मुंबईचा भाजीपाला संगमनेरच्या सायखिंडी फाट्यावर अडविला! सगळ्या गाड्यांच्या ड्रायव्हरांची तपासणी होणार.!
सार्वभौम (संगमनेर)-
पाथर्डी तालुक्यात भाजीपाला वाहतूक करणारा एक व्यक्ती कोरोना बाधित असल्याचे लक्षात येताच संगमनेरच्या पोलीस प्रशासनाने अतिशय कडक आणि कठोर भुमीका घेतली आहे. कारण संगमनेर तालुक्यात आठ कोरोना बाधित मिळून आल्यानंतर प्रशासनाला फार मोठी कंबर कसावी लागली होती. आता कोठे हा व्हायरस अटोक्यात आला आहे. मात्र, संगमनेरातून अनेक वाहने नाशिक, पुणे, मुंबई अशा विविध ठिकाणी भाजीपाला घेऊन जातात. त्यांना पोलिसांनी अडविले असून त्यांची वाहने ताब्यात घेतली आहेत. जे वाहन व चालक आहेत. त्यांना 14 दिवस होमक्वारंटाईन करण्यात येऊ शकते अशी माहिती पोलीस प्रशासनाने दिली. त्यामुळे, आता मुंबईचा भाजीपाला कसा पोहच करायचा असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
पाथर्डी तालुक्यातील मोहोज देवढे या परिसरातील 45 वर्षीय तरुणाला कोरोनाची लागण झाली आहे. हा भाजीपाला घेऊन मुंबईला गेला होता. आल्यानंतर हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे, कोणत्याही तालुक्यात कोरोनाचा संक्रमण होण्याचा हा एक नवा मार्ग पुढे आला आहे. कितीही बंदी घाला, कितीही होमक्वारंटाईन करा, कितीही निर्बंध घाला, कितीही एरिया सिल करा किंवा हॉटस्पॉट जाहिर करा. पण, आयत निर्यात करतांना सुरक्षितता नसेल तर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखणार तरी कसा? त्यामुळे, लोकांना पुरवठा करण्याच्या नादात तालुका असुरक्षित होऊ लागला आहे. त्यामुळे, संगमनेर पोलिसांनी कठोर भुमिका घेतली आहे. अर्थात हे जिल्हा प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले होते. त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याचे काम पोलिसांनी केले आहे. यात वाहतूक शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक पप्पू कादरी, पोलीस निरीक्षक अभय परमार यांच्या पथकातील सहायक पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे, पोलीस उपनिरीक्षक कवडे यांच्यासह वाहतूक व शहर पोलीस यांच्या पथकाने ही कारवाई केली.
नेहमीप्रमाणे संदेश आला आय वील कॉल यू राईट बॅक...जर मुंबईला जाणारा भाजीपाला नाशिकरोड येथे नेऊन तो रेल्वेद्वारे मुंबईला गेला तर अनेक प्रश्नांवर पर्याय निघू शकतो. शक्यतो ड्रायव्हरांना जर होमक्वारंटाईन केले तर पर्यायी चालक मिळणे कठीण होऊ शकते. त्यामुळे, कंटेनर सारखी मोठी वाहने वापरुन एकाच वाहनात जास्तीत जास्त माल जाऊ शकतो. अशा काहीतरी उपायोजना करणे गरजेचे आहे.
दरम्यान ज्या गाड्या मुंबईला जातात त्या जेव्हा परत येतील तेव्हा त्यांच्या वाहकांची व चालकांची तपासणी करण्यात येणार आहे. जर काही संशय वाटला तर अशा काही व्यक्तींना होमक्वारंटाईन करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाने दिली आहे. तर उशिरा आलेल्या माहितीनुसार या गाड्या काही अटी व शर्तीवर सोडून देण्यात आल्या आहे. याबाबत पोलीस अधिकार्यांशी संपर्क केले असता त्यांचा