धांदरफळमध्ये पुन्हा दोन कोरोना बाधित! संगमनेरची संख्या 7 वर, प्रशासनाची कठोर पाऊले.!
सार्वभौम (संगमनेर) :
संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथे ज्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यु झाला. त्याच्या संपर्कात आलेल्या चौघांचे अहवाल पॉझिटीव्ह आले होते. त्यानंतर पाच जणांचे अहवाल येणे बाकी होते. त्यात आणखी दोघांचे रिपोर्ट रात्री उशिरा पॉझिटीव्ह आल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. यात 28 वर्षीय महिला व पाच वर्षीय मुलाचा सामावेश आहेत. त्यामुळे धांदरफळमध्ये आता एकूण संख्या सहावर गेली असून अद्याप तपासण्या सुरुच राहणार आहे. आता हा प्रादुभाव रोखण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांनी स्वयंस्पुर्तीने पुढाकार घेणे गरजेचे आहे. पोलीस पाटील, ग्रामसेवक, सरपंच आणि प्रतिष्ठीत व्यक्तींनी पुढे येऊन समाजाला आवहान करणे अपेक्षीत आहे.
धांदरफळच्या ६८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आणि त्याच्या पाठोपाठ संगमनेरची धांदल उडाली. जिल्ह्यातील 28 जणांचे रिपोर्ट मिळाल्यानंतर त्यातील 23 रिपोर्ट निगेटीव्ह होते. मात्र, संगमनेरच्या पाच जणांना बाधा झालेली होती. त्यात संगमनेर शहरात कुरण रोड परिसरात राहणारी 59 वर्षीय महिला, धांदरफळ येथील 29 व 15 वर्षीय युवक, 25 व 23 वर्षीय युवती, यांचा सामावेश होता. तर याच अहवालात पारनेर येथील 1, राहाता 1, अकोले 1, अहमदनगर 2, जामखेड 2, कोपरगाव 1 तर श्रीरामपूर 3 असे 11 अहवाल निगेटीव्ह आले होते. तर संगमनेरच्या पाच जणांचे अहवाल येणे बाकी होते. त्यात धांदरफळच्या दोघांचे रिपोर्ट पाझिटीव्ह आले आहेत. त्यामुळे, तालुक्यात पहिले बरे झालेले आठ, आणि आत्ताचे सात असे 15 जणांचे अहवाल पॉझिटीव्ह होते. मात्र, आठ बरे झाल्याने सद्या नव्याने मिळून आलेले सात फक्त कोरोना बाधित आहेत. जिल्ह्यात ही संख्या 51 वर गेली आहे.
महत्वाचे...
कोरोनाला रोखण्यासाठी एक गोष्ट लक्षात येते की, 60 वर्षापेक्षा मोठे लोक व 10 वर्षापेक्षा लहान व्यक्ती यांची प्रामुख्याने काळजी घेणे गरजेचे आहे. जरी तरुणाईला याचा प्रादुर्भाव झाला तरी त्यांच्यात प्रतिकारशक्ती चांगली असते. ते या आजारावर मात करु शकतात. मात्र, वद्ध मानसे व लहान मुले यांना झालेला प्रादुर्भाव रोखणे आव्हाणात्मक असते. त्यामुळे, अशा व्यक्तींची काळजी घ्यावी. कारण, मृतांचे प्रमाण यांचेच जास्त आहे. लक्षात येते. त्यामुळे, घरातील प्रतिकारशक्ती कमी असणार्यांची प्रमुख्याने काळजी घ्यावी.सुचना : कोणी बातमी कॉपी करु नये!
सागर शिंदे
============
"सार्वभाैम संपादक"

सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------
(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" 320 दिवसात 387 लेखांचे 31 लाख वाचक)