संगमनेरात आज पाच कोरोना बाधित रुग्ण! महत्वाची बाजारपेठ सील, आकडे 37 वर..
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेरात पुन्हा कोरोनाच्या तीन रुग्णांंनी भर झाली आहे. यात सिन्नर तालुक्यातील 56 वर्षीय व्यक्ती तर निमोण येथे 75 वर्षीय वृद्ध, तसेच भारत नगर येथील 54 वर्षीय महिलेचा सामावेश आहे. तर सकाळी मोमिनपुरा येथील 71 वर्षीय वृद्ध तसेच भारतनगर येथील 33 वर्षीय तरुणाला कोरोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे, शहरात एकाच वेळी पाच व्यक्तींना कोरोनाची बाधा झाल्याची अकडेवारी हातील आली आहे. सद्या संगमनेरमध्ये एकूण पाच व्यक्ती कोरोना बाधित होऊन मयत झाल्या असून आत्तापर्यंत 37 लोकांना कोरोना झालेला आहे. प्रशासन काम करीत असताना देखील कोरोनाचा आलेख कमी व्हायला तयार नाही.
दरम्यान शहरात कोरोनाचा प्रदुर्भाव मोठ्या प्रमाणावर होऊ लागल्याचे दिसत आहे. त्यामुळे, शहरातील बाजारपेठेचा काही भाग प्रशासनाने बंद केला असेन तेेथे कंटेनमेंट झोन म्हणून घोषित केले आहे. त्यात मदिना नगर, भारत नगर, जुना जोर्वे रोड, संगमनेर शहरातील भारत चौक., अशोक चौक, शिवाजी पुतळा परिसर, मोेमीनपुरा व लगतचा परिसर सील करण्यात आला आहे. त्यामुळे, जवळपास अर्धी व महत्वाची बाजारपेठ आता बंद राहणार आहे. अर्थात प्रशासन अशा प्रकारचे गल्लीबोळ सील करीत राहील, त्यांच्या अधिकार क्षेत्रात असलेल्या गोष्टी ते करीत राहतील मात्र, संगमनेर शहर आता बंद करणे फार गरजेचे वाटू लागले आहे. मात्र, त्यासाठी सामाजिक संघटनांसह पुढारी व नेत्यांनी पुढे येणे गरजेचे आहे.
जे लोक आज पॉझिटीव्ह मिळून आले आहेत त्यांना अशाच प्रकारची संपर्कातून बाधा झाली आहे. जर अशीच बाजारपेठ सुरू राहीली तर अर्थिक हव्यासापोटी येणार्या अनेक दिवस येथील जनजीवण विस्कळीत राहू शकते. त्यामुळे, संगमनेर तालुक्याने अकोले तालुक्यासारखा स्वयंस्पुर्तीचा नारा देणे गरजेचे वाटू लागले आहे.
sushant pawse