समशेरपुरचा तरुण ठणठणीत, 300 लोकवस्ती होमक्वारंटेईन, साहेब.! ते लोक कोरोनाने मरण्यापुर्वी भुकेने मरतील! मुख्यमंत्र्याकडे तक्रार!
सार्वभौम (संगमनेर) :
अकोले तालुक्यातील समशेरपूर येथे मुलूंड येथून आलेल्या एका 39 वर्षीय तरुणाला कोरोना झाल्याचे समोर आले. तो प्रथमत: नाजूक परिस्थितीत होता. आता मात्र, त्याची परिस्थिती ठिक असल्याची माहिती स्थानिक वैद्यकीय अधिक्षकांनी दिली आहे. दरम्यान समशेरपुरमध्ये या रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी ठराविक लोकवस्ती सील करण्यात आली आहे. त्यात 300 लोकांना क्वारंटाईन करण्यात आल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. मात्र, एक दुर्दैव असे की, कोरोना बाधित व्यक्तीचे संपुर्ण कुटूंब शाळेत क्वारंटाईन करण्यात आले असून त्यांना चहा, जेवण सोडा पण सकाळपासून पाणी देखील देण्यात आले नाही. त्यामुळे, कोरोनाने नंतर मात्र, त्यापुर्वीच भुकेना मानसे मरतील. यात अवघ्या दोन-चार वर्षाची मुले आईकडे अन्न मागत आहे. मात्र, हतबल झालेली आई फक्त शाळेच्या गेटकडे मदतीची वाट पाहत आहे. त्यामुळे, प्रशासनाने इतकेही निर्ढावून जाऊ नये. की, जीवंतपणे माणसे मारण्याची वेळ या तालुक्यात येईल. कारण, आज ना उद्या कोरोना जाईल. पण मानवी मनात जी दरी निर्माण होईल ती कधीच भरु शकणार नाही...
देशात कोरोनाचे संकट हे मानवनिर्मीत नसून ती एक नैसर्गिक आपत्ती आहे. कोणाला असे वाटत नाही. की, आपल्यामुळे देशाला किंवा समाजाला त्रास व्हावा. मात्र, एखादा संशयित असला तरी त्याला अस्पृश्याप्रमाणे वागणूक दिली जाते. असाच प्रकार वैचारिक वारसा असणार्या समशेरपुरमध्ये घडताना दिसत आहे. जेथे देव देवतांची यात्रा मोठ्या दिमाखात भरविली जाते. तेथे मानसांचे जीवंतपणे इतके हाल केले जातात. हे फार मोठे दुर्दैव आहे. जीवंत व्यक्तीला मयत करुन नको तशा अफवा याच गावातून बाहेर पडल्या. त्याचा शोध पोलीस घेतली. मात्र, जे शाळेत क्वारंटाईन केले आहेत, त्यांना देखील मृत्युदंडा सारख्या यातना दिल्या जात आहे. खरंतर सोंग निघून गेल्यानंतर प्रशासनाला जाग आली. सहा दिवसानंतर संपुर्ण कुटूंबाला क्वारंटाईन करण्यात आले आहे. त्यामुळे, घराला टाळे ठोकले असून सर्व शाळेत आणून डांबले आहेत. त्यांना चहा नाही, पाणी नाही, इतक्या कडाक्यात शाळेत किती गरम होत असेल याची आपल्याला कल्पना आहे. त्यामुळे तेथे फॅनची सुविधा नाही, त्यांच्यासोबत लहान-लहान मुले आहेत. त्यांच्या अबोल भावना त्यांची आई सोेडून कोण जाणू शकतो. त्यामुळे, सकाळपासून ती मुले रडत असून त्यांना पिण्यासाठी पाणी देण्यास कोणी तयार नाही.
कोरोनाचा संशय असेल तर त्यांच्यावर उपचार केले जातात, त्यांना चांगला आहार दिला जातो. त्यांच्या आरोग्याची काळजी घेण्यात यावी असे आरोग्य मंत्र्यांनी सुचना दिल्या आहेत. मात्र, असे येथे काहीच होताना दिसत नाही. केवळ उचलून आणायचे आणि कोंडवाड्याप्रमाणे कोंढून टाकायचे. असेच चित्र समशेरपुरमध्ये पहावयास मिळत आहे. त्यामुळे, जर प्रशासनाला सुविधा पुरविणे शक्य नसेल तर या 20 ते 25 जणांपैकी त्यांच्यातील महिलांना घरी सोडले पाहिजे. त्या किमान घरी जाऊन भाकरी करुन आणतील, लहान मुलांना खावू घालतील, अन्यथा कोरोनाच्या पुर्वीच प्रशासनाच्या हालगर्जीपणामुळे एखाद्याचा जीव जाईल. त्यानंतर त्यांना जाग येईल की काय? असा प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला आहे.
मुख्यमंत्री व आरोग्या मंत्र्यांकडे तक्रार!
समशेरपूर प्रकरणी अफवा पसरविणे तसेच जे शाळेत क्वारंटाईन केले आहे. त्यांना तुच्छतेची वागणून देऊन प्रशासन कोणताही सुविधा पुरवत नाही. एक संशयीत म्हणून जी उपासमार व गैरसोय होत आहे. त्यात कोणी दगावले तर यात कोणाला दोषी धरावे त्यांच्यानावे तक्रर करण्यात आली आहे. त्यामुळे, पुढील काही अनर्थ घडण्यापुर्वी स्थानिक प्रशासनला शहाणपण आले म्हणजे बरे.!दरम्यान रोखठोक सार्वभौमने संबंधित रुग्णाशी नाशिक येथे संपर्क साधला असता त्यांनी स्वत: फोनहून सांगितले की, माझी तब्बेत 80 टक्के ठिक आहे. तीन ते चार दिवसात मला सोडणार आहे. हा संसर्गजन्य आजार आहे. त्यामुळे तो कोणालाही होऊ शकतो. त्यात आमची काय दोष! फक्त प्रत्येकाने काळजी घेतली पाहिजे. मला त्रास झाल्यानंतर मी स्वत: डॉक्टरांकडे गेलो होता व आज उपचार घेत आहे.