पिंपळगावात पुन्हा दोन कोरोनाचे रुग्ण! हजार लोक होमक्वारंटाईन! तरच उद्यापासून अकोले बंद होऊ शकते..!


सार्वभौम(अकोले) :- 
           अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे आता आणखी दोन रुग्ण मिळून आले आहेत. ही दोघे मुंबई रिटर्ण असून त्यांना प्रशासनाने जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. आज त्या दोघांचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे. यामुळे पिंपळगाव खांड येथील एक हजार लोकसंखेचे गाव कंटेनमेंट करण्यात आले आहे. तर येथे कोेरोना बाधिंतांची संख्या तीनवर गेली असून आणखी काही संशयिंतांना तपासणीसाठी नेले आहे. 
                               
याबाबत सविस्तर माहिती अशी की, गेल्या चार दिवसांपुर्वी अकोेले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथे एक वयोवृद्ध महिला मुंबईहून गावाकडे आली होती. त्यावेळी तिला काही सिमटन्स आढळून आले होते. त्याबाबत दक्षता घेत आरोग्य विभागाने संबंधित महिलेस तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलविले होते. तिचा रिपोर्ट काल उशिरा अकोले प्रशासनाला प्राप्त झाला होता. या महिलेस क्वारंटाईन केले असता तेथील परिस्थिती आटोक्यात येईल असे वाटत होते. मात्र, यानंतर आणखी दोघांना त्रास होऊ लागला होता. त्यामुळे त्यांना जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज दुपारी त्या दोघांचा अहवाल अकोले प्रशासनाला समजला आहे. त्यात दोघे पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात येताच प्रशासनाने पिंपळगाव परिसर सील करण्याचा निर्णय घेतला आहे. आता या गावात 910 म्हणजे सर्व तशी एक हजार लोकसंख्या आहे. त्यांना सर्वांना होमक्वारंटाईन करण्याचा निर्णय तहसिलदार मुकेश कांबळे यांनी घेतला आहे.
                            खरे पाहता अकोले प्रशासनाचे हे फार मोठे यश म्हणावे लागेल की, तालुक्यात सहा रुग्ण कोरोना बाधित असल्याचे मिळून आले आहेत. मात्र, त्यात एकही रुग्ण स्थानिक नाही. म्हणजे हे सर्व रुग्ण अकोले तालुक्यात बाहेरुन आलेले आहेे. तरी देखील प्रशासन कसोशीने कोरोनाला टक्कर देण्याच काम करीत आहे.
                       दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काल अकोले तालुक्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने अकोले बंद करण्यासाठी स्थानिक पुढार्‍यांनी सोशल मीडियावर आपले मत मांडले होते. मात्र, प्रशासन तसा निर्णय घेऊ शकेल असे वाटत नाही. मात्र, जसे संगमनेर शहर संगमनेर परिवर्तन या सोेशल मीडियाच्या गृपवरील चर्चेनंतर नागरिकांनी स्वयंस्पुर्तीने तीन दिवस शहर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. तसे तालुक्यातील पुढार्‍यांनी एकत्र येऊन असा निर्णय घेतला पाहिजे. जर कोरोनाचा प्रादुर्भाव झाला तर प्रशासनाला कमी मात्र, त्याची झळ तालुक्याला बसू शकते. त्यामुळे अकोले बंद ठेवायचे की नाही. हा निर्णय प्रशासनापेक्षा स्थानिक नागरिक व पुढार्‍यांनी एकत्र येऊन घेतला पाहिजे.
                   
जसे एखादी धार्मिक भावना दुखावली किंवा मोर्चे आंदोलने केल्यानंतर भोंगे लावून शहर बंद ठेवण्याचे आवाहन स्वयंस्पुर्तीने केले जाते. तसे सर्वपक्षिय लोकांनी एक होऊन असा निर्णय घेऊन तो प्रशासनाला कळविला पाहिजे. मात्र, दुर्दैव असे की लोक प्रशासनाच्या खांद्यावर बंदूक ठेऊन स्वत:चे आरोग्य सेफ ठेवण्याचा मानस आखत आहे. हे कोठेतरी चूक वाटत असून जसे राजूर पाच दिवस बंद केले तसे अकोले देखील बंद करण्याचा निर्णय झाला पाहिजे. अन्यथा शहरात जर प्रादुर्भाव सुरू झाला तर 14 दिवस बंद ठेवण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. त्यामुळे, संकट येण्यापुर्वी त्यावर पर्याय काढलेला कधीही बरा.! बाकी रामभरोसे.!!!
-  शंकर संगारे
- सागर शिंदे