अवैध धंद्याची माहिती दिली म्हणून पतीने पत्नीस भोकसले.! अकोलेतील म्हाळदेवी परिसरातील घटना


सावभौम (अकोले) :
                          अकोले तालुक्यातील म्हाळादेवी परिसरात अवैध धंद्यांची माहिती देणार्‍या एका महिलेस पतीने चाकुने भोकसल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार घडल्यानंतर सदर महिलेस ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, अती रक्तस्त्राव आणि परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिला नाशिक जिल्हा रूग्णालयात हलविण्यात आले आहे. संबंधित घटनेप्रकरणी अद्याप पोलीस ठाण्यात नोंद झालेली नाही. मात्र, महिलेच्या जबाबानंतर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
                  याबाबत सविस्तर माहिती अशी की, म्हाळादेवी परिसरा‘मधे’ एक आदिवासी कुटूंब आहे. त्यातील काही व्यक्ती या पंचक्रोषीत बनावट दारु तयार करुन विकण्याची कामे करतात. सद्या कोरोनाचे सावट असल्यामुळे सगळीकडे लॉकडाऊन सुरू आहे. मात्र, या परिसरात सर्व अवैध धंदे सुरू असून गोवा-गुटखा देखील दुकानांमध्ये चढ्या भावाने दिला जात आहे. या परिसरात रानावणात काही ठिकाणी टिंपाच्या सहाय्याने दारु तयार करण्याचे काम सुरू होते. याप्रकरणी एका महिलेने मोठे धाडस करुन यावर आवाज ऊठविण्याचा प्रयत्न केला होता. त्यात तिचा पती देखील असल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे, तू अशा प्रकारची माहिती बाहेर का सांगितली असे म्हणून त्यांच्यात किरकोळ वाद झाला. त्यानंतर दोघांच्या बाचाबाचीचे रुपांतर मोठ्या वादात झाले आणि पतीपत्नीचा वाद विकोप्याला गेला. त्यानंतर या महाशयाने थेट पत्नीला धारधार हत्याराने भोकसून ठार मारण्याचा प्रयत्न केला.
                         ही घटना गावकर्‍यांच्या लक्षात आल्यानंतर संबंधित महिलेस उपचारासाठी अकोले रूग्णालयात हलविण्यात आले. त्यांनी प्राथमिक उपचार केल्यानंतर महिला गंभीर असल्याचे सांगून नाशिकला हलविण्यात आले. दरम्यान पोलिसांनी याप्रकरणी नोंद केली असून महिलेच्या फिर्यादीनंतर पुढील गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.
       दरम्यान पोलिसांनी म्हळदेवी परिसरात एका दारु अड्ड्यावर छापा टाकला. तो अड्डा उध्वस्त करुन याप्रकरणी राजेंद्र मधे (रा. म्हळदेवी) यास अटक केली आहे. त्याच्यावर मद्यसाठी प्रकरणी गुन्हा दाखल केला असून पोलिसांनी खऱ्या अर्थाने बुद्धीचातुर्य दाखविले आहे. या गुन्ह्या"मधे" खोल तपास झाला तर फार मोठी साखळी मिळू शकते.

पुढील भाग 2 वाचा
हा गुन्हा का घडला? याला कोणाचा वरदहस्त? या हातभट्ट्या नेकमी कोणाच्या? सविस्तर पुढील अंकात.!
============
"सार्वभाैम संपादक"



सागर शशिकांत शिंदे
Rajratna.sagar@gmail.com
-------------


(देशात, राज्यात व तालुक्यात होणाऱ्या राजकीय, सामाजिक, आर्थिक व गुन्हेगारी विषयाचे विश्लेषण करणारे एकमेव "सार्वभौम पोर्टल" २०० दिवसात २८५ लेखांचे २३ लाख वाचक)