संगमनेरच्या निमोणची महिला पॉझिटीव्ह तर राशिनची मयत, जर मास्क वापरला असते तर...72 कोरोनाबाधीत!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील निमोण येेथे आणखी एका महिलेला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. मयत व्यक्तीच्या संपर्कात या महिलाचा पती आला होता. तर त्यांच्या संपर्कात त्यांची पत्नी आली होती. त्यामुळे, त्यांची तपासणी केली असता ही दोघे पॉझिटीव असल्याचे समोर आले आहे. यात सुदैव असे की, त्यांच्यासोबत असणारी त्यांची अगदी लहान नात मात्र गिनेटीव्ह आली असून पोलीस व त्यांची पत्नी तसेच त्यांना नाशिकला घेऊन जाणारा चालक देखील निगेटव्ह आल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.
पहिले शहर, नंतर आश्वी, नंतर पुन्हा शहर, त्या पाठोपाठ धांदरफळ हे निस्तारते कोठे नाहीतर लगेच निमोण त्यामुळे संगमनेरचे दु:ख काही कमी होता होत नाही. गेल्या तीनचार दिवसांपुर्वी निमोण येथे एकाचा कोरोनाने मृत्यू झाला होता. त्यांना या कोविडची बाधा कशी झाली माहित नाही. मात्र, त्यांच्या दुकानात एक मांजर अडकली होती. ती काढण्यासाठी या पोलीस कर्मचार्याच्या पित्याने मानुसकी दाखविली. इतकेच काय! त्यांनी ज्या ठिकाणी मांजर गुंतली होती, ती काढण्यासाठी या मयत झालेल्या व्यक्तीच्या अगदी फार जवळून संपर्क करीत मदत करण्याचा प्रयत्न केला होता. ती मांजर जीवाने गेली. मात्र, तीन एक जीव नेला तर दोन जीवांना कोरोनाची बाधा देऊन गेली.
दरम्यान पोलीस कर्मचार्याचे वडील अतिशय दयाळु माणूस आहे. मात्र, त्यांनी कदाचित त्यावेळी मास्कचा वापर केला असता तर त्यांना कोरोनाची बाधा झाली नसती, या पलिकडे जो व्यक्ती किराणा दुकानात काम करतो. त्यांनी तर मास्क, सॅनिटायझर, हॉण्डग्लोज, सोशल डिस्टन्स यांचे तांतोतंत पालन केले पाहिजे. मात्र, आज असे होताना दिसत नाही. कदाचित दुकानदाराने मास्क लावले असते तर निमोणमध्ये कोरोनाची संख्या वाढती झाली नसती.आता सर्वात महत्वाचे म्हणजे या महिलेेचे वय जास्त आहे. मात्र, जसा त्यांना त्रास होऊ लागला होता. तसे ते तेथील एका स्थानिक रूग्णालयात उपचार घेत होत्या. त्यांनी तेथील एका डॉक्टरांकडे काही वेळा तपासणी केली होती. मात्र, वृद्धपकाळाने असा प्रकार होत असावा असे त्यांना वाटले असेल. मात्र, या डॉक्टरांकडे सेफ्टी यंत्रसामग्री होती का? त्यानंतर त्यांनी किती जणांना तपासले, ते कोठेकोठे गेले होते. असे अनेक प्रश्न निर्माण होत आहे. त्यासाठी प्रशासनाने खबरदारी घेतले आहे. तेथील डॉक्टर चांदुरकर डोळ्यात तेल घालून सतर्कता राखण्यासाठी जनसंपर्कात आहेत. त्यामुळे, त्यांनी तत्काळ डॉक्टरांना देखील काही सुचना दिल्या होत्या.
सध्या या महिलेसह काही संशयीतांना नाशिकहून संगमनेेरला आणले आहे. त्यांना योग्यठिकाणी ठेऊन त्यांच्यावर उपचार सुरू आहे. मात्र, जर स्थानिक नागरिकांनी काळजी घेतली नाही. तर निमोणची संख्या हाताबाहेर जाऊ शकते. त्यामुळे, कट्यावर बसणे टाळले पाहिजे. तसेच जे काही लोप्रतिनिधी रोज रस्त्यावर पुढारपणा करताना दिसत आहे. त्यांनी देखील स्वत:च्या स्वच्छंदी मनाला आवर घातला पाहिजे. कारण, कोरोना, जात, धर्म, पंथ आणि पद अथवा पदाधिकारी आहे. हे बिल्कुल पाहत नाही. त्यामुळे फिरला तो धरला.!!
दरम्यान सध्या निमोणमध्ये 255 कुटुंबातील 1 हजार 377 ग्रामस्थांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 23 जणाचे स्वॅब घेण्यासाठी आरोग्य विभागाने घेतले होते. त्यातील काही अहवाल निगेटीव्ह आले असून काही अद्याप पेडिंग आहे. तर नाशिक येथून प्राप्त झालेल्या त्या महिलेस बाधा झालेली असून अन्य रिपोर्ट निगेटीव्ह आले आहेत.
एकंदर नगर जिल्ह्यात कोरोनामुळे कर्जत तालुक्यातील राशिन 70 वर्षींय महिलेचा मृत्यू झाला आहे. तर नगर जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या 72 वर गेली असून पुणे मुंबई येथून आलेल्यांसह ती 75 आहे. सद्या 19 रूग्ण उपचार घेत असून 49 रूग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहे. पुणे-मुंबईहून ओल्यांसह आत्तापर्यंत सहा जणांचा मृत्यु झाला आहे. 968 रुग्ण सध्या देखरेखीखाली असून 1 हजार 866 जणांची आत्तापर्यंत तपासणी करण्यात आली आहे.