ढोकरीच्या कोरोना रुग्णाहून सुगामध्ये माणामार्‍या, शिवसैनिकाच्या डोक्यातच हेल्मेट घालून केले रक्तभंबाळ, गुन्हा दाखल


सार्वभौम(अकोले) :- 
                      तू ढोकरी येथील रुग्णाच्या संपर्कात आला होता अशी बदनामी का करतो अशी विचारणा करण्यासाठी गेलेल्या एका शिवसैनिकाच्या डोक्यात हेल्मेट मारुन त्यास रक्तभंबाळ करण्यात आले. ही घटना बुधवार दि.27 रोजी सुगाव बु येथे घडली. याप्रकरणी अकोले पोलीस ठाण्यात सुरेश पुंजाजी शिंदे यांच्या फिर्यादीनुसार भाऊसाहेब निवृत्ती तळेकर (रा. सुगाव बु) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 
                   
 याबाबत सविस्तर माहिती अशी की, लिंगदेव येथे मुंबईहून आलेला एक रुग्ण सापडतो कोठे नाहीतर लगेच ढोकरी येथील एक रुग्ण मुंबईहून अकोल्यात दाखल झाला होतो. दरम्यान त्यास उल्हासनगर येथील त्याच्या पाहुण्यांनी पेमगिरीच्या गाडीत बसवून दिले होते. तो अकोल्यात आल्यानंतर वाशेरे येथे उतरला होता. त्यावेळी हा कोरोना बाधित तरुण एका गाडीत बसून अकोल्यात आल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. तर ती गाडी कोणाची होती त्याचा सखोल तपास झाला नाही.<script async src="https://pagead2.googlesyndication.com/pagead/js/adsbygoogle.js"></script>
<!-- add 1 -->
<ins class="adsbygoogle"
     style="display:block"
     data-ad-client="ca-pub-5174737680906741"
     data-ad-slot="9065966182"
     data-ad-format="auto"
     data-full-width-responsive="true"></ins>
<script>
     (adsbygoogle = window.adsbygoogle || []).push({});
</script>
                    मात्र, असे बोलले जाते की ते वाहन सुगावचे होते. त्यामुळे तळेकर हे सुरेश शिंदे यांना म्हणत होते की, तु ढोकरीच्या कोरोना पेशन्टच्या संपर्कात आला आहे. याचा जाब विचारण्यासाठी शिंदे यानी तळेकर यांच्या घराजवळ जाऊन त्यांना विचारले की, तु माझी बदनामी का करतो आहे. मी त्या ढोकरीच्या तरुणाला ओळखत नाही. त्याचा व माझा कोण्यात्याही प्रकारचा संपर्क नाही. मग बदनामी का करतो. असा जाब तळेकर यांना विचारला असता त्यांनी शिंदे यांना शिवीगाळ दमदाटी सुरू केली.
               
     दोघांच्या बाचाबाचीचे रुपांतर मारहाणीत झाले. यावेळी तळेकर यांनी त्यांच्या डोक्यातील हेल्मेट काढून शिंदे यांच्या डोक्यात टाकले. त्यामुळे त्यांना चांगलीच जमख झाली आहे. अशा प्रकारची फिर्याद अकोले पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे