राजस्थानच्या माऊंट अबू येथून आलेले शंभर संशयित संगमनेर पोलिसांच्या ताब्यात!
सार्वभौम (संगमनेर) :
देशात कोरानाची लाट सुरू होण्यापुर्वी प्रजापती ब्रम्हकुमारी संस्थेचे काही सदस्य राजस्थान राज्यातील माऊंट अबू येथे गेले होते. मात्र, देशातील कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान महोदयांनी अचानक लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे, राजस्थान व महाराष्ट्र राज्यात देखील लॉकडाऊनची अंमलबजावणी काटेकोरपणे करण्यात आली. या दरम्यानच्या काळात हे नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील काही भक्त राजस्थानात अडकले होते. हे महाशय गुरूवार दि. 30 रोजी संगमनेर तालुक्यात येणार असल्याची माहिती पोलीस प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार संगमनेर पोलीस नाशिक व पुणे महामर्गावर संगमनेर हाद्दीत तळ ठोकून बसले होते.
दुपारपासून एखाद्या चातकासारखी वाट पाहत असतांना सायंकाळी एकामागे चार गाड्या आल्याचे पोलिसांना दिसले. संगमनेर हाद्दीत पोलिसांनी नाकाबंदी करुन गाड्यांची तपासणी केली असता त्यात 99 प्रवासी संशयीत असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी या सर्वांना ताब्यात घेऊन त्यांची सखोल माहिती घेतली. कोठून आले, कोठे चालले, कशासाठी गेले होते. कशासाठी आले, त्यांच्याकडे स्थलांतरणाचा परवाना आहे का. तो कोणी दिला. ताब्यात घेतलेल्यांपैकी कोणाकडे कोणी कोरोना बाधित आहे का अशा सखोल चौकशीनंतर त्यांना वैद्यकीय तपासणीसाठी ताब्यात घेण्यात आले होते. कोरोना तपासणीसाठी हवे असणारे त्यांचे नमुने घेण्यात आले आहेत. त्या संशयितांना रात्री कोठे ठेवायचे असा प्रश्न होता. त्यामुळे रात्री उशिरा पोलीस व महसुल प्रशासन संभ्रमात होते. मात्र, रात्री त्यांना नगरला पाठविल्याची माहिती मिळाली होती.
याबाबत जिल्हाधिकारी व पोलीस अधिक्षक यांना माहिती देण्यात आली होती. त्यांच्यावर काय निर्णय घेतील हे आज लक्षात येईल. मात्र, राजस्थानहून आलेल्या कोणीही घरी जाऊ नये. प्रशासनाला विचारल्याशीवाय कोणी स्वयंप्रेरणेने निर्णय घेऊ नये. अन्यथा कोणी सहकार्य केले नाही तर त्यांच्यावर 188 प्रमाणे गुन्हे दाखल करावेत. अशा सुचना जिल्हाधिकार्यांनी दिल्या होत्या.
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 300 दिवसात 360 लेखांचे 27 लाख वाचक)