भाजप राष्ट्रवादीच्या कलगितुर्यानंतर अखेर अकोले उद्यापासून तीन दिवस बंद!
सार्वभौम(अकोले) :-
अकोले तालुक्यात मुंबईहून आलेल्या पाहुण्यांमुळे तालुक्यात सहा कोरोना बाधित रुग्ण मिळून आले आहे. मात्र, सुदैवाने शहरात आणि तालुक्यातील एकाही स्थानिक व्यक्तीला याचा प्रादुर्भाव झालेला नाही. त्यामुळे यावर अधिकचा आळा बसण्यासाठी अकोले शहर बंद करण्याच्या हलचाली सकाळपासून सुरू होत्या. मात्र, यात देखील भाजप नगरसेवक आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते यांच्यात मतभेदाचे वातावरण पहायला मिळाले. अकोले बंद करण्याचा अधिकार कोणाचा? त्याला पुढाकार घ्यायचा कोणी? त्याचे श्रेय्य कोणाला? अशा अनेक कारणांनी या विषयावरील कागितुरा सोशल मीडियात चांगलाच रंगला होता. अखेर तु-तु, मै-मै करीत का होईना त्यावर मार्ग निघाला असून 31 मे पर्यंत शहर बंद राहणार आहे.
खरंतर अकोल्यात कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी प्रशासनाने फार कंबर कसली होती. त्यांच्या प्रयत्नांना शंभर टक्के यश मिळाले. कारण, अजूनही हा प्रसार शासनाने शिथिल केलेल्या नियामांचा परिणाम आहे. हे असे असेल तरी अद्याप तालुक्यातील एकाही व्यक्तीला कोरोनाने स्पर्श केलेला नाही. याचे श्रेय्य बेशक तहसिलदार, मुख्याधिकारी, आरोग्य विभाग आणि पोलीस यंत्रणेसह काही समाजसेवकांना जाते. मात्र, आज परिस्थिती फार वेगळी होऊ लागली आहे. तालुक्यात सहा कोरोना बाधित रुग्ण मिळून आले असून हा प्रसार शहरात व्हायला नको. त्यासाठी आज अकोले बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे हा सर्व ऊहापोह प्रशासन दरबारी मांडण्यात आला होता. भाजप आणि राष्ट्रवादी यांंच्यातील पक्षद्वेश नकळत बाहेर येत असल्यामुळे त्यांच्यात होकार- नाकार सुरू होते. मात्र, यात कौतुकाची बाब अशी की, शहर कोणीही बंद केले तरी व्यापारी वर्गाने त्यांना प्रांजळपणे पाठिंबा दिला होता. खरंतर नगरपंचायतीवर कायदेशीर बाबीनुसार राष्ट्रवादीची सत्ता आहे. मात्र, त्यात आजी आमदार कोठेच नसून माजी आमदारांची चलती आहे. त्यामुळे सगळे नगरसेवक एक होऊन शहर बंद करण्याचा पक्का निर्धार केला होता. त्यामुळे दुसर्या गटाची मोठी घुसमट सुरू होती. शहर बंद व्हावे ही प्रत्येकाची इच्छा! पण, त्यात श्रेय्यवाद नको, त्यामुळे अगदी सायंकाळपर्यंत तालुक्याच्या सुरक्षेचा प्रश्न राजकारणावर जाऊन पोहचला. मात्र, इकडे माध्यमांवर चर्चा सुरू असताना गावात मादास आजाव घुमू लागला होता. त्यामुळे अकोले बंद की नाही, असा प्रश्न अगदी शेवटच्या क्षणापर्यंत कायम होता.
दरम्यान आमदार साहेबांच्या काही कार्यकर्त्यांना चांगली भुमिका घेत बंद बाबत परखड मत मांडले त्यामुळे विरोध अगदी मावळत गेला आणि सुर्य मावळल्यानंतर सर्वपक्षीय मत एक होत शहर बंद करण्यावर शिक्कामुर्तब झाले. त्यामुळे अकोले शहर शुक्रवार दि. 29 मे पासून रविवार दि.31 मे पर्यंत बंद राहणार आहे. यावेळी पेट्रोलपंप व रुग्णालये तसेच अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत.
व्यापारी, नगरसेवक व नागरिक यांच्या स्वयंस्पुर्तीने हा बंद ठेवण्यात आला आहे. कारण, पॉझिटीव्ह रुग्ण शहरात फिरुन गेले आहे. त्यामुळे शहरात तिसरी फवारणी करण्यात येणार आहे. सर्वांना या बंदला चांगला प्रतिसाद द्यावा. स्वत:ची काळजी घ्या, घरात थांबा. - बाळासाहेब वडजे (उपनगराध्यक्ष)
आरोग्यापेक्षा मोठे काही नाही. त्यामुळे सर्वानुमते शहर बंद ठेवण्याचा निर्णय झाला. त्याला नगरिक, प्रशासन व व्यापारी यांनी सहमती दर्शविली. त्यांचे आभार. संकटापुर्वी त्यावरील खबरदारी महत्वाची ठरेल. - नामदेव पिचड (नगरसेवक)
अकोल्यात कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हा चांगला निर्णय घेण्यात आला आहे. पुढील तीन दिवस अकोले कडकडीत बंद राहणार आहे. हा एकमताने निर्णय घेण्यात आला असून त्याचे सर्वांना स्वागत केले पाहिजे. - संदिप शेणकर (राष्ट्रवादी ज्येष्ठ नेते)
अकोले शहर बंद होणे फार महत्वाचे होते. त्यामुळे शहरात प्रादुर्भाव होण्यापासून बचावणार आहे. नागरिकांनी या निर्णयाचे पालन कारावे. अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर पडू नये. - नितीन नाईकवाडी (शिवसेना शहराध्यक्ष)
अकोल्यात स्वयंस्पुर्तीने हा निर्णय झाला आहे. त्या पाठिशी व्यापारी असो. ठाम उभे आहे. आरोग्याच्या दृष्टीने हा महत्वपुर्ण निर्णय असून त्याचे आमच्याकडून नक्कीच पालन होईल, तसेच नागरिकांनीही त्याचे पालन करावे. - गणेश कानवडे (व्यापारी)
- महसूल प्रशासन
भारत सरकारच्या नियमानुसार गाव किंवा शहर बंद करण्याचे अधिकार तसेच अधिसुचनेत बदल करण्याचे अधिकार हे फक्त मुख्य सचिव महाराष्ट्र राज्य यांना आहे. त्यामुळे कायदेशीर नियमानुसार परवाणगी देता येत नाही. मात्र, सुरक्षेच्या दृष्टीने स्वयंस्पुर्तीने बंद पाळणे हा नागरिकांचा प्रश्न आहे.
-
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 444 लेखांचे 44 लाख वाचक)