खाकी रोज मरते आहे, फक्त तुम्हाला जीवंत ठेवण्यासाठी..!!
- सागर शिंदे
सार्वभौम (अहमदनगर) : आज खाकीला कोरोना भिडल्याचा आकडा वाचला आणि मन बधिर झाले. मालेगाव आणि मुंबईत जर कोरोनाचा खरा दुष्मण वर्दीतला पोलीसच आहे की काय? असा प्रश्न उभा राहिला. तुम्हाला धक्का बसेल! पण जे कोरोनावर उपचार करतात त्या डॉक्टरांना कोरोनाची बाधा होण्याचे प्रमाण कमी आहे. मात्र, पोलिसांचा आकडे आज 2 हजार 211 इतका झाला आहे. तर मृत्युची संख्या 25 आहे! काय दुर्दैव आहे. माहित असून देखील की येथे मृत्युशी झुंज आहे. तरी देखील पाय रोखून उभा आहे तो पोलीस. म्हणून कर्मचारी दादा आणि अधिकारी साहेबा! तुझे पांग आता फिटता फिटणार नाही. त्यामुळे, जनतेहो! खकी दिसली की वाकू नका, पण बाधा असेल तर झाकू नका. कारण, हा पोलीस रोज हजारो लोकांना सामोरे जातो. आज तुमची घरे स्थिर आहेत मात्र, आपल्या अडिच हजार खकीची उंबरे जीव मुठीत धरुन आपल्या कर्तबगार व्यक्तीची बरे होऊन घरी येण्याची वाट पाहत आहे.! त्यामुळे जनतेहो! पोलीस हो तुमच्यासाठी नाही उभा स्वार्थासाठी...!
"सार्वभाैम संपादक"
सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 350 दिवसात 444 लेखांचे 49 लाख वाचक)

आज सरकारी आकडेवारी पाहिली राज्यात 2 हजार 211 पोलिसांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यात गेल्या 24 तासात 116 पोलीस कोरोना बाधित झाले असून त्यात 249 पोलीस अधिकारार्यांना याची लागण झाली आहे. तर 1 हजार 762 कर्मचार्यांचा सामावेश असून 25 पोलीस शहिद झाले आहेत. हा आकडा वाचल्यानंतर पोलीस काय करता असे विचारणार्याच्या कानशीलात मारली पाहिजे. कारण, सन उत्सवाला देखील तुम्हाला पोलीस पाहिजे आणि पहिले मरण्यासाठी देखील पोलीस पाहिजे. तुम्हीच सांगा! आज असे कोणते खाते आहे जेथे तुमची यंत्रणा थेट रस्त्यावर असून मृत्यू समोर दिसत असताना देखील जीवाची पर्वा न करता नि:शस्त्र युद्ध करीत आहे.
गेल्या काही दिवसांपुर्वी एका आर्मीतल्या कर्नलचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. ते म्हणतात. मुझे आज पोलीसपर बहोत गर्व महसूस होत रहा हैं! क्योंकी ये नि:शस्त्रवाली लढाई आप 24 घंटे रस्तेपर खडे हाकर लढ रहे हैं! आता यापेक्षा पोलिसांच्या कर्तबगारीला वेगळे काय प्रमाण हेवे? या कर्नलने चक्क रस्त्यावर उभ्या असणार्या पोलिसांना पेढे आणि मिठाईचे बॉक्स वाटले. इतकेच काय, तुमच्या अधिकार्यांना माझा सलाम सांगा!
अर्थातच आजवर आपल्याला इंडियन आर्मीवर गर्व होत होता. मात्र, आज त्याच आर्मीला पोलिसांवर गर्व होत आहे. यापेक्षा पोलिसांसाठी कोणतेही मोठे प्रमाणपत्र नाही. आज गरज आहे. फक्त पाठीवर हात ठेऊन लढ म्हणण्याची. सरकार लढ म्हणतय, मात्र, सेवा सुविधा पुरविताना कोणे दिसत नाही. आज तोंडाला मास्क सोडले तर पुर्ण असुरक्षित आहे. पोलीस. खाकीचे रक्षण नाही. मात्र, दारुड्यांचे संरक्षण करण्यासाठी बारच्या बाहेर पोलीस उभा केला, हिच खदखद खकीच्या आड आहे. पण, करणार काय! गुतली गाय आणि फटके खाय. दुर्दैव यांचे की, स्वत:ची संघटना नसून लोकांना न्याय देणारे स्वत: अन्यय सहन करतात. त्यांची काठी लोकांच्या पाठीवर पडते, त्यामुळे त्यांच्या पाठीशी कोणी उभे राहत नाही. मात्र, ती काठी कोणाच्या हितासाठी पडते याचे आत्मचिंनतन कधी होत नाही. असो, फार कटू आहेे. मात्र, सत्य पचत नाही.!आज मृत्यु समोर उभा असताना देखील पोलीस आपल्या संरक्षणासाठी रस्त्यावर उभा आहे. मात्र, घराब बसलेले रिकामटेकडे त्यांच्यावर अॅलिकेशन करतात, त्यांना नावे ठेवतात, एका महाशयाने तर पोलिसांच्या मारहाणीवर नागपूर न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यावर न्यायालयाने फक्त विचारणा केली. तुम्ही काठी घेऊन रस्त्यावर उतरायला तयार आहात का? त्यावर तो निरुत्तर झाला. म्हणजे प्रश्न फार आहेत, मात्र, त्याचे उत्तर शोधले तर हा प्रश्न उपस्थित केला याचीच लाज वाटू लागते. परंतु, जो व्यक्ती खाकी वर्दी सोडून त्यांच्याकडे भावनेने पाहतो, नक्कीच त्याच्या मनात कालवाकालव होईल. कारण, घरात बसलेल्याचे संरक्षण खाकी करीत आहेत, रस्त्यावर अनाथ बसेलल्यांचे संरक्षण खाकी करीत आहे, मुक्या प्राण्यांना चारा खाकी भरवत आहे, भुकेलेल्यांच्या भुखी घास खाकी भरवत आहे, बाहेर फिरणार्यांचे संरक्षण खाकी करत आहे. ते मात्र, स्वत: जीवावर उदार झाले असून आपण घराबाहेर पडून त्यांचे पश्न वाढवत असून आपला जीव धोक्यात घालत आहोत. तरी बदनाम पोलिसच. त्यामुळे सदसद विवेक बुद्धीने विचार केला पाहिजे. जे करतात ते पोलीस दिसला की त्यांच्या अंगावर फुले टाकतात. त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करतात. त्यामुळे, या नि:स्वार्थी सेवेला शब्दांचे कलंक लावू नका. जसे सैनिक तसेच आज पोलीस! शस्त्राची आणि शास्त्राचे युद्ध असते तर ते जिंकणे फार कठीण नसते. मात्र, अदृश्य शक्तीशी लढणारा हा ऐकमेव लढवैय्या आहे. त्यामुळे डॉक्टर, नर्स. सफाई कर्मचारी, काही अंशी पत्रकार आणि ज्ञात अज्ञात सर्वांना दै.रोखठोक मानाचा मुजरा करीत आहे. प्रत्येकाने घरी रहा म्हणजे नियमांचे काटेकोरपणे पालन करा म्हणजे पोलीस सेफ राहतील. जय हिद !
हा लेख माझी ओळख असणार्या प्रत्येक पोलीस खात्यातील व्यक्तीच्या सुरक्षेसाठी आत्मियतेने लिहीलेला आहे. प्रत्येक वर्दीतील व्यक्तीला आरोग्य उत्तम लाभून त्यांना उदंड आयुष्य लाभो! लेख लिहीताना फार चेहरे डोळ्यासमोर येतात. मात्र, प्रत्येकाची नावे लिहीणे अशक्य आहे. म्हणून ज्यांनी माझ्या खांद्यावर होत ठेऊन लढायला शिकविले. त्यांच्या पाठीशी हे माझ्या शब्द आहे.============