अकोले तालुक्यातील धामणगाव पाट येथे कोरोनाचा पेशन्ट.!
सार्वभौम (अकोले) :
घाटकोपर येथून धामणगाव पाट येथे आलेल्या ४९ वर्षीय व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्याचा अहवालही आज स्थानिक प्रशासनाला मिळाली आहे. आज या कोरोना पॅाझिटीव्ह रिपोर्टने तालुक्यात काही प्रमाणात भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. आता तालुक्यात कोरोना पॅाझिटीव्ह रुग्णांची संख्या आता ९ झाली असून मुबईहून येणाऱ्यांनी तालुक्यात आता अधिक धोका वाढू लागला आहे.