अखेर अकोल्याने सोडला मोकळा श्वास, त्या शेकेईवाडीच्या भाचीसह चौघे निगेटीव्ह.! २० हजार ५५६ जण तालुक्यात होमक्वारंटाईन.!

 
सार्वभौम (अकोले) अकोले तालुक्यातील माळीझाप येथे राहणाऱ्या त्या पोलीस जोडप्याचा कोरोना रिपोर्ट पॉझिटीव्ह आला होता. यातील पोलीस कर्मचारी  त्यांच्या भाचीसह चौघांच्या संपर्कात आला होता. त्यानंतर  तिच्या कुटूंबातील चौघांना नगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. आज दि. २ मे रोजी सायंकाळी उशिरा रिपोर्ट आले. त्यात चौघांचे रिपोर्ट निगेटीव्ह आल्याची माहिती वैद्यकीय अधिकारी यांनी दिली.  त्यामुळे, अकोले तालुक्याने सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. तर त्यांच्या घरातील १७ जणांना देखील कोणताही धोका नसल्याचे लक्षात आले आहे. मात्र तरी यांनी काळजी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
       याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळीझाप परिसरातील एक तरुण गेल्या काही वर्षापासून नाशिक पोलीस दलात कार्यरत आहे. त्यांची ड्युटी मालेगाव येथे लावण्यात आली होती. मात्र त्यांन बरे वाटेना म्हणून त्यांनी दि. २२ एप्रिल रोजी उपचार घेणे सुरु केले. त्यानंतर लक्षात आले की, २३ एप्रिल रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह होता.  संबंधित कर्मचार सदृढ असल्यामुळे हा प्रकार लवकर उघड झाला नाही. मात्र, नंतर यावरील पडदा उघडा झाला.  त्याची भाची आजारी पडल्याने त्यांच्या कुटुंबात घबराहट निर्माण झाली. त्यामुळे, पोलीस बंधुंनी ही बाब स्वत: आरोग्य विभागाला कळविली होती. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ चौघांना जिल्हा रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान हा प्रकार अकोले तालुक्यात वाऱ्यासारखा पसरला. त्यामुळे, माळीझाप परिसरासह तालुक्यात मोठी खळबळ उडाली होती. आजवर प्रशासन व नागरिकांनी जी तत्परता दाखविली होती. त्यावर सगळे पाणी फिरते की काय असा प्रश्न उपस्थित झाला होता. हा रिपोर्ट येत नाही. तोवर शहरात सगळा शुकशूकाट दिसत होता. अनेक समाजसेवक व अधिकारी मोठ्या चिंतेत होते. मात्र, आज सायंकाळी सर्व चिंतेचे निरसन झाले व तालुक्याचा २४ तास कोंडलेला श्वास मोकळा झाला आहे. तर कोणी घाबरु नये, अफवा पसरवू नये, घरात रहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन अधिकार्यांनी केले आहे.

दरम्यान राजूर परिसरातील एक भक्त महिला राजस्थान येथे गेली होती. परवा माऊंट अबू येथून ९९ जण आले होते. त्यापैकी एक महिला राजरच्या आहेत. त्यांची तपासणी केली असून त्यांचे अहवाल निल आहेत. मात्र, त्यांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहेत. त्यामुळे, अकोल्यात कोणताही धोका नाही. नगरिकांनी चिंता करण्याचे कारण नाही.
 
   तर अद्याप ५६० संशयीतांना १४ दिवसांचे होमक्वारंटाईन केले आहेत. तर २० हजार ५५६ जणांना आत्तापर्यंत होमक्वारंटाईन केल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्यांनी दिली आहे.
हा कोणीतरी खोडसाळपणा केला आहे. त्यामुळे, व्हाट्ससअॅप वरील न्यूज तपासून वाचा. आजकाल आपल्या बातम्या सरसकट कॉपीपेष्ट करुन काही वृत्तपत्र व पोर्टल पत्रकार स्वत:चा उदोउदो करत आहेत. 

सागर शिंदे

============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)