संगमनेर शहरात फालुदा विकणारा कोरोनाचा पाचवा बळी
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर शहरात मदिनानगर परिसरात 55 वर्षींय रुग्णाचा मृत्यु झाल्याची माहिती नुकतीच समोर आली आहे. हा व्यक्ती फालुदा विकत असल्याची माहिती प्रशासनाला समजली आहे. त्यामुळे त्यांनी शहरात खबरदारी घेण्यास सुरूवात केली असू काही परिसर सील केला आहे. आज सकाळी संगमनेरचे दोन रुग्ण कोरोनाबाधीत मिळून आले होते. त्यातील हा पुरुष असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, सद्या संगमनेर शहरात मदिना नगर येथे दोन स्थानिक रुग्ण कोरोना बाधित मिळून आले होतेे. त्यामुळे, त्यांच्या संर्कात कोण-कोण आले आहे. तसेच हे बाधित रूग्ण कोणाच्या संपर्कात आहे याचा शोध सुरू केला होता. त्यानंतर प्रशासनाच्या लक्षात आले की, जो 55 वर्षींय पुरूष होता. तो फालुदा विक्री करणारा होता. त्यामुळे त्याला कोणाच्या माध्यमातून लागण झाली. हे नव्याने सांगायला नको.
आज शुक्रवार 29 रोजी दुपारी तो मयत झाला आहे. त्यामुळे त्याच्या संपर्कात कोण आले होते याचा शोध सुरू आहे. तर ज्या दुसर्या 40 वर्षींय महिलाला कोरोनाची लगण झाली आहे. त्यांचे पतीदेव यांचा खारीक विक्रीचा व्यवसाय आहे. ते मालेगाव येथून हा व्यवाहार करीत असल्याची प्राथमीक माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे. त्यामुळे मयत व्यक्तीच्या संपर्क व महिलेच्या सानिध्यात आलेल्या व्यक्तींचा प्रशासन कसून शोध घेत आहे. गेल्या काही दिवसांपुर्वी कोरोना रोखण्यात प्रशासनाला जे काही यश आले होते. त्यावर पुन्हा पाणी फिरले की काय असे वाटू लागले आहे. मात्र, तरी देखील प्रशासन जिगर हारले नसून त्यांना पुन्हा शोध मोहिम सुरू केली आहे.
- सुशांत पावसे