संगमनेरातील तांगडी येथे जमिनीच्या वादातून एकावर कुर्हाडीचे घाव! प्रकृती चिंताजणक, पाच जणांना अटक!
सार्वभौम (संगमनेर) -
संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा तांगडी येथे भावबंदकीच्या जमिनीतील वादातून शेतीमशागत करणार्या व्यवसायीकास बेदम मारहाण केल्याची घटना शनिवारी दि.16मे रोजी रात्री 10:30 वाजण्याच्या सुमारास घडली. यात पोपट नानभाऊ तांगडकर (वय 48) यांच्या डोक्यात कुर्हाडीचे घाव घातल्याने त्यांची परिस्थिती चिंताजनक आहे. या प्रकरणी पोलिसांनी मारहाण करणार्या सहा जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत सविस्तर माहिती अशी की, संगमनेर तालुक्यातील तांगडी येथे राजेंद्र देवराम तांगडकर यांच्या शेतीवर पोपट नानाभाऊ तांगडकर यांनी आपला ट्रॅक्टर घेऊन नांगरणी करून ते आपल्या माळातील शेतीवर नांगरणीसाठी गेले. परंतु राजेंद्र तांगडकर व अन्य सहाजणांचा भावकीचा वाद असल्याने ते वावर तू का नांगरले? असा प्रश्न पोपट तांगडकर यांना करून राजेंद्र तांगडकर यांचा भावकीचा कड पोपट तांगडकर यांच्यावर काढण्यात आला. त्यांना ओढ्याकडील माळरानावर एकांटी पाहुन आरोपी सुरेंद्र देवराम तांगडकर, प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मछिंद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर, मछिंद्र देवराम तांगडकर यांनी कुर्हाड दांडके व लाथाबुक्यांनी पोपट तांगडकर यांना बेदम मारहाण केली.
यावेळी पोपट तांगडकर यांच्या डोक्याला मारलागल्याने त्यांना शहरातील एका हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आण्यात आले. मात्र, त्यांची परिस्थितीती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी नाशिक येथे हलवण्यात आले आहे. यावेळी आरोपी सुरेंद्र देवराम तांगडकर, प्रवीण सुरेंद्र तांगडकर, कल्पना सुरेंद्र तांगडकर, संकेत मछिंद्र तांगडकर, दत्ता हौशीराम तांगडकर, मछिंद्र देवराम तांगडकर यांच्यावर कलम 307, 324, 143, 147, 148, 188, 269 याप्रमाणे घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पुढील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक अंबादास भुसारे करीत आहेत. या प्रकरणात पाच जणांना अटक करण्यात आली आहे.sushant pawase
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 28 लाख वाचक)