अकोल्यातील ढोकरी पुर्णत: सुरक्षित, मात्र, संगमनेरच्या पेमगिरीत वाहन चालकाचा शोध सुरू!
सार्वभौम (अकोले) :
अकोले तालुक्यातील ढोकरी या गावचा तरुण मुबईतून घणसोली येथून निघाला होता. त्याच्या मामाचा मुलगा औरंगपूूर येथील रहिवासी असून तो मुंबईत उल्हासनगर येथे पोलीस आहे. त्यामुुळे या पोलीस कर्मचार्यानेच या चारा वाहकाचा शोध लावला व त्यास अकोल्याला मार्गस्त केले. ही गाडी वाशेरे गावापर्यंतच होती. तेथून एका पिकअपमध्ये त्याने रूग्णालयापर्यंतचा प्रवास केला आहे. तर उल्हासनगरचा चारा वाहक हा मुळत: संगमेनर तालुक्यातील पेमगिरी येथील असून त्याचे व्यवसाय उल्हासनगर येथे सेट झालेला आहे. तो त्याच्या छोटा हात्तीतून चारा व भाजीपाला वाहण्याचे काम करतो. त्यामुळे, त्याच्या कुटूबापर्यंत संगमनेर प्रशासन पोहचले आहे. तर ढोकरी व औरंगपूर व वाशेरे ही तिन्ही गावे सुरक्षित असून ते कंटेनमेंट करण्याचे किंवा बंद करण्याची काही आवश्यकता नाही. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, ढोकरी येथील एक 35 वर्षीय तरुण घोणसोली येथे कामानिमित्त राहत होता. मात्र, कोविड-19 चे संकट उभे राहिले आणि देशात लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे लाखो लोक वेगवेगळ्या ठिकाणी अडकून गेले होते. त्यातच हा तरुण देखील अडकला होता. मात्र, जसजसे लॉकडाऊन शिथील होत गेले. तसतसे लोक घराच्या बाहेर पडले. त्यामुळे हा ढोकरीचा तरुण देखील घराकडे चालता झाला. त्याने पहिला आसरा त्याचा उल्हासनगर येथील पोलीस नातेवाईक यांचा घेतला. तेथे त्याने काही काळ गुजारा केला. त्यानंतर पोलीस महोदयांनी त्यास एक पर्याय म्हणून संगमनेर तालुक्यातील पेमगिरी येथील एका चारा वाहणार्या गाडी चालकास विनंती केली. पोलिसांच्या विनंतीने या वाहन चालकाने या मुलास वाहनात बसविले आणि वाशेरे येथे आणून सोडले.
आता घरी कसे जायचे असा प्रश्न पडल्यानंतर तो वाशेरे फाट्यावर उभा राहिला. दरम्यान एक पिकअप गाडीला हात करुन त्याने अकोले तालुक्याचे रुग्णालय गाठले. दरम्यान त्याने त्याच्या वडीलांना माहिती दिली. ते रुग्णालयात आल्यानंतर त्यांनी ढोकरी येथील विकास शेटे आणि अन्य मित्रांना फोन लावले. त्यानंतर शेटे यांनी आरोग्यसेविका आणि डॉक्टर यांच्याशी संपर्क साधला. कोरोना म्हणजे घाबरुन जाण्याचा कारण नाही, मात्र, आपण सुज्ञ आहोत त्यामुळे दक्षता घेणे महत्वाचे आहे. हे समजून सागितले. तर हा मुलगा आणि त्यांचे वडील दोघे शिक्षित असून त्यांना एकही वर्तन आडबंगपणाचे केले नाही. उलट आपल्यामुळे इतरांना धोका नको असे समजून घेत त्यांनी तपासणी करण्यासाठी थेट जिल्हा रूग्णालय गाठले. त्यामुळे ढोकरी हे गाव पुर्णपणे सुरक्षित आहे. तेथे कोणी अफवा पसरु नये!
तर जे मुलगा आणि त्याचे पालक यांनी जी भूमिका घेतली, ती खरोखर सामंजस्याची आहे. त्यांचे गावाने कौतुक केले पाहिजे. त्यांच्याशी योग्य बरताव केला पाहिजे. कितीही वाईट प्रसंग आला तरी आपला गावच आपल्याला दिसत असतो. त्यामुळे, कोणी कोणाचा तिरस्कार करणे चूक आहे. मात्र, जे बाहेर गावाहून आले आहेत. त्यांनी तितकी नम्रता अंगी बाळगली पाहिजे. माहीती लपवून ते स्वत:च्या कुटूंबाचे नुकसान तर करतातच मात्र, समाजाचे देखील नुकसान करतात. त्यामुळे, प्रत्येकाने सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे.या ढोकरीच्या प्रकरणानंतर संगमनेर प्रशासनाने सावध भुमिका घेतली आहे. संगमनेर तहसिलदार यांनी पेमगिरीच्या कुटूंबाची चौकशी करणे सुरू केले आहे. त्यामुळे, तेथे विशेष असा कोणताही धोका नसल्याचे समोर येत आहे. त्यामुळे, नागरिकांनी घाबरून जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
जो मुलगा ढोकरी येथील आहे. तो मुंबईहून आल्यानंतर थेट रुग्णालयात गेला होता. त्याचा त्याच्या गावाशी कोणताही संपर्क आलेला नाही. तो एक सुशिक्षित तरूण असून त्याने योग्यते सहकार्य केले आहे. त्याने संपुर्ण घटनाक्रम सांगितला असून गावाशी त्याचा संपर्क नसल्याचे लक्षात येते. तेथे प्रशासनाने भेट देऊन चौकशी केली असून ते गाव कंटेनमेंट करण्याची गरज आहे. असे सद्या तरी वाटत नाही. त्यामुळे तेथील नागरिकांनी घाबरुन जाऊ नये. तसेच जे लोक बाहेरुन येत आहे. त्यांनी कोणतीही माहिती लपवून ठेऊ नये. हा स्वत:च्या व तालुक्याच्या आरोग्याचा प्रश्न आहे. त्यामुळे प्रत्येकाने सहकार्य करावे.- मुकेश कांबळे (तहसिलदार, अकोले)
लिंगदेवच्या कोरोना बाधिताच्या बातमीचे वृत्तांकन केल्याप्रकरणी त्याच्या नातेवाईकांनी बातमी केल्याचा राग मनात धरुन सार्वभौमच्या प्रतिनिधीस अपशब्द वापरुन धमकी दिली. याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिक्षीक नगर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. कडक कलमान्वये यात गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे.
(टिप) : रोखठोक सार्वभौम हे कोणाची गुलामी करणारे वृत्तपत्र अथवा पोर्टल नाही. हे सर्व केवळ सामाजिक हेतूने सुरू आहे. कोणाचे गोडगोड लिखाण करुण खर्यावर पांघरून घालायचे व खोटे गावभर मिरवायचे अशी वृत्ती नाही. वाचकांना जर यात काही स्वार्थ वाटत असता तर उगच 41 लाख वाचक झाले नसते. त्यामुळे, आमच्या प्रतिनिधींवर कोणी शिरजोर करण्याचा प्रयत्न करू नये. एक महत्वाची बाब म्हणजे जे काही छापले जाते ते तुमच्याच जवळचे किंवा माहितीदार असतात, त्यामुळे बातमी ही जनतेचा आवाज असते. ज्याला ते सत्य पचविण्याची ताकद नसेल त्याने बातम्या नाही वाचल्या तरी हरकत नाही.
कळवे
संपादकीय
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 426 लेखांचे 40 लाख वाचक)