कोरोनाची तपासणी करण्यासाठी गेलेल्या संगमनेरच्या महिलेचा मृत्यू, मुलगा व सुन मुंबईत पॉझिटीव्ह!


सार्वभौम (संगमनेर) : संगमनेर तालुक्यातील कौठे वनकुटे येथील एक महिला कोरोनाच्या संशयाने जिल्हा रूग्णालयात तपासणीसाठी नेेली होती. आज रविवार दि. 24 रोजी सकाळी तिचा अहवाल निगेटीव्ह आला होता. मात्र, या रिपोर्ट नंतर देखील तिचा मृत्यु झाल्याची खळबळजनक माहिती समोर आली आहे. त्यामुळे, त्यांच्या मृत्युचे नेमके कारण काय आहे. हे समजू शकले नाही. तर असे हे अकोले व संगमनेर येथील तीसरे रुग्ण आहे.कोरोनाच्या तपासणीसाठी नेले मात्र, रिपोर्ट निगेटीव्ह आला असला तरी मयत झाले आणि त्याचे कारण मात्र, गुलदस्त्यात राहिले आहे.
याबाबत सविस्तर माहित अशी की,  कौठे वनकुटे येथील एका महिलेला  त्यांच्या मुलांकडे मुंबई येथे गेली होती. तेथे तिच्या मुलास व सुनेस कोरोनाची बाधा झाली होती. मात्र, ही माहिला दरम्यानच्या काळात तेथून निघून आली. गावाकडे आल्यानंतर तिला काही त्रास सुरू झाला त्यामुळे संगमनेर आरोग्य प्रशासनाने दखल घेत परवा तिला पहाटे जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते.  दरम्यान दोन दिवसानंतर तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आला होता. आज तिला घरी सोडणार तोच तिचा रुग्णालयातच मृत्यू झाल्याचे लक्षात आले आहे.
दरम्यान ती मयत झाली असली तरी तिचा रिपोर्ट निगेटीव्ह आहे. तिचा मुलगा व सुन मुंबईला पॉझिटीव्ह आहे.  या महिलेस पुर्वी काही व्याधी होत्या, त्यांचे ऑपरेशन देखील झाले होते. त्यामुळे त्या काही प्रमाणात आजारी असल्यांचे बोलेले जात आहे. मात्र, त्या आजार असल्यामुळे. तसेच त्यांचा प्रवासाला कोरोनाची पार्श्वभूमी असल्यामुळे प्रशासनाने त्यांची तपासणी करण्याचा निर्णय घेतला होता.   त्यामुळे संगमनेरकरांनी घाबरुन जावे असे विशेष काही कारण नाही. असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 
दरम्यान अकोले तालुक्यातील एक महिला कोरोनाच्या तपासणीसाठी नेली असता तिचा मृत्यू झाला. काही दिवसांपुर्वी संगमनेर तालुक्यातील एक व्ंयक्तीचा अहवाल निगेटीव्ह आला मात्र, तो मयत झाला. तरी त्याच्या मृत्युचे कारण समजले नाही. नेमकेे हे मृत्यू होतात तरी कसे? असा प्रश्न सामान्य जनतेला पडला आहे. अर्थात जो जन्माला आला त्याला मृत्यू अटळ आहे. मात्र, या विज्ञान युगात त्याचे कारण तर कळले पाहिजे.! असे सुज्ञ जनतेला वाटू लागले आहे. आज ही महिला मयत झाली, रिपोर्ट निगेटीव्ह मात्र, मृत्यू निश्चित! हे म्हणजे एक अजबच प्रकार समोर येऊ लागला आहे. असे जनतेला वाटू लागले आहे.

sushant pawse