अरे देवा.! संगमनेर तालुक्यातील निमोण येथे आणखी दोन पॉझिटीव्हा रुग्ण, चार कमी कोरोनाचे अर्धशतक पुर्ण


सावभौम (संगमनेर)  :
                संगमनेर तालुक्यातील निमोण येथे दोन कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहेत. ही दोघे मुंबई येथून आलेले असून त्यात अवघ्या 8 वर्षाचा रुग्ण आहे तर 40 वर्षाचा दुसरा रुग्ण आहे. तीन दिवसापुर्वी हे मुंबई येथून निमोणला आले होते. काल त्यांना नगरला तपासणीसाठी पाठविले होते. आज त्यांचा अहवाल संगमनेर प्रशासनाला प्राप्त झाला आहे.
तर आज दिवसभरात जिल्हात 12 तर संगमनेर शहरात सात रुग्णांची भर झाली आहे. सायकाळी पाच जण कोरोना बाधित मिळून आले होते. त्यात  कोल्हेवाडी रोड येथे दोन, एक मुंबईहून आलेला 27 वर्षीय तरुण व कौठे कमळेश्वर येथील 37 वर्षीय तरुण तर डिग्रस येथे मुंबईहून आलेला 52 वर्षींय महिला अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे रिपोर्ट प्राप्त झाले होेते. त्यामुळे संगमनेरात कोरोना पॅझिटीव्हची संख्या 46 वर जाऊन पोहचली आहे.
अहमदनगर आज नव्याने 10 कोरोना रुग्ण आढळले आहे , अहमदनगर केडगाव, संगमनेर, कर्जत, राहता, आणि  पारनेर या तालुक्यात हे रुग्ण आढळले असून जिल्ह्यात आता एकूण रुग्ण संख्या 143 वर पोहचली आहे. एकूण रुग्ण - 141, डिसचार्ज - 70, मयत - 11
उपचार सुरू रुग्ण - 60 अशी अकडेवारी जिल्ह्याची आहे.