संगमनेरात कोरोनाचा तिसरा बळी, निमोणच्या व्यक्तीचा मृत्यू, मांजराला मदत करणे जीवावर बेतलं,


सार्वभौम (संगमनेर) :-
                    संगमनेर तालुक्यातील निमोण येथील एक कोरोना बाधित व्यक्ती शुक्रवारी रात्री उशिरा मयत झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा व्यक्ती तोच आहे. ज्यांनी मांजराचा जीव वाचविण्यासाठी कोरोना बाधित व्यक्तीच्या सोबत आपला जीव धोक्यात घालून त्या पिलाला वाचविण्याचा प्रयत्न केला होता. फार मनमिळावू, दयाळू, मयाळू मानसाचा दुर्दैवी अंत झाला आहे. हा निमोण येथील रहिवासी असून त्यांना नाशिक रुग्णालयात दाखल केले होते. त्यांच्यात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले होते. त्यामुळे, त्यांना अवघ्या आठ दिवसात मृत्युला सामोरे जावे लागले आहे. केवळ त्यांचा गुन्हा हाच होता. की, कुराण, बायबल, बुद्ध आणि भगवतगीता यात लिहीले आहे.  प्राणीमात्रांवर दया करा. प्रेम करा. पण, हीच दया त्या दिलखुलास व्यक्तीचा जीव घेऊन गेली आहे.
       याबाबत सविस्तर माहिती अशी की, निमोण येथे एका किराणा दुकानदार व्यक्तीला कोरोनाची बाधा झाल्यामुळे तो मयत झाला होता. तत्पुर्वी तो दुकानात असताना तेथे एक मांजराचे पिलू अडकले होते. या दुकानाच्या जवळच या दिलदार व्यक्तीचे घर होेते. तो कोरोना बाधित दुकानदार  आणि यांनी त्या पिलाला गुतलेल्या ठिकाणाहून बाहेर काढण्यास फार प्रयत्न केले. ते पिलू यांनी काढले खरे. पण, या दुकानदारास नेमकी कोठून कोरोनाची बाधा झाली होती देव जाणे. तो त्यानंतर अगदी दोन-तीन तिवसात मयत झाला. त्यानंतर चार दिवस उलटले नाही तोच मांजराला मदत करणार्या या व्यक्तीच्या घशात दुखू लागले.
                               
हा प्रकार त्याने त्याच्या मुलास (पोलीस कर्मचारी नाशिक)  सांगितला. त्याने तत्काळ त्यांना नाशिक येथे बोलावून घेतले. तेथे यांची तपासणी केली असती ती पॉझिटीव्ह असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलीस कुटुंबाची चांगलीच धांदळ उडाली. दरम्यान हाच त्रास कुटूंबातील आई व आजीला होत होता. त्यामुळे त्यांची देखीस तपासणी केली असता आजीचे दोन दिवसांपुर्वी निगेटीव्ह आले होते. तर काल सायंकाळी (दि. 23) पोलीसाच्या आईचे रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आले होते.
               त्यामुळे, पहिल्या वेळी किराण दुकानदार पॉझिटीव्ह आला होता. तो मयत झाला.  त्याची बाधा  एका पोलीस कर्मचाऱ्याच्या वडिलांना झाली होती. ते आज मयत झाले आहेत. तर त्यांची आई आणि पत्नी हे या मयत व्यक्तीच्या संपर्कात आले होते. त्यामुळे ते देखील कोरोना बाधित झाले आहेत.
=====================
प्रिय वाचक मित्रांनो.! तुमचे आभार कसे मानावे कळत नाही. कारण, तुम्ही बातमी वाचतात आणि पुढे शेअर करतात त्यामुळे रोखठोक सार्वभौम या पोर्टलचे ४२६ बातम्या व लेखांचे ४० लाख ४० हजार वाचक झाले आहे. ते ही अवघ्या ३०० दिवसात. त्यामुळे, इतकी लोकप्रियता ही माझी नसून सार्वभौमचे प्रतिनिधी आणि बातमी शेअर करणाऱ्यांची आहे. तुमचे आम्ही मनापासून आभार मानतो. कारण एका दिवसाला किमान १ लाख ५० हजार लोक आपल्या सार्वभौमवर भेट देतात.
-सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 400 लेखांचे 39 लाख वाचक)