झेडपी आणि पंचायत समितीेचे पांढरे कपडेे गेले कोठे! घरात दडून बसलेल्यांनो! योग्यवेळी उत्तर देऊ!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यात शहरासह ग्रामीण भागात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्यात सामान्य माणूस आणि प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करीत आहेत. या विषाणूने शहराला आता कुठेतरी दिलासा मिळत असताना तालुक्यातील ग्रामीण भागातील दैनंदिन जीवन विस्कळीत होत असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. त्यामुळे ग्रामीण भागात गोर-गरीब जनतेवर उपासमारीचे संकट पुन्हा ओढवले आहे. केंद्र सरकार किंवा राज्य सरकार यांनी दिलेल्या धान्याचा आधार या निराधार आणि गरजू लोकांना मिळाला.पण ऐरवी गावात पांढरे कपडे घालून साहेबांच्या छत्रछायेखाली आपली राजकारणाची भूक भागवून घेणारे पुढारी मात्र संकटाच्या काळात या लोकांची चौकशी करण्यासाठी सुध्दा फिरकले नाहीत.
निवडणूकीपुर्ती यांची काळजी घेणारे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य कोरोनाच्या संकटात अदृश्य झाले आहेत. शहर कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने शहरातील नगरसेवक वार्डनुसार आपले कर्तव्य बजावत आहेत. आपल्या मतदारसंघातील कोणाची हेळसांड होऊ नये, कोणी उपाशी रहायला नको त्यामुळे गेली दोन महिन्यांपासून ते काळजी घेत आहे. परंतु ग्रामीण भागातील जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य या कर्तव्याला तिलांजली देत आहे. तुम्हाला एक गोष्ट माहीत आहे. राजकारणात उधळपट्टी करायची म्हणल्यावर कोणीच कमी पडत नाही. तेव्हा अनेक इच्छुकांची भाऊ गर्दी होते. यावेळेस जिल्हा परिषद व पंचायत समितीला अनेक काँट्रॅक्टर, बिल्डर यांना राजकीय आखाड्यात संधी मिळाली. यांच्यापुढे विरोधी उमेदवारांचा ठाव-ठिकाणाही लागला नाही.आर्थिक बाजू कमी असल्याने विरोधक टिकाव धरू शकले नाहीत असेच विश्लेषण राजकीय अभ्यासकांनी केले होते. गतवर्षी जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य पदाच्या निवडणूकीत याच उमेदवारांनी आपल्या पायाला भिंगरी बांधली होती. आपला संपूर्ण मतदारसंघ पिंजुन काढण्यासाठी यांची दमछाक होत होती. प्रत्येकाच्या उंबर्यात जाऊन कोणी वडीलधार्या माणसांच्या पाया पडत होते तर कोणी समन्वय असणार्यांना मिठी मारत होते. आणि मतदानाचे चिन्ह सांगून याच चिन्हावर बटन दाबण्यास सांगत होते. हीच तळमळ लक्षात घेऊन जनतेने त्यांना डोक्यावर घेतले व मोठ्या मताधिक्याने निवडून दिले.
आता जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक म्हणल्यावर तो खेळ निव्वळ लाखोंत असतो. आता तालुक्यात कोरोना नागरिकांच्या जीवावर बेतला आहे. ग्रामीण भागातील धांदरफळ येथे एक व निमोण येथे दोनजणांचा जीव घेतला. तालुक्यात कोरोना झपाट्याने खेडो-पाडी पोहचला मात्र या काळात आपल्या कार्यक्षेत्रातील जिल्हा परिषद सदस्यांनी व पंचायत समिती सदस्यांनी नागरिकांना कोरोना संकटाच्या काळात वार्यावर सोडले. मग, जेव्हा निवडणुकीत मतांसाठी पैसे फेकणारे अनेक जण पुढे येत होते. तर ते आज कुठे गेले? अर्थातच त्याला दानशूराचं काळीज ही लागतं हे मात्र खरं. एकीकडे तालुक्यातील अनेक सामाजिक संघटनानी संगमनेर प्रशासनाला आधार देत खारीचा वाटा उचला. मात्र, जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्य हे तीन वर्षात कार्यक्षम दिसले नाहीच नाही पण या संकटातही त्यांचा पांढरा कपडा कोठे चमकला नाही. त्यांची हजेरी तालुक्यात तेव्हाच असते जेव्हा साहेब संगमनेरला येणार असतात. तेव्हा मात्र, समाजसेवेचा बुरखा घालून फिरतात.
<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<!-- add1 -->
<ins class="adsbygoogle"
style="display:block"
data-ad-client="ca-pub-5174737680906741"
data-ad-slot="6103641363"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>आता तालुक्यातील सर्व सहकारी संस्था बलाढ्य आहे. त्यांची आर्थिक उन्नती झालेली आहे. मात्र, हे सर्व जनतेचे असल्याने जो काही मदतीचा खर्च होत आहे तो जनतेचाच. कोरोनाने ग्रामीण भागाला विळखा घातला आहे. त्यामुळे ज्या भागात कोरोना बाधीत रुग्ण आढळतात तो भाग सील करण्यात येत आहे. यामुळे ग्रामीण भागात अनेक समस्यांना नागरिक तोंड देत आहेत. त्यातच, धनदांडगे जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी आर्थिक तिजोरीला कुलूप लावून सामाजिकतेचे व्रत धरले आहे. खर्च करुन तरी करणार काय? उद्या निवडणुकीत पुन्हा आपल्यालाच संधी मिळल का? नाहीतर सर्व खर्च व्यर्थ जाईल? याच मानसिकतेणे ते घरात दडवून बसले आहेत, अशी जोरदार चर्चा सुरू आहे.
ना. साहेब नेहमी भाकर फिरवत असतात. त्यामुळे कोणाचा पत्ता कट होईल हे कोणाला कधी सांगता येणार नाही. हे सहकारी साखर कारखाना निवडणूकीत अनुभवायला मिळाले आहेे. कारण, भलेभले जीभल्या चाटत असतांना त्यांच्या तोंडाला साहेबांनी बिनबोल पाने पुसली आहेत. त्यामुळे दोन वर्षावर जिल्हा परिषदेची निवडणूक आहे. तेव्हा संगमनेरची जनता येवढी भी दुधखुळी नाही, की ती आज भोगलेल्या समस्या आणि निवडणुकीच्या काळत विसरुन जाईल. ते त्यावेळी हे चेहरे बरोबर लक्षात ठेवतील, ते स्वत:ची तिजोरी बंद करुन घरात दडून बसले होते. तेव्हा कोरोनाच्या संकटात जिल्हा परिषद सदस्य व पंचायत समिती सदस्यांनी जनतेकडे पाठ फिरवली असली तरी येत्या काळात जनता यांच्याकडे पाठ फिरवल्याशिवाय राहणार नाही. असे आम जनतेचे मत आहे.जिल्हा परिषद सदस्यांना बलाढ्य मतांचे जनतेने लीड दिले. परंतु त्याच जनतेची दिशाभूल करून उपकाराची फेड अपकाराने केल्याचे ग्रामीण भागातील जनतेकडून आता बोलले जावू लागले आहे. अर्थात हे सगळे एकाच माळेत गोवता येणार नाही. यात काहींनी चांगली कामे केली आहेत. जनता त्यांना योग्यवेळी मोबदला देईल. मात्र, कुटे, मालपाणी यांसारख्या व्यक्तींनी नि:स्वार्थ जनतेला मदत केली. मग जे निवडून दिले त्या जनसेकनांकी फोटोशेशनची तुटपुंजी मदत वगळता काय केले? असा प्रश्न उपस्थित केला जात असून त्याची गोळाबेरीज येणार्या काळात नक्ती होईल असे मत सुज्ञ नागरिकांनी व्यक्त केले आहे.<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<!-- add 1 -->
<ins class="adsbygoogle"
style="display:block"
data-ad-client="ca-pub-5174737680906741"
data-ad-slot="9065966182"
data-ad-format="auto"
data-full-width-responsive="true"></ins>
<script>
(adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
- सुशांत पावसे============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 444 लेखांचे 44 लाख वाचक)