अकोले तालुक्यासाठी खुशखबर! लिंगदेवचे सात अहवाल निगेटीव्ह! परंतु....


सार्वभौम (अकोले) : 
                         अकोले तालुक्यातील लिंगदेव येथे एका शिक्षकाला कोेरोनाची बाधा झाली होती. त्यानंतर प्रशासनाने खबरदारी म्हणून 11 जणांना जिल्हा रूग्णालयात स्वॅब घेण्यासाठी पाठविले होते. मात्र, यातील आठ अहवाल आले आहेत त्यापैकी शिक्षक पॉझिटीव्ह असून सात जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. त्यामुळे, लिंगदेव गावकर्‍यांसह तालुक्यातील जनतेने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. मात्र, तरी देखील गाावात कंटेनमेंट झोन कायम राहणार आहे. तसेच आणखी काही संशयितांची तपासणी होण्याची शक्यता आहे. अशी माहिती प्रशासनाने दिली आहे.
                         याबाबत सविस्तर माहिती अशी की, मुंबईहून एक शिक्षक लिंगदेव येथे आले होते. त्यांना क्वारंटाईन केले असता अवघ्या काही दिवसात त्यांची रवाणगी घरी करण्यात आली होती. मात्र, त्यांना घरी गेल्यानंतर त्रास होऊ लागला आणि ते थेट संगमनेर शहरातील एका बड्या राजकाराण्याच्या रूग्णालयात गेले. तेथे त्यांनी उपचार घेऊन ते घरी आले. त्यानंतर चकीत होणारी बाब अशी की, चक्क ते घरी आल्यानंतर त्यांच्या पाठीमागून त्या रूग्णालयात असणार्‍या खाजगी लॅबचे लोक त्यांच्या घरी आले. त्यांनी घरी येऊन त्या व्यक्तीची तपासणी केली व स्वॅब घेतले आणि ते निघून गेले. असे संदिग्ध म्हणणे प्रशासनाचे आहे. त्यानंतर तो कोणाच्या संपर्कात आला होता. याची मात्र, कोणाला कल्पना नाही. मात्र, त्यांचे रिपोर्ट पॉझिटीव्ह असल्याचे समजताच स्थानिक आरोग्य प्रशासन जागे झाले. पहिले तर ही महिला आहे की पुरूष हेच प्रशासनाला माहित नव्हते, येथून त्यांची सुरूवात होती. त्यांनी माध्यमांना एक महिला कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे सांगून टाकले. मात्र, नंतर पुन्हा माध्यमांना फोन करू सांगण्यात आले की, ती महिला नसून पुरूष आहे. त्यामुळे अनेकांचा संभ्रम निर्माण झाला होता.
                          दरम्यान सायंकाळी प्रशासनाची एकच धांदळ उडाली. त्यांना पहिल्यांदा कोरोना बाधित व्यक्ती आणि त्यांचा मुलगा यांना जिल्हा रूग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्या संपर्कात असणारे असे 11 जण तपासणीसाठी पाठवून दिले. आज त्यांतील सात रिपोर्ट प्रशासनाला प्राप्त झाले आहे. यातील सर्व अहवाल निगेटीव्ह आले असून तालुक्यासाठी ही महत्वाची व खुशीची खबर आहे.
                दरम्यान या आठ मध्ये शिक्षक पॉझिटिव्ह मिळून आले असून सात जणांचे रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत. मात्र, तीन जणांचे रिपोर्ट उशिरा मिळणार आहे. त्याबाबत कारण अद्याप स्पष्ट झाले नाही. त्यामुळे नागरिकांना एक आनंदाची बातमी मिळाली असली तरी जोवर तीन रिपोर्ट येत नाही. तोवर धाकधूक कायम राहणार आहे.

लिंगदेवच्या कोरोना बाधिताच्या बातमीचे वृत्तांकन केल्याप्रकरणी त्याच्या एका नातेवाईकांनी बातमी केल्याचा राग मनात धरुन सार्वभौमच्या प्रतिनिधीस अपशब्द वापरुन धमकी दिली. याप्रकरणी पोलीस महानिरीक्षक व पोलीस अधिक्षीक नगर यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्याच्यावर कडक कलमान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. याबाबत स्थानिक पोलिसांनी दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा वरिष्ठांच्या रोषाला त्यांनाही सामोरे जावे लागणार आहे.

(टिप) : रोखठोक सार्वभौम हे कोणाची गुलामी करणारे वृत्तपत्र अथवा पोर्टल नाही. हे सर्व केवळ सामाजिक हेतूने सुरू आहे. कोणाचे गोडगोड लिखाण करुण खर्‍यावर पांघरून घालायचे व खोटे गावभर मिरवायचे अशी वृत्ती नाही. वाचकांना जर यात काही स्वार्थ वाटत असता तर उगच 41 लाख वाचक झाले नसते. त्यामुळे, आमच्या प्रतिनिधींवर कोणी शिरजोर करण्याचा प्रयत्न करू नये. एक महत्वाची बाब म्हणजे जे काही छापले जाते ते तुमच्याच जवळचे किंवा माहितीदार असतात, त्यामुळे बातमी ही जनतेचा आवाज असते. ज्याला ते सत्य पचविण्याची ताकद नसेल त्याने बातम्या नाही वाचल्या तरी हरकत नाही.
कळवे
संपादकीय 

सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 426 लेखांचे 40 लाख वाचक)