अकोल्यातील पिंपळगाव येथे महिलेस कोरोना तर राजुरला कोरोनाच्या संशयाची बाधा, पाच दिवस गाव बंद!
सार्वभौम (अकोले) :
समशेरपूर येथे राहणार्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झाली आहे. त्यांच्या संपर्कात असणारी त्यांच्या नात्यातील जवळची एक महिला व्यक्ती सोमवार व मंगळवार रोजी राजूर गावातील बाजारपेठेत फिरली होती. त्यामुळे संशयाची बाधा झालेले राजूर गाव उद्या गुरूवार दि. दि.28 रोजी पासून ते 1 जून पर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय गावकर्यांनी तसेच ग्रामपंचायतीने घेतला आहे. अशा प्रकारची दवंडी पत्रक काढण्यात आले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, समशेरपूर येथे मुंबईहून आलेल्या व्यक्तीला कोरोनाची बाधा झालेली होती. दरम्यान राजूर परिसरात राहणारी एक महिला त्यांची पाहूणी आहे. त्या महिलेस काही त्रास होत असल्यामुळे त्यांनी राजूर येथील एका डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली होती. त्यानंतर त्यांनी बाजारपेठेत जाऊन काही साहित्य खरेदी केले होते. हा प्रकार स्थानिक प्रशासनाच्या लक्षात आले. त्यामुळे त्यांनी कडक निर्णय घेत गाव पाच दिवस बंद करण्याचे ठरविले आहेे. या पाच दिवसात मुख्य रस्ता सॅनीटाईझ करण्यात येणार आहे. या पाच दिवसांच्या दरम्यान कोणी विनाकारण रस्त्यावर फिरु नये. जर कोणी असा मोघम फिरताना दिसून आला तर त्याच्यावर कायदेशी कारवाई करण्यात येईल. असा आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान या माहिलेस जिल्हा रुग्णालयात स्वॅब घेण्यासाठी पाठविण्यात आले आहे. मात्र, 108 क्रमांकाच्या रुग्णवाहीकेच्या आभावी या महिलेस नगरला पाठविण्यासाठी फार उशिर झाला होता. सिन्नर येथील रुग्णवाहीका राजूरमध्ये येऊन त्यांनी नगरला जाण्यास टाळाटाळ केली. तसेच डॉक्टरांनी त्यांना नाशिकला जाण्यास विनंती केली. मात्र तरी देखील त्यांनी दोन्ही क्षेत्र आमच्या जुरिडिक्शनमध्ये येत नाही असे म्हणत त्यांनी टाळाटाळ केली. त्यामुळे त्यांच्या बेजबाबदार पणाचा तोटा राजूरकरांना भोगावा लागला तर फार धोकादायक ठरेल. त्यामुळे, अशा वाहन चालकांवर लोकप्रतिनिधींनी कडक करवाई करण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे. याप्रकरणी नाशिक जिल्हाधिकारी व जिल्हा शल्यचिकीत्सक यांच्याकडे तक्रार करण्यात आली आहे.
- आकाश देशमुख
अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे घाटकोपर येथून आलेल्या एका महिलेस कोरोनाची बाधा झाल्याचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडून नुकताच प्राप्त झाला आहे. दरम्यान पिंपळगाव कोणते आहे हे जिल्हा शल्य चिकीत्सक डॉ, अकोले आरोग्य अधिकारी इंद्रजित गंभीरे यांना माहित झाले नाही. तर तहसिलदार यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. त्यामुळे अकोले तालुक्यात चार ते पाच पिंपळगाव आहेत. त्यामुळे ते कोणते पिंपळगाव याची माहिती मिळाली नाही. दरम्यान प्रशासन नेहमी अर्धवट व संदिग्ध माहिती असल्यामुळे जनतेमध्ये संभ्रम निर्माण होत आहे.