अकोल्यातील कोतुळला दहाव्यात राडा, पिंड व मडके लाथाने ऊधळले, धार्मिक विधी ऊध्वस्त!


सार्वभौम(अकोले) :- 
                      अकोले तालुक्यातील कोतुळ येथे अश्वीनी आत्महत्या प्रकरणाची धग तिच्या दहाव्यात पहावयास मिळाली. मुलगी हकनाक गेल्याचे दु:ख मनात असल्यामुळे तिच्या घरच्यांनी दहावा सुरू असतांना हा सोपस्कार कशासाठी असे म्हणत पिंड व मडके लाताने ऊडवून दिले. हा प्रकार मंगळवार दि.26 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी राजेंद्र चिमन काठे (रा. संगमेनर) यांच्या फिर्यादीनुसार आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                         
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या दहा दिवसांपुर्वी अश्वीनी या सुशिक्षित मुलीने तिच्या राहत्या घरात आत्महत्या केली होती. याप्रकरणी दोन डॉक्टरांसह अन्य जणांवर गुन्हा दाखल आहे. दरम्यान  हा प्रकार होऊन मंगळवारी दहा दिवस झाले होते. त्यामुळे, धार्मिक नियमानुसार विधी करणे अनिवार्य असल्यामुळे अश्वीनीचा विधी करण्याचे काम सुरू होते. या विधीसाठी मयत मुलीचे नातेवाईक देखील हजर होते. दरम्यान मुलगी मयत झाल्याचे दु:ख यांच्या मनात सलत होते. तर दुसर्‍या कुटुंबातील नातेवाईक अटकेत असल्याचा रोष दुसर्‍या कुटुंबाला होता. त्यामुळे हा अंत्यविधी सुरू असताना अचानक दोन गटांमध्ये धुडगूस झाली. त्यानंतर मुलीच्या नातेवाईकांनी उठून दहाव्याच्या विधीसाठी तयार केलेले भातचे पिंड व मडके पायाने व हाताने उडवून दिले. असे फिर्यादीत म्हटले आहे. तर अलका गलांडे, सोनाबा गलांडे, जनाबाई पर्वत, कविता मंडलिक, सुनिल गलांडे, लाभु गलांडे, नारायण पर्वत, विकास मंडलिक (सर्व रा. नवलेवाडी ता. अकोले) यांनी राजेंद्र काठे यांना शिवीगाळ व दमदाटी केली.
                          तसेच फिर्यादीत म्हटले आहे की, यावेळी उपरोक्त व्यक्तींनी विधीचे साहित्य उध्वस्त करुन आमच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत. तर मेहुण्यांचा मर्डर करण्याची धमकी दिली आहे. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात आठ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.