"अकोल्यातील नाशिकला राहणारे ते माळेझापचे पोलीस जोडपे कोरोना बाधित.! संपर्कातील शेकेईवाडीचे तिघे संशयीत ताब्यात, १७ होमक्वारंटाईन!"

 
सार्ववभौम (अकोले) : अकोले तालुक्यातील माळीझाप येथे राहणाऱ्या (सद्या वास्तव्य नाशिक) त्या जोडप्यास कोरोना झाल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. हा तरुण नाशिक ग्रामीण पोलीस दलात भरती असून त्यांच्या पत्नीचा रिपोर्ट देखील पॉझिटीव्ह आल्याचे लक्षात आले आहे. विशेष बाब म्हणजे हा पोलीस कर्मचारी त्यांच्या भाचीच्या संपर्कात आल्याने तिच्या कुटूंबास नगर जिल्हा रुग्णालयात तपासणीसाठी पाठविण्यात आले आहे. तर त्यांच्या घरातील १७ जणांना अकोले आरोग्य विभागाने होमक्वारंटाईन केले आहे. अशी माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.
          याबाबत सविस्तर माहिती अशी की, माळीझाप परिसरात एक तरुण गेल्या काही वर्षापासून पोलीस दलात कार्यरत आहे. त्याची ड्युटी मालेगाव येथे लावण्यात आली होती. विशेष म्हणजे तो अजारी पडला तरी त्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी कोणतीही दखल घेतली नाही. मात्र दि. २२ एप्रिल रोजी त्यास नाशिक जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर २३ एप्रिल रोजी त्यांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आल्यानंतर सगळी धांदल उडाली. हा प्रकार लक्षात येताच त्यांच्या पत्नीस तपासले असता त्यांचा देखील रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. हा प्रकार गेला आठवडाभर गुपित राहिला. मात्र, आज १ मे रोजी त्यांच्या सानिध्यात असलेली त्याची भाची आजारी पडल्याने त्यांनी सावध भुमीका घेत अकोले आरोग्य विभागाशी संपर्क साधला. त्यानंतर आरोग्य विभागाने तत्काळ तीन जणांना ताब्यात घेऊन आज दुपारी जिल्हा रुग्णालयात दाखल केले आहे. अर्थात घाबरण्याचे कोणतेही कारण नाही. कारण, गेल्या काही दिवसांपासून वातावरणात बदल झाला असून त्यामुळे सर्दी खोकला होऊ शकतो. मात्र, कोणतीही रिस्क नको म्हणून ही खबरदारी घेण्यात आली आहे. तर, संंबंधित पोलीस कर्मचारी हे त्यांच्या घरी देखील आले होते. त्यामुळे, या सर्वांचे नमुने घेतले असून म्हळदेवी केंद्राच्या अंतर्गत त्या कुटूंबातील १७ जणांना होमक्वारंटाईन करण्यात आले आहे.
       दरम्यान उद्या त्या भाचीसह तिघांचे रिपोर्ट आरोग्य विभागाला प्राप्त होतील. त्याहून पुढील रुपरेषा ठरेल. मात्र, कोणाही घाबरुन जाऊ नये असे आवाहन प्रशासनाने केले आहे. तर महत्वाचे म्हणजे या पोलीस कर्मचार्याची प्रकृती चांगली असून लवकरच त्यांना सोडण्यात येणार आहे. त्यामुळे, कोणी घाबरु नये, अफवा पसरवू नये, घरात राहून प्रशासनाला सहकार्य करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.