संगमनेरच्या काही भागात कंटेन्मेंट व बफर झोन, 24 तारखेस हॉटस्पॉट उठणार! परंतु संगमनेर 27 ला सुरू होणार! मुस्लिम बांधवांचा अभिमानास्पाद निर्णय
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहरात कोरानाला आळा घालण्यासाठी आता मुंबई-पुण्यासारख्या ठिकाणी वापरलेल्या पद्धती आमलात आणल्या जाऊ लागल्या आहेत. असे केल्याने तरी हा रोग अटोक्यात येईल असे वाटू लागले आहे. कारण, आत शहरातील दोन क्षेत्रातील नऊ कॉलण्यांमध्ये कंटेन्मेंट झोन दोन ठिकाणी सात कॉलण्यांमध्ये बफर झोन लागु करण्यात आला आहे. त्यामुळे, येथे अत्यावश्यक सेवा वगळता काहीच सुरू राहणार नाही. तर काही ठिकाणी प्रशासन स्वत: सेवा देणार आहे. या व्यतिरिक्त उद्या म्हणजे शनिवार 23 मे रोजी येथील हॉट्स्पॉट उठत आहे. म्हणजे 14 तारखेला हौसे-नौसे-गौसे रस्त्यावर यायला मोकळे झाले. असे काशी गृहीत धरू नये. कारण, 25 तारखेला रमजान ईद असल्यामुळे काही मुस्लिम बांधवांनी स्वयंस्पुर्तीने प्रशासनाकडे जाऊन त्यांना बाजारपेठा खुल्या न करण्याची विनंती केली आहे. त्यामुळे, संगमनेर 27 तारखेला सुरू होण्याची शक्यता प्रशासनाने वर्तविली आहे.
संगमनेरमध्ये 23 तारखेला रात्री 12 वाजता हॉटस्पॉट उठणार आहे. मात्र, अन्य दोन ठिकाणी कंटेन्मेंट व बफर झोन लागू करण्यात आले आहे. त्यात कंटेन्मेंट झोनमध्ये रहीमतनगर, उम्मत नगर, डोंगरमळा, पठारे वस्ती तर दुसर्या क्षेत्रात इस्लामपूर, कुरण रोड, विजय नगर, अपना नगर, गुंजाळ आखाडा अशा नऊ कॉलण्यांचा सामावेश आहे. तर बफर झोनमध्ये पहिल्या परिसरात भारत नगर, जुना जोर्वे रोड, अलकानगर, कोल्हेवाडी रस्ता, वाबळे वस्ती तर दुसर्या परिसरात बिलालनगर, पुनर्वसन कॉलनी अशा सात ठिकाणांचा सामावेश आहे. या परिसरातील रविवार दि.24 मे रोजी पासून तर 1 जुनच्या 12 वाजेपर्यंत सर्व बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहे. बफर परिसरात फक्त अत्यावश्यक सुरू राहणार आहे. तर अन्य सेवा प्रशासनाकडून पुरविल्या जाणार आहे.दरम्यान गेल्या काही दिवसांपासून संगमनेरला कोरोनाने फार छळल्याचे दिसते आहे. त्यामुळे, गर्दी टाळून बाजारपेठा भरणार नाहीत यासाठी संगमनेरच्या मुस्लिम बांधवांनी फार चांगला निणर्य घेतला आहे. हा सर्व समाज घरात अगदी सर्व निमय पाळून चार भिंतीच्या आत नमाज पठण करणार आहेत. कारण, आजवर जे संगमनेरकर व प्रशासनाने जे काम केले आहे. त्यावर पाणी फिरायला नको. त्यामुळे मुस्लिम संघटनांनी हा निर्णय घेतला आहे. कारण, सोमवार दि. 25 रोजी ईद आहे. त्याच दिवशी हॉटस्पॉट खुले होत आहे. शासन नियमानुसार बाजारपेठा खुल्या करता येणार आहे. असे झाले तर लोक खरेदी करण्यासाठी बाजारात गर्दी करतील. परिनामी कोरोनाचा प्रदुर्भाव होण्यास हातभार लागू शकतो. त्यामुळे या बांधवांनी स्वयंप्रेरणेना प्रशासनाशी संपर्क करुन हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे, मुस्लिम बांधवांचे सर्वत्र आभार मानले जात असून त्यांच्या निर्णयाचे कौतुक केले जात आहे.