संगमनेरचा कोरोना आलेख वाढताच.! धांदरफळची संख्या ८ तर शहरात एक, अन्य अहवाल पेंडींग.!



सार्वभौम (अहमदनगर) :- 
                संगमनेर येथे काल गुरुवार दि ८ रोजी धांदरफळ येथे सात कोरोना बाधीत रुग्ण आढळून आले होते. त्यानंतरही कोरोना बाधिताचे सत्र थांबायला तयार नाही. आज पुन्हा एक नवा रुग्ण आढळून आल्याची धक्कादायक माहिती पुन्हा पुढे आली आहे. त्यामुळे काल दिवसभरात संगमनेर तालुक्यात सात कोरोना बाधीत रुग्ण अढळले होते. तर त्यात अजुन एक रुग्णाची भर पडली आहे. हा रुग्ण धांदरफळ येथील कोरोनाग्रस्त मयत झालेल्या वयोवृद्धाच्या संपर्कात आल्याने आणखी एकाला कोरोनाची लागण झाल्याची माहिती वैद्याकीय अधिकाऱ्यांनी दिली आहे.
हा कोरोना बाधित व्यक्ती ३७ वर्षीय असून तो धांदरफळ येथे  वास्तव्याला आहे. या व्यक्तीचा अहवाल आज सायंकाळी उशिरा प्राप्त झाला आहे. तर धांदरफळ येथील कोरोना बधितांची संख्या आठ तर कुरन रोडचा एक असे संगमनेरात ९ रुग्ण झाले आहे. काल पासून कोरोना बधितांचा आकडा आता वाढू लागला आहे. त्यामुळे  जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी व पोलीस अधिक्षक अखिलेश कुमार सिंह यांनी स्वतः येऊन संगमनेरची पाहणी केली. त्यानंतर काही ठोस निर्णय घेतले आहेत. संगमनेरमध्ये १० मे पासून तर २३ मे पर्यंत अत्यावश्यक सेवासह सर्व बंद करण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. धांदरफळसह कुरनला देखील हॉटस्पॉट पॉकेट एरिया घोषित केला आहे. गावातील केंद्रबिंदूपासून २ की. मी परिसर कोअर एरिया म्हणून घोषित केला आहे.
आज पुन्हा एक कोरोना बाधित रुग्ण आढळल्याने  प्रशासनाची एकच धांदल उडाली आहे. तर रात्रंदिवस एक करून पायाला भिंगरी लावून युद्ध पातळीवर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली होती. मात्र,संचारबंदी लागू केली, विनाकारण फिरणार्यांवर १८८ लागू केले. तर दोनवेळेस हॉटस्पॉट पॉकेट ही जाहीर केले होते. परंतु जनतेला कोरोना विषाणूचा विसर पडला की काय असेच चित्र आता संगमनेरमध्ये दिसत आहे. संगमनेरमध्ये ग्रामीण भाग व शहरातील काही भाग शिथिल करण्यात आला होता. यामध्येच विनाकारण फेरफटका मारणाऱ्यांची संख्या रस्त्यावर दिसून येत होती. संगमनेर तालुक्यात धांदरफळ येथे एका कोरोना बधिताचा मृत्यू झाल्यानंतर प्रशासनाची चांगलीच चिंता वाढलेली दिसून येत आहे. तर धांदरफळ संपूर्ण गाव होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. नागरीकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.

# मनपा, नगरपालिका हद्दीतील एकल, वसाहती लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु ठेवता येणार

# नागरी क्षेत्रातील सर्व मॉल्स आणि आठवडी बाजार पुर्णतः बंदच राहणार आहे.


 अहमदनगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीतील कंटेंटमेंट झोन वगळता महानगरपालिका, नगरपालिका हद्दीतील एकल (stand alone), वसाहती
लगत असणारी, निवासी संकुलामधील सर्व दुकाने सुरु राहतील. तथापी याची काटेकोर अंमलबजावणी आणि नियोजन करण्याची जबाबदारी संबंधित स्थानिक प्राधिकरण यांची राहील, असे आदेश जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांनी जारी केले आहेत.

यापूर्वी जिल्हा प्रशासनाने नागरी भागात एखाद्या गल्लीत, रस्त्यालगत पाच पेक्षा अधिक दुकाने असल्यास अशा दुकानांपैकी फक्त जीवनावश्यक वस्तूची विक्री करणारीच दुकाने सुरु राहतील, असे आदेश जारी केले होते. मात्र, त्या आदेशात आता सुधारणा करण्यात आली आहे. अर्थात, नागरी क्षेत्रातील सर्व मॉल्स आणि आठवडी बाजार हे पुर्णतः बंद राहतील. नागरी क्षेत्रातील बाजारपेठ व व्यापारी संकुलातील फक्त जीवनावश्यक वस्तू विक्रीची दुकाने सुर राहतील. सर्व दुकानांचे ठिकाणी मास्क व सेनिटायझर्स वापरणे अनिवार्य आहे. सर्व दुकानांचे ठिकाणी सामाजिक अंतर (Social dislancing) पालन होईल, याबाबत त्याठिकाणांचे प्रभारी अधिकारी यांनी दक्षता घ्यावी. सर्व दुकनांचे ठिकाणी अनावश्यक गर्दी टाळावी, सार्वजनिक ठिकाणी व दुकानांचे ठिकाणी मास्क न वापरणारे व थुंकणाऱ्या व्यक्तीविरुद्ध संबंधित प्राधिकरणाने दंडात्मक कारवाई करावी. संबंधित स्थानिक प्राधिकरणाने सर्व दुकानांमध्ये समाजिक अंतर (Social distance) पालन होत नसल्यास, दुकानासमोर अनावश्यक गर्दी दिसुन आल्यास सदर दुकान सील करावे. तसेच सदर आस्थापना प्रमुखावर फौजदारी स्वरुपाचा गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले आहे. कोणतीही व्यक्ती/ संस्था/ संघटना यांनी या आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता (45 ऑफ 1860) च्या कलम 188 नुसार दंडनिय  कायदेशिर कारवाईस व आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मथील तरतुदीनुसार कारवाईस पात्र राहतील, असे आदेशात नमूद करण्यात आले आहे.

दरम्यान संगमनेर तालुका व शहरात हॉट्स्पोट सुरु असल्यामुळे येथे हे आदेश लागू होणार नाही. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.  त्यामुळे, कोणी दुकाने उघडण्याची घाई करु नये.

सुशांत पावसे