अकोले तालुक्यात मुंबईचा तीसरा वानवळा, समशेरपुरचा तरुण कोरोना बाधित!


सार्वभौम (संगमनेर): 
                  अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे मुलूंड येथून आलेल्या एका 39 वर्षीय तरुण पॉझिटीव्ह असल्याची माहिती आरोग्य अधिकार्‍यांनी दिली आहे. त्यामुळे अकोले तालुक्यात हा तीसरा रूग्ण झाला आहे. तो 19 मे रोजी गावात आला होता. त्यानंतर त्याला काल जास्त त्रास होऊ लगल्याने त्यास उपक्रेंद्रात पाठविण्यात आले होते. मात्र, त्यास जास्त सिमटन्स असल्यामुळे त्याला नाशिक जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज उशिरा त्याचा अहवाला प्रशासनाला प्राप्त झाला आहे. त्यामुळे तो पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात येताच प्रशासनाची धावपळ सुरू झाली आहे. 
अकोले तालुक्यात गेल्या दोन महिने एकही रुग्ण मिळून आलेला नाही. मात्र, जसजसे लॉकडाऊनचे नियम शिथील होत गेले तसतसे तालुकांमध्ये गर्दी दाटत गेली. त्याचाच तोटा आता नगर जिल्हाला बसू लागला आहे. संगमनेर तालुक्यात काल जी माहिला आली होती, ती लगेच मयत झाली. त्यानंतर पठार भागावर आज एका कोरोनाबाधित मिळून आला आहे. त्या पाठोपाठ लिंगदेव येथे एक शिक्षक यांनी तालुक्याला कोरोनाचा प्रसाद दिला. ते निस्तारते कोठे नाहीतर ढोकरी येथून तालुक्यात खळबळ उडाली. त्यातून तालुका सावरतो कोठे नाहीतर लागेच मुलूंड येथून आलेल्या एका तरुणास कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. आता हा तरुण मंगळवार दि. 19 मे रोजी गावात आला आहे. त्याला ग्रामपंचायतीने क्वारंटाईन केले होते की नाही. याबाबत प्रशासन अनभिज्ञ आहेत. त्यामुळे हा व्यक्ती नेमका कोणा-कोणाच्या संपर्कात आला होता. हे मात्र अद्याप लक्षात आले नाही. त्यामुळे तहसिलदार महोदय आता समशेरपुरला जाऊन योग्यती माहिती घेतील. त्यानंतर

गाव कंटेनमेंट करायचे काही नाही. त्याबाबत निर्णय घेतला जाणार आहे.
दरम्यान गावकर्‍यांनी घाबरुन जाऊ नये, कोणी वेगळ्या अफवा पसरवू नये. आपली स्वत:ची व कुटूंबाची काळजी घ्यावी. शक्यतो अत्यावश्यक काम नसेल तर घराच्या बाहेर पडू नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
     सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 426 लेखांचे 40 लाख वाचक)