तहसिलदारांच्या हॉस्पिटल प्रसिद्धीवर आयुक्तांकडे हरकत! हा तर डॉक्टरांना वाचविण्याचा प्रयत्न!


सार्वभौम (संगमनेर) : 
                      संगमनेर शहरातील एका हॉस्पिटलमध्ये कोरोना बाधित रुग्ण नाही. त्यामुळे, तेथील डॉक्टर, नर्स, स्टाफ यांना कोणत्याही प्रकारचा धोका नाही. असे  तहसिलदार यांनी शासकीय पत्रक काढले होते. त्यावर एका समाजसेवकाने जनहीतार्थ हरकत विभागीय आयुक्त यांच्याकडे देखल केली आहे. त्यामुळे, महसूल विभागाच्या मागे चौकशीचे ससेमीरे लागणार असल्याचे स्पष्ट दिसून येत आहे. एका खाजगी रुग्णालयाच्या बाजुने तत्काळ सफाई देऊन तसे शासकीय जाहिर परिपत्रक काढून त्यांना नेमके काय सिद्ध करायचे होते. असा प्रश्न विचारला जाऊ लागला आहे.
 या अर्जात म्हटले आहे की, दि.11 मे 2020 रोजी संगमनेर शहरात रुग्णांना ‘चैतन्य’ देणार्‍या एका हॉस्पिटल संदर्भात दंडाधिकारी यांनी एक प्रसिद्धपत्रक जाहिर केले होते. त्यात नमुद करण्यात आले होते की, संबंधित हॉस्पिटलमध्ये कुठलाही कोरोना बाधित अथवा संशयित असा कुठलाही रुग्ण अ‍ॅडमिट किंवा भरती झालेला नाही. त्यामुळे, या हॉस्पिटलमधील डॉक्टर, संपुर्ण स्टाफ, तसेच अ‍ॅडमिट झालेल्या पेशन्ट अथवा नातेवाईकांना कोरोनाचा संसर्ग होण्याची भिती अथवा धोका नाही. कोरोना पेशन्ट केवळ बाह्यरूग्ण विभागातच (ओपीडीत) तपासले असून त्यांना तत्काळ सरकारी रूग्णालयात जाण्यास सांगितले गेले होते.
या मसुद्यास अनुसरुन अर्जदाराने त्यावर अवलोकन केले आहे. त्यांचे म्हणणे आहे की, या प्रसिध्दीपत्रकातील दोन्ही वाक्यांत प्रामुख्याने प्रथम वाक्य वाचून असे दिसून येते की, कोणताही कोरोना बाधित किंवा संशयित असा कुठलाही रुग्ण या हॉस्पिटलमध्ये भरती झालेला नाही.
त्याचप्रमाणे प्रसिध्दी पत्रकाच्या दुसर्‍या वाक्यामध्ये असे दिसून येते की, कोरोना पॉझिटिव्ह पेशंट हे केवळ बाह्यरुग्ण विभागातच (ओपीडीत) तपासले आहेत.
                             
वरील दोन्ही वाक्ये एकमेकांच्या परस्पर विरोधी आहेत व सदर प्रसिध्दीपत्रक हे खुपच संभ्रम निर्माण करणारे आहे. या प्रसिध्दी पत्रकात एका बाजुने असे सांगण्यात येते की, कोविड-19 चा कुठलाही पॉझिटिव्ह पेशंट या हॉस्पिटलमध्ये आला नाही. आणि दुसर्‍या बाजुने असे सांगण्यात येते की, कोविड -19 चा पॉझिटिव्ह पेशंट हा या हॉस्पिटलच्या बाह्यरुग्ण विभागातच (ओपीडी) तपासले आहेत. या हॉस्पिटल मध्ये कोविड - 19 पॉझिटिव्ह पेशंट हे आलेच नाहीत की त्यांची बाह्यरुग्ण विभागात (ओपीडी) तपासणी झालेली आहे ? हे स्पष्ट लक्षात येत नाही. यात फार संदिग्ध माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे प्रसिद्ध पत्रकाने संभ्रम संपत नाही तर वाढत आहे.
                         अर्जात पुढे म्हटले आहे की, मा. तहसिलदार साहेबांनी कोणत्या तपासावरून असे निष्कर्ष काढलेत की, या हॉस्पिटल मध्ये कोविड-19 चे पॉझिटिव्ह पेशंट आलेच नाहीत? या हॉस्पिटलचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) ही जागा दवाखान्याच्या आतील भागात स्थित असून ती बाह्यरुग्ण विभाग या नावाप्रमाणे दवाखान्याबाहेर मुळीच नाही. याचा सरळ - सरळ व अगदी स्पष्ट अर्थ असा होतो की, सदर हॉस्पिटलचा बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) ही दवाखान्यातील अंतर्गत जागा असून कोणतेही रुग्ण तपासणी करण्यासाठी बाह्यरुग्ण विभाग (ओपीडी) ही स्वतंत्र हॉस्पिटल बाहेरची जागा नाही. त्यामुळे मा. तहसिलदार यांनी सदरचा हे प्रसिद्धी पत्रक रुग्णांमध्ये चैतन्य निर्माण करुण देणार्‍या हॉस्पिटलचे डॉक्टर्स यांच्या बचावासाठी काढले आहे की काय? अशी शंका निर्माण होत आहे.
                           उलट या हॉस्पिटलमध्ये अशा प्रकारचे रुग्ण आले आहेत. ही माहिती मिळताच ते रूग्ण सकारात्कम अथवा नकारात्मक असले तरी मिळालेल्या माहितीनुसार मा. तहसिलदार यांनी संबंधित घटनेबाबत त्याचा तपास करुन कागदी पुरावा उपलब्ध करुन नंतर असा आदेश किंवा परिपत्रक अथवा प्रसिद्धपत्रक प्रसिद्ध केले पाहिजे. अशा बचावात्मक प्रसिद्धीपत्रकामुळे संबंधित हॉस्पिटलच्या संबंधित असणार्‍यांचे कोविड रिपोर्ट पाझिटीव्ह आल्यास त्यास जबाबदार प्रशासन व कालचे ते प्रसिद्धपत्रक असेल. त्यामुळे काढलेल्या पत्रकाचे अवलोकन केले असता त्यात निष्काळजीपणा दिसून येतो. त्यामुळे झाली हरकत आहे. असे तक्रारदाराने म्हटले आहे. याबाबत विभागिय आयुक्त नाशिक, जिल्हाधिकारी तथा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यांच्यासह अन्य ठिकाणी तक्रार दाखल करण्यात आली आहे.