संगमनेरात आणखी पाच कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण, धांदरफळचे चार व शहरात एक,


सार्वभौम (संगमनेर) - 
संगमनेरात धांदरफळ येथे एक रुग्ण संशयित होता. त्याची खाजगी रुग्णालयात तपासणी केली होती. त्यात तो पॉझिटीव्ह आला होता. त्या दरम्यान गुरूवार दि.7 रोजी सकाळी त्याचा मृत्यू झाला होता. आज त्याच्या संपर्कात असणार्‍या आणखी चौघांना कोरोनाची बाधा झाल्याचे  अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहे. तर संगमनेर शहरात कुरण रोड परिसरात देखील एक व्यक्तीला बाधा झाल्याचा अहवाल आला आहे. त्यामुळे, संगमनेरकरांचा बेजबाबदारपणा चव्हाट्यावर आला असून प्रशासनाची मात्र डोकेदुखी वाढली आहे.
                 दरम्यान संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येेथे एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाने चांगलीच दक्षता घेतली होती. या गावातील 323 कुटुंबातील 1 हजार 629 ग्रामस्तांना अद्याप होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर यांच्यासह एक सरकारी वैद्यकीय अधिक्षक व तीन खाजगी डॉक्टर अशा चौघांचे देखील स्वॅब घेण्यात आली होती, त्यातील मयत झालेल्या व्यक्तीच्या घरातील चार व्यक्तीांना कोरोनाची लागण झाली असून अन्य एक व्यक्ती शहरातील कुरण रोड परिसरातील आहे. त्यामुळे प्रशासनाची पुन्हा धावपळ झाल्याचे पहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने काल 20 व आज तीन अशा 23 जणांची तपासणी केली होती. त्यापैकी कदाचित काही अहवाल निगेटीव्ह आले आहे. मात्र पाच जणांचे अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत.  नागरिकांनी घाबरुन न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. काल धांदरफळ येेथे एका कोरोना बाधिताचा मृत्यू होताच प्रशासनाने चांगलीच दक्षता घेतली होती. या गावातील 323 कुटुंबातील 1 हजार 629 ग्रामस्तांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
             दरम्यान ही चौघे मयत व्यक्तीच्या संपर्कात आले होते. तर हा कुरण परिसरातील व्यक्ती कोणाच्या संपर्कात आला होता हे अद्याप उलगडले नाही. इतकेच काय, धांदरफळ येथे मृत्यू झालेला व्यक्ती देखील कोणाच्या संपर्कात आले होता. याचा शोध घेण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. त्यामुळे, संगमनेरचे संकट टळून म्हणजे ते आठजणांचे रिपोर्ट निगेटीव्ह येऊन 12 तास देखील उलटले नव्हते. तोच धांदरफळने कोरोनाची बातमी दिली. पहिल्यांदा शहराला बाहेरुन लागण झाली. नंतर त्याचा प्रादुर्भाव ग्रामीण भागात गेला. सगळा तालुका काही तास कोरोना रहीत होतो कोठे नाहीतर पुन्हा ग्रामीण भागात त्याचा फैलाव झाला. त्याची लस आता पुन्हा शहरात आली आहे.
                       दरम्यान या प्रकाराला दोषी कोण आहे. याची सखोल माहिती प्रशासनाने घेतली पाहिजे. हा कोरोना बाधित रुग्ण घरी गेला कसा. त्याने खाजगीत तपासणीचा हट्ट धरला कसा व खाजगी रुग्णालयांनी त्याची तपासणी सरकारच्या हवाली करण्याऐवजी मुंबईला पाठवून हे इतके मोठे संकट ओढावून घेतले आहे. त्यामुळे प्रशासन नेमके काय भूमिका घेते आहे. याकडे सर्वाचे लक्ष लागून आहे. याबाबत काही सामाजिक कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल केली आहे.
वाचा भाग : पाच क्रमश:...
सुचना :  कृपया कोणी बातमी कॉपी करु नये!
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 27 लाख वाचक)