गोवंश संरक्षण केल्यामुळे, साकुरच्या युवासेनाध्यक्षास बेदम मारहाण, 18 जणांवर गुन्हा दाखल!


सार्वभौम (संगमनेर) :
                           संगमनेर तालुक्यातील साकुर येथे गोवंश हत्याबंदीचे समर्थन करुन संरक्षण केल्याचा राग मनात धरुन एका टोळक्याने संगमनेर तालुक्याचे युवासेनाध्यक्ष गुलाब भोसले यांना बेदम मारहाण केली. हा प्रकार सोमवार दि.25 मे रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडला. याप्रकरणी घारगाव पोलीस ठाण्यात 18 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
                       याबाबत सविस्तर माहिती अशी की, दि, 15 मार्च रोजी सलमान मोमीन उर्फ इंग्लीश हा काही गोवंशांना कत्तल करण्यासाठी घेऊन जात होता. त्यावेळी गुलाब भोसले यांनी त्याचा टेम्पो (एम.एच17 ए जी 8084) आडविला होता. एका सामजिक कार्यकर्ता म्हणून भोसले यांनी हा प्रकार उघड केला होता. राज्यात गोहत्या बंद असून तुम्ही ही जनावरे कोठे चालविली असा जाब त्यांनी विचारला होता. दरम्यान याच गोष्टीचा राग मनात धरुन भोसले हे त्यांचा मित्र दिपक भोसले यांच्याशी बोलत असताना आरोपी हे अचानक आले व त्यांनी भोसले यांना मारहाण करण्यास सुरूवात केली. यावेळी त्यांच्या छातीत, पाठीत व पोटात जबर मार बसला आहे. या वादाचा फायदा घेत, आरोपी उबेद मन्सुर पटेल व कलीम लतिफ पटेल यांनी भोसले यांच्या हातातील 15 हजार रुपये किमतीची सोन्याची अंगठी काढून घेतली आहे. असे फिर्यादीत म्हटले आहे. तर हा सर्व प्रकार घडल्यानंतर आरोपी यांनी भोसले यांना शिवीगाळ दमदाटी करुन धमकी दिली की, येणार्‍या काळात तुला आम्ही खोट्या गुुन्ह्यात अडकवून तुझा काटा काढू. याप्रकरणी भोसले यांनी घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून यात कलीम लतिफ पटेल, सलमान मोमीन उर्फ इंग्लीश, असिफ मोमीन, उबेद मन्सूर पटेल, कय्युम बोगुले, शाहरूख मोमीन, सलमान तांबोळी, नफीस चौगुले, अरबाज मोमीन व यांच्यासह अन्य सात अशा 18 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
                      दरम्यान साकुर परिसरात गोवंश हत्या आणि त्यामुळे सामाजिक तेढ निर्माण होणार्‍या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहे. मात्र, त्यावर ना सलोखा व शांतता कमिटी पुढाकार घेत नाही, ना पोलीस ठाण्याकडून ठोेस अशी भुमिका बजावली जात आहे. येथे प्रतिबंधात्मक कारवाई आणि तडीपारीचे प्रस्ताव तयार झाले तर येणार्‍या काळातील हे जातीय द्वेष हद्दपार होऊ शकतो. अन्यथा याचा फार मोठा उद्रेख तालुक्याला पहायला मिळू शकतो. असे स्थानिक सजग ग्रामस्थांना वाटते.