संगमनेर तालुक्यात आणखी पाच रुग्ण, संख्या 42 वर
सावभौम (संगमनेर):
संगमनेर तालुक्यातील कोल्हेवाडी रोड येथे दोन, एक मुंबईहून आलेला 27 वर्षीय तरुण व कौठे कमळेश्वर येथील 37 वर्षीय तरुण तर दिग्रस येथे मुंबईहून आलेला 52 वर्षींय महिला अशा पाच जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे रिपोर्ट आज संगमनेर प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यामुळे संगमनेरात कोरोना पॅझिटीव्हची संख्या 44 वर जाऊन पोहचली आहे.
यात जे दोन रुग्ण आहे. ते पहिल्यांदाच कंटेनमेंट झोनमध्ये होतेे. त्यामुळे या दोघांपासून शहरात फारसा प्रादुर्भाव झालेला नसणार आहे. तरी मात्र, प्रशासन दखल घेत आहे.