संगमनेरच्या युटेक शुगर कारखान्याला भीषण आग; 92 हजार क्विंटल साखर
![]() |
संग्रहीत फोटो |
राज्यात कोरोनाने थैमान घातले आहे. त्यातच संगमनेर मध्ये पुन्हा चार कोरोना बाधित रुग्ण आढळले आहे. म्हणुन कारखान्यातील सोशल डिस्टन्स मुळे कारखान्यात फक्त 10ते12 सुरक्षारक्षक होते.या सुरक्षरक्षकांनी पहाटे लागलेल्या आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न केला परंतु आगीने रौद्ररूप धारण केल्याने त्यांच्या ही आवाक्या पलीकडे ही गोष्ट गेली.लोणी येथून 2तर संगमनेर मधुन एक अग्निशमन बोलावून ही आग शर्तीच्या प्रयत्नांनी विझवली. साकुर पठारभागावर कुठले रोजनदारीचे साधन नसल्याने बिरोले यांचा कारखाना या भागात तारणहार ठरत होता.

या भागातील लोकांना रोजनदारी व ऊस उत्पादक शेतकर्यांना आशेचा किरण दाखवणार्या या युटेक कारखान्याला आज पहाटे शॉट सर्किट मुळे आग लागुन मोठ्या नुकसानीला सामोरे जावे लागत आहे. या वर्षी मोठ्या प्रमाणात पाणी उपलब्ध असल्याने बहुतांश प्रमाणात शेतकर्यांनी या भागात ऊसाचे उत्पादन घेऊन या कारखान्याला आपला ऊस दिला होता. मात्र,कोरोनाने या कारखान्याला व्यत्यय आल्याने शेतकर्यांना अद्याप ऊसाचे पेमेंट केले नाही.स्टोक गोडाऊनलाच ही आग लागल्याने कारखान्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी देखील हळहळ व्यक्त करत आहे.
सुशांत पावसे