वाघापुरात कुत्र्याने केली वाघाची शिकार.! अर्धा तास थरार, शेवटी तो शेवरीवर चढला..


सार्वभौम (संगमनेर)-
                      संगमनेर तालुक्यातील वाघापुर गावात काल दि. 9 मे रोजी सकाळी 7:30च्या सुमारास अतिसंवेदनशील समजणार्‍या कुत्र्याने चक्क वाघाचा पाठलाग केल्याची अजब व आश्चर्यचकीत प्रकार पहायला मिळाला. संगमनेर शहरालगत असणार्‍या वाघापूर येथे गव्हाळी वस्तीवर अण्णासाहेब लहानू शिंदे यांच्या घराजवळ सकाळच्या सुमारास बिबट्याचे बछडे  निदर्शनास आले. त्याक्षणी घरातील कुत्र्याने त्या बछड्याचा पाठलाग केला. आणि बछडे सरासर शेवरीच्या झाडावर चढले. हे कुत्रे त्या शेवरीजवळ जावून झाडावर असणार्‍या वाघावर भुंकत राहिले. त्यांच्यातील हा प्रकार जवळजवळ अर्धातास  चालु होता. 
                         या कुत्र्याच्या तत्परतेमुळे गोंधळून गेलेल्या बिबट्यावर संकटच कोसळले.दरम्यान ही सर्व घटना वस्तीवरील लोकांनी पाहिल्यानंतर एकच गर्दी उसळली आणि गर्दी केलेल्या लोकांमध्ये अनेक चर्चेना उधाण आले. वैतागलेला बिबट्या आता कुत्र्यावर हल्ला करील असे वाटू लागले होते. मात्र, या घटनेला वेगळीच दिशा मिळाली. चक्क बिबट्याने या कुत्र्यापुढे माघार घेत झाडावरून कुत्र्याच्या विरुद्ध दिशेला झेप घेत शेजारील दाट गिनी गवताचा आश्रय घेतला. परंतु कुत्र्याने तर कमालच केली. बिबट्याचा पाठलाग करत त्याला तेथुन धुम ठोकण्यास भाग पाडले. काही दिवसांनपुर्वी याच परिसरातील देवगाव येथे बिबट्याने शेतकर्‍यावर हल्ला केला होता. या परिसरात नेहमीच बिबट्याचा वावर असल्याचे स्थानिकांकडून बोले जात आहे.
                          नेटकर्यांनी ही घटना कॅमेरात कैद करून सोशल मीडियावर व्हायरल केली. परंतु दोन किलोमीटर अंतरावर असलेले वनविभाग या घटनेकडे दुर्लक्ष करत असल्याचे पहायला मिळत आहे. एकीकडे याच परिसरात रायते येथे वनविभागाची गाडी दिवा लावून फेर-फटके मारत असते.त्यामुळे लोकांची धाकधूक वाढवत असते. संपूर्ण महाराष्ट्रात या घटनेचा व्हिडीओ व्हयरल झाला पण वनविभागाणे याची साधी विचारपूस देखील केली नाही. मात्र, त्यांनीही याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
                           ही घटना घडून 30 तास उलटून ही तेथे वनविभागाचे कुठलेच ठोस पावले उचल्याची दिसून आले नाही. अद्यापही तेथे पिंजरा लावण्यात आलेला नाही. या परिसरात नेहमीच शेतकर्‍यांना शेतीचे काम करावा लागत आहे. त्यामुळे येथील लोक जीव मुठीत धरून काम करत आहे. बिबट्या भर दिवसाही दिसत असल्याने काही शेतकरी शेतीत जाण्याचे टाळत आहे. त्यामुळे, शेतीचे काम ही ठप्प झाली आहेत. या परिसरात पिंजरा लावण्याची मागणी सुनील शिंदे, शरद शिंदे, अण्णासाहेब शिंदे, भाऊसाहेब शिंदे, बबन शिंदे, सुरेश शिंदे यांनी केली आहे.

सदर परिसरात लोकवस्ती तुरळक असली तरी तेथे शेती पूरक व्यवसाय करणारे लोक अधिक आहे. त्यामुळे अनेक जण या परिसरात नेहमीच ये-जा करत असतात. या परिसरात लहान मुलांची संख्या देखील अधिक असल्याने जीव मुठीत धरून घरात बसवावे लागत आहे. त्यामुळे, कुत्र्याने वाघाला खाल्यानंतर वनविभागाला जाग येणार आहे. की, वाघाने एखादी मनुष्यहानी केल्यानंतर शहाणपण येणार आहे. देव जाणे.!
- सुनील शिंदे

सुशांत पावसे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)