अकोले तालुक्यातील ढोकरी येथे दुसरा कोरोना बाधित रूग्ण! प्रशासनाची धावपळ सुरू.!


सार्वभौम (अकोले)
                   अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे एका शिक्षकानंतर ढोकरी येथील एका व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचा धक्कादायक अहवाल समोर आला आहे. तर जो लिंगदेवच्या शिक्षकाचा अहवाल पाठविण्यात आला होता. तो देखील पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. या अहवालात एकूण सात व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याचे अहवालात म्हटले आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातून लिंगदेव येथे आलेला तो शिक्षक घाटकोपर येथून आलेला आहे. तर ढोकरी येथे असलेला व्यक्ती देखील 'मुंबई’ रिटण असल्याची माहिती मिळते आहे. त्यामुळे, अकोले तालुक्यात आता दोन रुग्ण झाले असून पुन्हा दुसरे गाव सिल करण्यासाठी प्रशासन सज्ज झाले आहे.
                              दरम्यान एक महत्वाची गोष्ट अशी की, हा व्यक्ती मुंबईहून आल्यानंतर तो त्याच्या घरी आला होता की नाही याबाबत उलटसुलट चर्चा आहे. मात्र, हा तरुण शनिवारी (दि.23) अकोल्यात आला होता. तो पुर्वीच आजारी असल्यामुळे त्याला रूग्णालयात हलविण्यात आले होते. त्याची तपासणी केली असता त्याला कोरोनाचे सिमटन्स आढळून येत होते. दरम्यात त्याला त्रास झाल्यानंतर डॉक्टरांना त्याचा संशय बळावला आणि त्यास तत्काळ जिल्हा रूग्णालयात स्वॅब घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. आज दोन दिवसांनी त्याचे त्यांचे आज (दि.25) रिपोर्ट आले असता तो पॉझिटीव्ह असल्याचे समोर आले आहे.
                         आता प्रशासन पुन्हा सज्ज झाले असून हा मुंबईचा वानवळा तालुक्यातील अधिकार्‍यांना पळता भुई थोडी करणार आहे. इतकेच काय! तर ज्या लिंगदेवच्या व्यक्तीचा खाजगीत रिपोर्ट घेण्यात आला होता. तो देखील पॉझिटीव्ह आल्याचे अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे तालुक्यात आता दोन कोरोना पॅझिटीव्ह रुग्ण झाले आहेत. त्यामुळे, नागरिकांनी आता घाबरुन न जाता काळजी घेणे महत्वाचे आहे. दरम्यान ढोकरीचा मुलाग त्याच्या गावाच्या संपर्कात नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.