निमोणला कोरोनाचा नमुणा दिला कोणी?, मांजराची मदत महागात पडली, गाव बंद, 1 हजार 377 होमक्वारंटाईन, 30 अहवालावर संगमनेरचे भाकीत!


संगमनेर (सार्वभौम) :
                  नगरच्या मुकूंदनगरमध्ये परदेशातून आलेला कोरोनाचा वानवळा संगमनेर शहरात आला. मात्र, तो येथेच थांबला नाही. तर त्याने पुन्हा आपले मेहमान नवाझी तबलिगी यांच्याकडे आपला मोर्चा वळविला. येथे त्यांचा प्रवास जवळजवळ संपला होता. मात्र, कोठून कसे देव जाणे पण त्यांना धांदरफळचे निमंत्रण आले आणि त्यांनी तेथे जाऊन थेट एकाचा जीव घेतला तर 9 जणांना प्रसाद देत तो तेथून चालता झाला. संगमनेर कोरोनामुक्त झाल्याचा एकीकडे आनंद साजरा होत असताना प्रशासनाला चकवा देत हा नमुणा निमोणला गेला कसा कोणास ठाऊक! पण, त्याने तेथे देखील थौमान घातले. एकाचा जीव घेत संगमनेरचा आकडा पुन्हा चारवर नेवून ठेवला. त्यामुळे. आता याला हद्दपार करायचे की, पुढे कोणाचा नंबर लावायचा. हे जनतेच्या हाती असणार आहे. मात्र, प्रशासन कोरोनाला तोंड देण्यासाठी ठामपणे उभे आहे. सद्या निमोणमध्ये 255 कुटुंबातील 1 हजार 377  ग्रामस्थांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे. तर 23 जणाचे स्वॅब घेण्यासाठी आरोग्य विभागाने पुढील गतीमान हलचाली केल्या आहेत.
                           आता प्रश्न उभा निमोणला हा नमुणा पोहचला कसा? याचे उत्तर प्रशासनाला सापडेल याची शास्वती फार कमी आहे. मात्र, असे बोलले जाते की, संगमनेर शहरातून वाहतूक पोलीस कठोर कारवाई करीत आहे. नो ऐंन्ट्री म्हणजे नो ऐन्ट्री अशीच त्यांची भूमिका आहे. त्यामुळे, जी वाहने जिल्ह्याबाहेर किंवा जिल्ह्यात फिरस्ती होतात त्यांच्या पळवाटा म्हणजे निमोण मार्गे होतात. जो व्यक्ती मयत झाला आहे. त्याचे अगदी रोडवरच किराणा दुकान आहे. ते लॉकडाऊनच्या काळात देखील सुरूच होते. त्यामुळे, असा कोणी वाटसरु होता जो त्यांना वाणवळा देऊन गेला असणार. किंवा याच व्यक्तीच्या घरात दोन व्यक्ती इंजिनियर आहेत. ते पुण्याहून आलेले आहे.
                     अर्थात त्यांना कोणताही त्रास होत नाही किंवा त्यांच्यात सिमटन्स असल्याचे जाणवत नाही. त्यांना डॉक्टरांनी तपासले देखील आहे. मात्र, तरुण रक्तात रग असते त्यामुळे त्यांना तसे काही जणवू शकले नसेल, कारण, सक्षम, धडधाकट आणि तेही विलगिकरण करुन ठेवलेल्या तबलिगींना देखील कित्तेक दिवसानंतर कोरोनाची बाधा असल्याचे लक्षात येते हे उदाहरण संगमनेरातच आहे. त्यामुळे, त्यांची देखील योग्य तपासणी करणे अपेक्षित असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, त्यांचीही सुरक्षा आणि सोसायटीची देखील सुरक्षा होण्यास मदत होऊ एकते. आता यांचे किराणा दुकान असल्यामुळे कोणी-कोणी त्यांच्याकडून काय-काय नेले. हे सांगण्याईतकी प्रांजळ जनता नाही. मात्र, या तोंडबंद लोकांनी किमान स्वत:ला तरी घरबंद करुन घेतले पाहिजे. अन्यथा याचा विस्पोट फार मोठा होऊ शकतो.
                     
 आता दुसरा प्रश्न निर्माण होतो की, एक मयत झाला. त्याच्या सोबत दुसरा व्यक्ती बाधित कसा झाला? तर याबाबत अशी माहिती समोर अली आहे. की, गेल्या आठ दिवसापुर्वी मयत व्यक्तीच्या दुकानात एक मांजरीचे पिलू अडकले होते. ते फार ओरडत होते. त्यामुळे, त्या पिलाच्या मदतीसाठी त्यांच्या घराच्या अवघ्या शंभर मिटर अंतरावर असणार्‍या या व्यक्तीने तत्काळ किराणा दुकानाकडे धाव घेतली आणि पिलू बाहेर काढण्यासाठी मदत केली. तेव्हा त्यांचे या मयत व्यक्तीशी संपर्क आला होता. तसेच ऐरव्ही हे कुटूंब याच दुकानातून काही साहित्य खरेदी करीत होते. आठ दिवसानंतर गेल्या चार दिवसापासून या कुटुंबातील एका व्यक्तीस श्वास घेण्यासाठी त्रास होत होता. त्यामुळे त्यांनी नाशिक येथील पोलीस दलात कार्यरत असणार्‍या त्यांच्या मुलास हा प्रकार सांगितला. एक खबरदारी म्हणून मुलाने आई वडील व त्यांच्याकडे असणारी त्याची मुगली या तिघांनाही नाशिक येथे बोलावून घेतले. दरम्यान वडिलांची तपासणी केली असता त्यांना कोरोना झाल्याचे समारे आले आहे.

दरम्यान एक खबरदारी म्हणून पोलीस कर्मचारी, त्यांची मुलगी, पत्नी व आई यांची देखील तपासणी करण्यात आली आहे. काल (दि.19) रोजी या चौघांचे स्वॅब घेण्यात आलेले आहेत. त्याचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे. ते नाशिक येथे उपलब्ध होणार आहे. तर जो व्यक्ती या चौघांना वाहनात घेऊन गेला. त्या वाहन चालकाची देखील तपासणी करण्यात आली आहे. 

दरम्यान निमोण येथील डॉक्टर चांदुरकर यांनी तेथे तळ ठोकला असून प्रांताधिकारी, तहसिलदार यांनी गावाला भेट दिली आहे. हे गाव पुर्ण बंद करण्यात आले असून तेथील 21 जणांना तपासणीसाठी जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. तर गावातील 1 हजार 388 लोक तसेत संपुर्ण गाव बंद करण्यात आले असून त्यांच्याघरी दुध घालणार्‍यासह काहींना संस्थात्मक क्वारंटाईन करण्यात आले आहे. कोणी घाबरुन जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. 

संगमनेर शहरात देखील कोरोना बाधितांच्या संपर्कात आलेल्या इस्लामपूर परिसरातून चार व्यक्ती व हॉटस्पॉट असलेल्या भागातून दोन व्यक्ती  तर निमोणच्या 21 अशा 27 जणांचे रिपोर्ट तसेच नाशिकच्या पोलीस कुटूंबातील चार रिपोर्ट असे 31 रिपोर्ट काय येतात. त्यावर संगमनेरचा आकडे ठरणार आहे. सद्यातरी संगमनेरची परिस्थिती चिंताजणक असली तरी हे अहवाल निगेटीव्ह आल्यानंतर तालुका पुन्हा सुटकेचा नि:श्वास टाकेल, अन्यथा व्हेंटीलेटर कायम असेल.!
- सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)