संगमनेरात शेततळ्यात बुडून तरुण शेतकर्‍याचा मृत्यू, दोघांचे दैव बलवत्तर,


 सार्वभौम (संगमनेर) : 
                    संगमनेर तालुक्यातील वडझरी खुर्द येथे एका युवा शेतकर्‍याचा शेततळ्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना शनिवार दि.9 रोजी दुपारच्या सुमारास घडली. यात त्याचे दोन मित्र वाचले असून प्रदिप दत्तु गोर्डे (वय 22) असे या तरुणाचे नाव आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, वडझरी खुर्द येथील गुंजाळमळा परिसरात संजय नाना गुंजाळ यांच्या शेतात त्यांचे शेततळे आहे. शनिवारी कडाक्याचे ऊन पडल्यामुळे त्याच्या जवळच राहणारे काही तरुण शळ्यावर गेले होते. कोरोनामुळे घरात बसून कंटाळा आल्यामुळे दुपारी अंगाची लाही कमी करण्यासाठी प्रदीप यांच्यासह किरण गोर्डे व दशरथ मोरे यांच्यासह अन्य शेततळ्यात उतरले होते. यातील काहींना पोहता येत होते. मात्र, ज्यांना पोहता येत नाही. त्यांच्यासाठी एक दावे बांधण्यात आले होते.
                 दरम्यान बराच काळ यांना पाण्याच पोहण्याचा आनंद लुटला. मात्र, पोहण्याचा प्रयत्न करीत असताना प्रदिप थकला असता त्याने दोरीला पकडले. मात्र, मित्रांनी दिलेला दोरीचा आधार त्याच्या मृत्युला आधार देऊ शकला नाही. त्यामुळे तो पाण्यात बुडाला. दरम्यान त्याच्या मित्रांना त्याला वाचविण्याचा कसोशीने प्रयत्न केला. मात्र, त्यांना देखील अपयश आले. बराच काळ तो पाण्यात राहिल्याने त्याच्या नाकातोंडात पाणी गेले त्यामुळे प्रदिपने अखेरचा श्वास घेतला. हा प्रकार गावकर्‍यांना समजला असता त्यांना प्रदिपला वाचविण्यासाठी प्रयत्न केले मात्र ते निष्फळ ठरले. दरम्यान याप्रकरणी गावचे पोलीस पाटील नानासाहेब सुपेकर यांनी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्युची नोंद केली आहे

कोरोना रोगाला हरविण्यासाठी आपल्याला घरात बसायचे आहे. हा सर्व आटापिटा तुमच्या आरोग्यासाठी सुरू आहे. कोरोनामुळे आपल्याला मृत्युला सामारे जावे लागू नये. म्हणून हा लॉकडाऊन आहे. मात्र, त्याचे मर्म जनतेला समजत नाही. कोणी नदीत पोहण्यासाठी जात आहे तर कोणी विहिरीत, कोणी तळ्यात तर कोणी शेततळ्यात. त्यामुळे, कोरोनाच्या प्रादुर्भावाने कमी, पण नसत्या कारणाने लोक मृत्यु पावत आहे. हे दुर्दैव आहे. त्यामुळे, घरी बसा, सुरक्षित रहा.
-  शरद गोर्डे  (समाजसेवक)

सुशांत पावसे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)