) :-
अकोले तालुक्यातील केळी येथे शेतात विहीरीचे काम सुरू असताना तालुक्याच्या पंचायत समितीचे सभापती दत्तात्रय बोर्हाडे (वय ५५) हे त्यात पडले होते. त्यात त्यांच्या फुफूसाला मार लागला होता. त्यामुळे त्यांना नाशिक येथे उपचारासाठी नाशिक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज तीन दिवस त्यांनी मृत्युशी झुंज दिली. मात्र, त्यात ते अपयशी ठरले आहेत. आज बुधवार दि.20 रोजी दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांने निधन झाले आहे. त्यामुळे अकोले तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दत्तात्रय बोर्हाडे हे केळी येथील राहणार आहे. ते गेल्या तीन वर्षापुर्वी पंचायत समितीवर निवडून गेले होते. शांत, संयमी व प्रेमळ स्वभाव म्हणून जनतेच्या मनात त्यांनी मोठे आदराचे स्थान निर्माण केले होते. त्यांची जनतेची सेवा करण्याची आत्मियता पाहून पिचड कुटूंबाने त्यांना सभापती होण्याची संधी दिली होती. अगदी अल्प काळात त्यांच्या सहकार्यासह त्यांनी चांगला जम धरला होता. मात्र, अचानक कोरोनाचे संकट उभे राहिले आणि त्यासह बोर्हाडे साहेबांचे आयुष्य देखील स्थिर झाले.
देशात व राज्यात लॉकडाऊन सुरू झाल्यामुळे त्यांनी घराच्या शेतीची काही कामे करण्याचा निर्णय घेतला होता. त्यांच्या घरी केळी येथे विहीर खोदण्याचे काम सुरू होते. त्याची देखभाल करण्यासाठी ते रविवारी (दि.17) विहीरीवर गेले असता अचानक त्यांचा हातातील दोर सटकला आणि ते विहीरीत पडले. यावेळी त्यांच्या पायाला आणि फूफूसाला जास्त मार लागला होता. दरम्यान त्यांना काही लोकांनी तत्काळ वर काढून उपचारासाठी सगमनेरला दाखल केले होते. मात्र नंतर त्यांना नाशिक रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्या पायाची जखम बरी करण्यात आली होती, तर काही शस्त्रक्रिया करण्यात आल्या होत्या. मात्र, फूफूच्या वेदना त्यांना असहाय्य होत होते. तरी देखील त्यांनी जगण्याची मोठी जिद्द दाखविली. मात्र, आज त्यांच्या मृत्युंची झुुंज अपयशी ठरली आहे. बुधवारी दुपारी त्यांच्या निधनाची बातमी समजली आणि तालुक्यावर मोठी शोककळा पसरली आहे.