दारुड्यांसाठी खुशखबर.! नगर जिल्ह्यात मद्य विक्रीसाठी परवानगी, पण या असतील अटी व शर्ती..
सार्वभौम (अहमदनगर) :
अहमदनगर जिल्ह्यात मद्य विक्रीसाठी जिल्हाधिकारी यांनी परवानगी दिली आहे. मात्र, त्यासाठी काही अटी व शर्ती घातल्या आहेत. जो कोणी मद्य घेण्यासाठी येणार आहे. त्याला सर्दी, खोकला, ताप अशी लक्षणे असतील तर त्यास मद्याची विक्री करु नये. सोशल डिस्टंसिंगचे कसोशीने पालन करावे. तर ग्रामीण भागातील सर्व घाऊक विक्रेते यांचे व्यावहार चालु करण्यात आले आहेत. कॅन्टोन्मेन्ट बोर्डाचा एरिया सोडून सर्व ठिकाणी हा व्यावहार करता येणार आहे. मात्र, त्याची मर्यादा सायंकाळी पाच नंतर बंद असणार आहे.
![]() |
काय चालु काय बंद! |
दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने जे नियम ठरवून दिले आहेत त्यांचे पालन करणे अनिवार्य असणार आहे. जे कर्मचारी दुकानावर बसणार आहे. त्यांची वैद्यकीय तपासणी करणे महत्वाचे आहे. तर त्यांची कमर्शियल स्कॅनिंग करावे लागणार आहे. घाऊक विक्रेत्यांना 50 टक्के मनुष्यबळावर काम करावे लागणार आहे. तसेच सिलबंद माल विकण्यास मान्यता देण्यात आली आहे. हे नियम असे असले तरी महानगरपालिका व नगरपंचायत तथा नगरपालिका यांच्या हाद्दीत जी दुकाने सार्वजानिक ठिकाणी व संकुलनात तसेच बाजारात आहे. त्या दुकानांना उघडण्यास बंदी घातली आहे. तर निवासी संकुल, कॉलनी दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली आहे. जी दुकाने उघडली आहेत. त्यांच्या समोर पाच पेक्षा जास्त ग्राहक असू शकत नाही. तर त्यांच्यात सहा फुटाचे अंतर (वर्तुळ) असणे गरजेचे आहे. असे झाले नाही तर त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. जी दुकाने उघडी केल्यानंतर प्रती दोन तासांनी तो परिसर निर्जुंतूकीकरण करणे अनिवार्य आहे. तसेच दुकानात जे ग्राहक येतील त्यांना सॅनिटायझर किंवा हॉण्डवॉश उपलब्ध करुन देण्याची जबाबदारी दुकानदाराची असेल. सिलबंद मद्यविक्रीसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 पर्यंत दुकाने सुरू राहण्याचे आदेश जिल्हाधिकार्यांनी काढले आहेत. जेथे मद्य विकत घेतले आहे तेथे मद्य पिता येणार नाही. अन्यथा कडक कारवाई केली जाणार आहे. तसेच सिलबंद किरकोळ विक्री करणार्या दुकानांच्या प्रवेशद्वारावर दर्शनिय भागात छापावे की,
दुकान 10 ते 5 या वेळत सुरू राहील,
एकापेक्षा पाच जणांनी दुकानासमोर थांबू नये.
ग्राहकाने व विक्रेत्याने मास्क वापरणे अनिवार्य आहे.
ग्रहकास सर्दी खोकला ताप असणारा व्यक्ती दुकानात येणार नाही.
दुकानात मद्य प्राशन करता येणार नाही.
त्या परिसरात थुंकता येणार नाही,
सुचना : कृपया कोणी बातमी कॉपी करु नये!
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 27 लाख वाचक)