संगमनेरात कोरोनाचा चौथा बळी! मुंबईहून आलेल्या महिलाचा मृत्यू!



सार्वभौम (संगमनेर) :
                       संगमनेर शहरात एका मुंबईहून आलेली कोरोनाबाधित महिला मयत झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यांना एका खाजगी रुग्णालयात तपासणी केली असता त्यांना काही सिमटन्स आढळून आले होते. त्यामुळे तिला परवा दि. 23 रोजी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले होते. आज तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. दरम्यान आज दि. 25 रोजी रात्री 9 वाजण्याच्या सुमारास ती मयत झाल्याची माहिती सुत्रांनी दिली. त्यामुळे, संगमनेरमध्ये कोरोना बाधित मयतांची संख्या चार झाली आहे.
                    याबाबत सविस्तर माहिती अशी की शनिवारी एका महिला संगमनेरमध्ये आली होती. कारण, ती मुंबईला जरा आजारी असल्यामुळे तिच्या भावाने तिला संगमनेरात आणले होते. दरम्यान प्रवासात तिला जास्त त्रास होऊ लागला होता. त्यामुळे ते जेव्हा संगमनेरात आले तेव्हा त्या ताईला भावाने एका देवी गल्ली परिसरातील एका रुग्णालयात दाखविले. डॉक्टरांनी तत्काळ तिला जिल्हा रूग्णालयात हलविले होते. मात्र, आज तिचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होंता. हे समल्यानंतर सायंकाळी उशिरा त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे.
दरम्यान ही महिला मुंबईला असतानाच पॉझिटीव्ह होती. त्यामुळे तिला संगमनेरात आल्यानंतर कोरोनाची लागण झाली नाही. हे स्पष्ट होते. तर तिकडून आणल्यानंतर त्यांना तत्काळ रूग्णालयात हलविले गेले. त्यामुळे त्या कोणाच्या संपर्कात आल्या नाही. हे संगमनेरसाठी महत्वाचे आहे. त्यामुळे कोणी घाबरुन जाऊ नये. असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
दरम्यान जी महिला आली होती, तिची तपासणी खाजगी रूग्णालयातील  एका व्यक्तीने घेतला होता. त्यांना स्थानिक प्रशासनाने जिल्हा रूग्णालयात हलविले आहे. तर जो मयत व्यक्तीचा भाऊ आहे. तो अद्याप त्याच्या घरी गेला नसून थेट हॉस्पिटलमधून जिल्हा रूग्णालयात गेला आहे. त्यामुळे, त्याच्यासह सर्व संपर्कातील नगरमध्ये आहे. त्यामुळे प्रशासनाने घेतलेली दखल खरोखर संगमनेरला कोरोना विरहीत करण्यासाठी तारूण जाणारी ठरली आहे.
तर या महिलेच्या मृत्युने संगमनेरच्या मयत यादीत एकने भर पडली असून ती संख्या चारवर गेली आहे. पहिला बळी धांदरफळ येथील ठरला तर त्यांच्यानंतर दोन निमोण येथील आणि ही महिला चौथी कोरोनाबाधित मयत ठरली आहे. मात्र, आता तरी नागरिकांनी थोडी सावधानता बाळगणे गरजेचे आहे. प्रशासनाच्या अथक परिश्रमानंतर संगमनेरचा कोरोना अटोक्यात आला आहे. त्यामुळे आता कोणी आजार आणि बाहेरुन आलेल्या व्यक्तींना लपविण्याचा प्रयत्न करु नये. जी असेल ती माहिती प्रशासनाला देऊन सहकार्य करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.
shushant pawse