अकोल्यातील राजूर आणि समशेपुरसाठी गुड न्युज! सर्व रिपोर्ट निगेटीव्ह, पेशन्ट सुखरुप घरी येणार!


सार्वभौम (संगमनेर) : 
                            अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे मुलूंड येथून आलेल्या एका व्यक्तीस कोरोनाचा बाधा झाली होती. त्यामुळे गावातील काही भाग सील करण्यात आला आहे. तर 30 ते 40 जणांना शाळेत क्वारंटाईन करण्यात आले आहे. तसेच बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेली राजूर येथील महिला व समशेरपूर येथील संशयित व्यक्ती या सर्वांचे अहवाल निगेटीव्ह आले असून तालुक्यासाठी ही एक आनंदाची बातमी आहे. इतकेच काय! तर जो कोरोना बाधित व्यक्ती होता, त्यांची प्रकृती अगदी ठणठणीत असून त्यांचा पुन्हा एकदा स्वॅब घेऊन त्याच्या अहवाल पाहून त्यांना घरी सोडण्यात येणार आहे. त्यामुळे, तालुक्याची चिंता दूर झाली आहे.
                 
  याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोल तालुक्यातील लिंगदेव येथे एक कोरोनाबाधित रुग्ण सापडला होता. खरंतर त्यांचे कौतुक केले पाहिजे. की त्यांनी स्वत: काळजी घेऊन या आजाराची बाधा इतरांना लागू दिली नाही. तसेच प्रशासनाने तत्काळ योग्य उपायोजना केल्या त्यामुळे लिंगदेव सुरक्षित राहू शकले. त्या पाठोपाठ ढोकारी येथील सुशिक्षित तरुणाचे देखील आभार मानले पाहिजे की, त्याने मुंबईहून आल्यानंतर थेट घर गाठले नाही. एक जागरूक नागरिकाची भुमिका या बंधूने पार पाडली. त्यामुळे ढोकरी गाव अस्वस्थ झाले. मात्र, अस्तव्यस्थ झाले नाही.
                        हा प्रकार होतो कोठे नाहीतर समशेरपूर मुलूंड प्रकरणाने तालुक्यात खळबळ उडवून दिली. हा रुग्ण मंगळवार दि.19 मे रोजी गावी आला होता. त्याला सोमवार दि.25 रोजी नाशिकला हविण्यात आलेे. म्हणजे तब्बल आठवडाभर हा व्यक्ती गावात किंवा घरात वावरला. मात्र, त्याने जर काळजी घेतली नसती तर हा संसर्ग किती जणांना झाला असता याची विचार देखील करवत नाही. त्यामुळे त्यास संशय येताच त्यांनी स्वत:ची काळजी घेणे सुरू केले होते. त्यांच्या समझदार वागणुकीनेच आज समशेरपूर गाव सुरक्षित आहे. फक्त अपवाद आता पिंपळगाव खांड आहे. तेथील परिस्थिती बिकट असल्याचे दिसते आहे. मात्र, अकोल्याचे प्रशासन खंबीर आहे. ते नक्कीच कोरोनाचे खांड करतील, त्यामुळे स्थानिक नागरिकांनी घाबरुन जाऊ नये.
                             तर राजूर येथील महिलेच्या बाबात फार दक्षता घेण्यात आली होती. ही व्यक्ती बाधीत आहे असे धरुनच गावाने दक्षता घ्यायला सुरूवात केली होती. गाव एक ना दोन तब्बल पाच दिवस बंद करण्यात आले आहे. ती ज्या मार्गाने गेली ते रस्ते निर्जतुकीकरण करण्यात आले होते. मात्र, आज या महिलेचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. मात्र, केळुंगण परिसरात मुंबईहून ओल्या दोन व्यक्तींना तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती मिळाली आहे. तुर्तस अकोले तालुक्यात कोरोना हा चांगलाच अटोक्यात आहे. आतातर तीन दिवस अकोले बंद आहे. त्यामुळे अधिक फायदा शहराला होणार आहे.
दरम्यान लिंगदेव येथील कोरोना संदर्भात रोखठोक सार्वभौमने जे वृत्तांकन केले होते. त्यावेळी बाधित व्यक्तीच्या नातेवाईकाने आमच्या प्रतिनिधीस अपशब्द वापरले होते. त्याबाबत पोलीस महानिरीक्षक (आयजी) व पोलीस अधिक्षक (एसपी) यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. त्याबाबत अकोले पोलीस ठाण्याला सुचना आल्या आहेत. संबंधित व्यक्तीवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, अपशब्द वापरणार्‍या व्यक्तीने पोलीस ठाण्यात एक माफिनामा पाठविला आहे. झालेली चूक कबुल करुन पोलिसांच्या हाती अधिकचे पुरावे दिले आहेत.
-  अकाश देशमुख 
- शंकर संगारे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------




(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 444 लेखांचे 45 लाख वाचक)