संगमनेरच्या केळेवाडीत पाणी प्रश्न पेटला, कुर्हाडी आणि दगडाने फोडाफोडी! 29 जणांवर गुन्हे दाखल!
सार्वभौम (संगमनेर):
संगमनेर तालुक्यातील केळेवाडी येथे तलाव व बोरच्या पाण्याहून दोन दोन गटात वाद झाले होते. यात 29 आरोपींनी मोठा जमाव करुन कुर्हाड व दगडाने पाईपलाईनी फोडून टाकल्या. यात फार मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ही घटना रविवारी दि.24 रोजी दुपारच्या सुमारास घडली. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात 29 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस आरोपींच्या शोधत आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सुभाष बाजीराव लामखेडे (रा. केळेवाडी, ता. संगमनेर) यांची लघुपाठबंधारे परिसरात बोअर आहे. तर याच परिसरात एक पाझरतलाव आहे. त्याच्या पाण्याचा वाद सुरू आहे. त्याचे पाणी उचलले म्हणून हा वाद यापुर्वी अनेकदा पेटलेला आहे. दरम्यान रविवारी या वादाने रैद्ररुप धारण केलेे. याच परिसरातील लोक सुभाष लामखेडे यांच्या शेताजवळ जमले. हा फार मोठा जमाव होता. त्याच्या हातात काठ्या कुर्हाडी व दगडे होती. या सर्वांनी मिळून पाण्याच्या वादाच्या कारणाहून लामखेडे यांच्या शेतातील पाईपलाईन उध्वस्त केली. पाईपांवर कुर्हाडीचे घाव घालून त्यांना तंबी दिली. जशा तुमच्या पाईपाईन फोडल्या तसे तुम्हाला फोडून काढू अशी धमकी देत शिवीगाळ, दमदाटी करुन गेले. असे लामखेडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.याप्रकरणी 29 जणांना आरोपी करण्यात आले असून त्यात उत्तम भागा लामखेडे, मनाभाऊ वामन लामखेडे, विश्वास बाळु पाढेकर, प्रदिप उत्तम पाढेकर, दिगंबर युवराज पाढेकर, सागर सुनिल पाढेकर, दत्तात्रय रामदास पाढेकर, रावसाहेब बारकु पाढेकर, सखाराम रामभाऊ सामखेडे, बाळु बंडू पाढेकर, प्रविण बबलु लामखेडे, विकास बाळु पाढेकर, प्रशांत दिलीप पाढेकर, सुरज रावसाहेब पाढेकर, रोहन उत्तम पाढेकर, सुनिल मनाभाऊ पाढेकर, अविनाश बाळु पाढेकर, प्रतिक प्रविण लामखेडे, प्रविण बबन सामखेडे, मच्छिंद्र बबन लामखेडे, गौरव बाळाभाऊ लामखेडे, उत्तम खंजू लामखेडे, रामदास भागा लामखेडे, सुनिल खंडू पाढेकर, राजू पोपट लामखेडे, पवन पाढेकर, लहू गोपाळ पाढेकर, युवराज बारकू पाढेकर, दिलीप अर्जुन पाढेकर (सर्व रा. केळेवाडी, ता. संगमनेर) यांची नावे सामाविष्ठ करण्यात आली आहेत. यांच्यावर कोविड कालमांसह जमावबंदी आणि अन्य कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.