अनैतीक संबंधातून गुप्तांगावर वार.! तिघे ताब्यात, नव्या एसपी साहेबांना अशी सलामी!


सार्वभौम (श्रीगोंदा) -
                       श्रीगोंदा तालुक्यातील आढळगाव येथे मुकूंद वाकडे यांची तीन इसमांनी निघृणपणे हत्या केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हा प्रकार अनैतिक संबंधातून झाल्यामुळे रोषाने या तरूणाचे गुप्तांगावर वार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे हाय प्रोफाईल गुन्हेगारी स्वरुपाचे स्वरुप पुन्हा एकदा नगर जिल्ह्यात पाहयला मिळाले आहे. त्यामुळे, सोनई हत्याकांड, नितीन आगे, कोपर्डी, लोणी मावळा व जवखेडा अशा गुन्ह्याची वारंवार पुनरावृत्ती होताना दिसू लागली आहे.
                    आज रविवार दि.3 मे रोजी सकाळी आढळगाव येथे वाकडे यांचा मृतदेह मिळून आला.  हे प्रेत पाहून या परिसरात अचानक खळबळ उडाली. मात्र, काही काळानंतर तेथे पोलीस प्रशासन पोहचले असता त्यांनी मृताचा पंचनामा केला. त्यानंतर हा प्रकार अकस्मात मृत्युचा नाही तर निघृणपणे खून करण्यात आला आहे. या मयताच्या छातीवर वार करण्यात आलेले होते. तसेच त्याच्या गुप्तांगावर देखील वार करण्यात आल्याचे लक्षात आले आहे. या घटनेचा तपास करताना प्रथम दर्शनिय कोणीही तर्क लावेल की हा प्रकार अनैतिक संबंधातून झालेला आहे. त्यामुळे स्थानिक पोलिसांनी त्या दृष्टीने तपास सुरू केला. त्यानंतर काही संशयित म्हणून पोलिसांनी तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून काही माहिती समोर आली आहे. मात्र, हा असला खून खराबा नगर जिल्ह्यात केव्हार घडणार आहे. याचे उत्तर कळेनासे झाले आहे.
                          दरम्यान नेवासा तालुक्यातील सोनई हत्याकांडाने महाराष्ट्र खळबडून निघाला. यात तिघांच्या खांडोळ्या करण्यात आल्या होत्या. त्यानंतर नितीन आगे प्रकरणात भर दिवसा त्याची हत्या करण्यात आली. हे प्रकरण शांत होते कोठे नाहीतर पारनेर तालुक्यात लोणी मावळा येथे शालेय मुलीवर अत्याचार करुन तिची चिखलात कोंदटून हत्या करण्यात आली.  या प्रकारानंतर लगेच पाथर्डी तालुक्यात जवखेडा येथे तिघांच्या निघृणपणे खांडोळ्या करण्यात आल्या, त्याला देखील असेच अनैतिकतेचे वलय होते. हा प्रकार न्यायप्रविष्ठ असतानाच कर्जत तालुक्यात कोपर्डी हत्याकांड घडले. यात देखील जितेंद्र शिंदे या नराधमाने वासनेपोटी शालेय मुलीचे लोचके तोडले. त्यानंतर जिल्ह्यात छोट्या मोठ्या घटना घडत राहिल्या. मात्र, त्यानंतर अकोले तालुक्यातील खानापूर येथे देखील एका आदिवासी मुलीवर सामुहिक अत्याचार झाला. या प्रकरणातील आरोपी अटक झाले कोठे, नाहीतर आज लगेच श्रीगोंद्यात अशा प्रकारचे कृत्य घडले आहे.
   

                   अर्थात या प्रकरणात नितीन आगे प्रकरण वगळलेतर जर कोणी पोलिसांना दोेषी देत असेल तर ते त्यांचे अज्ञान ठरेल. कारण, या सर्व प्रकरणात आरोपींना मृत्युदंड अथवा मरेपर्यंत जन्मठेप असे कडक शासन झाले आहे. मात्र, अशी गुन्हेगारी युपी, बिहार आणि मुंबईसारख्या ठिकाणी देखील होत नसेल. असे हेवी क्राईम येथे घडत आहे. विशेष म्हणजे नगर जिल्ह्यात कोणीही एसपी नवे येवोत! त्यांना एक सलामी म्हणून अशा प्रकराचे गुन्हे घडतात असाच इतिहास जिल्ह्यात राहिला आहे. कारण, तत्कालिक एसपी लखमी गौतम यांना जवखेडा हत्याकांडाने सलामी दिली. तर डॉ. सौरभ त्रिपाठी यांना कोपर्डीने. रंजनकुमार शर्मा यांना शेवगावात झालेल्या चौघांची हत्या, सागर पाटील यांना अकोले तालुक्यातील सामुहिक बलात्कार व हत्या तर अखिलेश कुमार सिंह यांना श्रींगोंदा हत्याकांडाने सलामी दिली आहे. अर्थात ही प्रकरणे घडली असेल तरी त्यातील आरोपी मात्र अटक करण्यात आलेले आहे. मात्र, सलामीची प्रथा जिल्ह्याने कायम ठेवली आहे.

सागर  शिंदे

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)