प्रेमसंबंध असल्याचे सांगून संसार मोडण्याचा प्रयत्न, दोघांवर कोयत्याने वार, गुन्हा दाखल, अकोल्याचा फिर्यादी, संगमनेरचा आरोपी
सार्वभौम(संगमनेर)-
लग्नापुर्वी आमचे प्रेमसंबंध असल्याचा सांगत संगमनेर तालुक्यातील माळेगाव येथे दोघांना कोयत्याने मारहाण करण्यात आली. इतकेच काय तर अंगावर पेट्रोल जाळून टाकण्याची धमकी दिल्याची घटना शुक्रवार दि.3 मे रोजी घडली. यात दोघे जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. याप्रकरणी संगमनेर ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पिंट्या उर्फ वेणुनाथ माधव काळे (रा. माळेगाव हवेली, ता. संगमनेर) तर सोमनाथ रामदास खालटे (रा. आष्टी, जि. बीड) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, अकोले तालुक्यातील कोतूळ येथे राहणारे एका कुटूंब सध्या समनापूर परिसरात राहण्यासाठी आहे. या कुटूंबातील तरुणाने श्रमीक नगर संगमनेर येथील एका मुलीसोबत लग्न केले होते. मात्र, आठ माहिन्यानंतर दोन तरूण आले व त्यांनी संबंधित मुलीच्या पती व दिरास सांगितले की, आमचे हिच्यासोबत प्रेम संबंध आहे. त्यामुळे तू हिला सोडून दे. तिला एकटीला रहूदे. या प्रकारानंतर संतप्त पती व दिर यांनी आरोपींना समजून सांगत काढून दिले होेेते.
दरम्यान हा वाद विकोप्याला गेला. आरोपी यांच्याकडे या महिलेची स्कुटी गाडी होती. ती आणण्यासाठी गेले असता काळे व खालटे यांनी शिवीगाळ दमदाटी करुन दोघांना मारहाण केली. तर, एक महिला व तिच्या दिराच्या डोक्यावर आणि हातावर कोयत्याने वार केले. जर आमच्या नादाला लागाल तर अंगावर पेट्रोल जाळून टाकू अशी धमकी देत त्यांनी जबरी मारहाण केली. दरम्यान याप्रकरणी दोघांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काल पोलिसांनी जखमींच्या जबाबानुसार खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.