अकोल्यात एक तर संगमनेर शहरात आणखी दोन कोरोना रुग्ण! संगमनेर बंद करण्याची गरज?



सार्वभौम (संगमनेर) : 
                    संगमनेर शहराच्या लागत घुलेवाडी परिसरात एक  डॉक्टांना कोरोनाची बाधा झाल्यानंतर आता पुन्हा शहरातील मदिनानगर परिसरात 40 व 55 वयाचे दोन रुग्ण मिळून आले आहेत. त्यामुळे या परिसराचे सर्वेक्षण करुन ते सील करण्याची शक्यता आहे. मात्र, प्रशासन अशा प्रकारे किती काम करणार आहे. हा प्रदुर्भाव वाढत गेला तर संगमनेरची डोकेदुखी आधिक वाढू शकते. त्यामुळे येथे स्वयंस्पुर्तीने शहर  बंद करणे गरजेचे आहे. असे सुज्ञ नागरिकांना वाटू लागले आहे. संगमनेरच्या कोरोना बाधिताचे मालेगाव कनेक्शन असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. तर जी महिला आहे. ती सरबत विक्री दरम्यान बाधा झाल्याचे बोलले जात आहे. याबाबत प्रशासन त्या दृष्टीने तपास करीत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, सद्या संगमनेर तालुक्यात स्थानिक नागरिकांची सुरक्षा करण्यात प्रशासन अगदी सक्षम आहे. मात्र, जे लोक बाहेरुन येत आहेत. त्यांना थांबविता येत नाही आणि जा म्हणता येत नाही. त्यामुळे हा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर वाढता दिसून येत आहे. सद्या संगमनेर पुर्वपदावर येऊ लागले आहे. मात्र, काळजी घेताना फार कमी व्यापारी वर्ग दिसून येत आहे. कपड्याच्या दुकांनांमध्ये तोबा गर्दी दिसून येत असून अनेक दुकानांमध्ये अगदी झुंबड ऊडाल्याचे पहायला मिळत आहे. खरेतर अशा दुकानंवर नगरपालिकेने कारवाई करणे अपेक्षित आहे. मात्र, ज्यांना अधिकारी नाही तेच फुल अधिकारी होऊन दुकानांवर शिरजोरी करताना दिसत आहे. जरी बाजारपेठ चालु ठेवायची ठरली तरी नियमांचे काटेकोर पालन केले पाहिजे. तरच दोन्ही गोष्टी साध्य होऊ एकतात. अन्यथा शहरात जर चार-चार रुग्ण मिळून आले आणि तरी बाजारपेठा चालु राहिल्या तर अर्थिक लोभाची फार मोठी किंमत या शहराला चुकवावी लागू शकते असे सुज्ञ जनतेला वाटते आहे.
आता मदिना नगर येथे जे रुग्ण मिळून आले आहेत ते स्थानिक आहेत. त्यामुळे, त्यांच्या संर्कात कोण-कोण आले आहे. तसेच हे बाधित रूग्ण कोणाच्या संपर्कात आहे याचा शोध सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून एकही स्थानिक नागरिक कोरोना बाधित नव्हता. त्याचा प्रसार आता लोकल पातळीवर होऊ लागला आहे. त्यामुळे, नागरिकांनीच ठरवायचे आहे. की, बाजारपेठा चालु ठेवायच्या की बंद, बाजारात जायचे की नाही, हकनाक रस्त्यावर उतरायचे की नाही. काही झाले तरी संगमनेरचे नागरिक सुज्ञ आहे. त्यामुळे, ते एकत्र येऊन प्रशासनाला निर्णय कळवतील. मात्र, आता स्वत:च्या आरोग्यासाठी प्रशासनावर वारंवार अवलंबून राहणे, ते करतील तेव्हा पाहू या विचारांना थोडे बाजुला ठेऊन योग्यतो निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण, प्रशासन आता सांगून शिकवून वैतागले आहे. त्यांची नगरिकांपुढे हतबलता झाली आहे. तेच तेच सांगून देखील कोणी नियमांचे पालन करायला तयार नाही. म्हणून तर प्रांताधिकारी यांनी देखील फार मोठी खंत व्यक्त केली आहे. तर तहसिलदार रोज जनतेला आवाहन करीत आहे. मात्र, त्यांच्या विनंतीचा फायदा तुम्हा आम्हाला आहे हे जनता लक्षात घ्यालयला तयार नाही.
एकीकडे अकोले तालुक्यात सहा रुग्ण झालेले असताना तेथील व्यपारी व नगरिकांनी स्वयंस्पुर्तीने अकोले बंद ठेवले आहे. तर राजूर येथे फक्त एक संशयीत महिला गावात फिरुन गेली तर त्यांनी पाच दिवस गाव बंद करुन रस्ते सॅनिटाईझ केले. त्यामुळे, आता ग्रामीण भागात देखील त्याचे गांभीर्य वाढू लागले आहे. त्यामुळे, आज परिस्थिती अटोक्यात आहे तर तत्काळ योग्य निर्णय घेतला पाहिजे असे अनेकांना वाटते आहे.
दरम्यान आज नगर जिल्ह्यात नऊ अहवाल पॉझिटीव्ह आले आहेत. त्यात संगमनेर दोन तर अकोले तालुक्यातील पिंपळगाव खांड येथील एक, पारनेर, शेवगाव, राहाता अशा ठिकाणी एकूण नऊ जणांचा सामावेश आहे.
अत्यंत महत्वाचे
 संगमनेर शहरातील हॉटस्पॉट प्रतिबंध हटविल्यानंतर आज बाजारपेठ उघडण्याचा पहिला दिवस होता यावेळी असे निदर्शनास आले की सामान्य नागरिकांनी बाजारपेठेत एकाच वेळी फार मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली होती.  बाजारपेठेत येताना नागरिक सामाजिक अंतराचे पालन करीत नव्हते, अनेक नागरिक मास्क न लावता बाजारपेठेत फिरत होते। दुचाकी वाहनावर एकाच व्यक्तीने स्वार होऊन सामाजिक अंतराचे पालन करायचे असतानाही दुचाकीवर दोन किंवा तिन स्वार झालेले होते, दुकानदार देखील सामाजिक अंतराचे पालन करीत नसल्याचे लक्षात आले ।।सर्व नागरिकांना विनंती करण्यात येत आहे की व करोना विषाणू संसर्गाचा  धोका अजून संपलेला नाही तरी नागरिकांनी अनावश्यक  बाजारपेठेत नये, जीवनावश्यक वस्तूसाठी जायचेच असल्यास जाताना  सामाजिक अंतराचे कसोशीने पालन करावे,बाहेर पडताना चांगला मास्क लावावा ,अनावश्यक रित्या बाजारपेठेत  फिरू नये, अति जोखमीच्या व्यक्ती जसे पासष्ट वर्षे वयावरील व्यक्ती मधुमेह उच्चरक्तदाब गर्भवती महिला बालक यांनी बाजारपेठेत मुळीच जाऊ नये,। प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे तंतोतंत पालन करावे।। कृपया आपली स्वतःची काळजी घ्या व प्रशासनास सहकार्य करावे।
- आपला नम्र  
-  शशिकांत मंगरुळे  (उपविभागीय अधिकारी संगमनेर)

- सुशांत पावसे
महेश जेजुरकर
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------



(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 444 लेखांचे 44 लाख वाचक)